भाजपविरोधी लाट असतानाही हरियाणात कॉंग्रेसचा का झाला पराभव 'ही' 5 कारणे जाणून घ्या

हरियाणात कॉंग्रेस एकतर्फी विजय मिळवेल असं वातावरण होतं. कॉंग्रेस नेत्यांच्या सभेलाही लाखोंची गर्दी असत होती. जाट आरक्षण असो वा शेतकरी आंदोलन जो तो भाजपच्या विरोधात बोलत होता. असं कॉंग्रेसला सर्व अनुकूल असतानाही कॉंग्रेसचं पानिपत का झालं? हा प्रश्न तुमच्यासह आम्हालाही पडलाय. राजकीय विश्लेषकांनी दिलेली त्याची प्रमुख पाच कारण आपण जाणून घेऊया...!

हरियाणामध्ये भारतीय जनता पक्ष सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करताना दिसत आहे. तर काँग्रेसचा 2014 पासून सलग तिसऱ्यांदा पराभव झाला आहे. आतापर्यंत आलेल्या निकालात भाजप 49 जागांवर आघाडीवर दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, काँग्रेसला मोठा विजय मिळेल, असा दावा सर्वच एक्झिट पोलमध्ये करण्यात आला होता. तो फोल ठरला आहे.

Rahul Gandhi

चला जाणून घेऊ, 5 मुद्द्यातून कॉंग्रेस पराभवाची कारणं...!

अंतर्गत गटबाजी...!

काँग्रेसच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण गटबाजी मानले जाते. कुमारी शैलजा यांची नाराजी उघडपणे समोर आली. अशोक तंवर यांचे पुनरागमनही काँग्रेसचे डॅमेज कंट्रोल करू शकले नाही.

अतिआत्मविश्वास नडला..!

काँग्रेस अनेक जागांवर 10 वर्षांच्या सत्ताविरोधी कारभारावर विसंबून असल्याचे दिसून आले. याशिवाय जून 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पाच जागा जिंकणारी काँग्रेसही खूप उत्साहात दिसली. त्यामुळे अति आत्मविश्वास पक्षाला नडला.

संविधानविरोधी खेळी फसली

लोकसभा निवडणुकीत संविधान आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपविरोधात रणशिंग फुंकणाऱ्या काँग्रेसने हरियाणात हीच खेळी खेळली, मात्र इथेही भाजपच्या डावपेचाला तडा जाऊ शकला नाही. उलट भाजपनं संविधान मंदिर हा मुद्दा पुढं केला.

आयारामचा बसला फटका!

काँग्रेसचे अनेक नेते आपापल्या जागेवर मर्यादित राहिले. याशिवाय काही जागांवर काँग्रेससाठी निवडणुकीच्या वेळी इतर पक्षांतील लोकांना सहभागी करून घेण्याचा मुद्दाही हानिकारक ठरला.

भाजपचा लाभार्थी वर्ग रोखता आला नाही

हरियाणात काँग्रेसला भाजपचा लाभार्थी वर्ग संपवता आला नाही. याशिवाय पैलवान आणि शेतकऱ्यांचा मुद्दाही त्याच्यासाठी फायदेशीर वाटत नव्हता. या पाच कारणांनी कॉंग्रेसचा पराभव झाला.

कॉंग्रेस आप युती महत्त्वाची असती?

हरियाणात काँग्रेस पक्षाचा पराभव होण्याचे कारण म्हणजे दोन्ही पक्षांचे हायकमांड त्याचे काय फायदे-तोटे झाले याचे मुल्यांकन केले जातील. आप आणि काँग्रेसची आघाडीच्या मुद्द्यावरही सुशील गुप्ता यांनी भाष्य केलं. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, राष्ट्रीय स्तरावर आघाडी झाली, तर भाजपची अडचण झाली, इथंही असं झालं असतं तर निकाल खूप बदलला असता, असं सुशील गुप्ता म्हणाले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+