झारखंड निवडणुकीसाठी अमित शहांनी जाहीर केला भाजपचा जाहीरनामा, जाणून घ्या कोणत्या गोष्टींचा उल्लेख
BJP manifesto Sankalp Patra: झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी रांची येथे एका कार्यक्रमात पक्षाचा 'संकल्प पत्र' (जाहिरनामा) प्रसिध्द केला आहे. यावेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, संजय सेठ, भाजप झारखंडचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी उपस्थित होते.
अमित शहा म्हणाले, "झारखंडची ही निवडणूक केवळ सरकार बदलण्याची निवडणूक नाही, तर झारखंडची निवडणूक ही झारखंडचे भवितव्य निश्चित करणारी निवडणूक आहे. झारखंडच्या महान जनतेने ठरवायचे आहे की, त्यांना भ्रष्टाचारात बुडलेले सरकार हवे आहे की विकासाचा मार्ग दाखवणारे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार हवे आहे.

भाजपच्या 'निवडणूक जाहीरनाम्या'मध्ये काय आहे?
- भाजपच्या 'संकल्पपत्र'मध्ये झारखंडच्या 25 वर्षांवर भाजपच्या 25 ठरावांचा उल्लेख आहे. यामध्ये गोगो दीदी योजनेंतर्गत महिलांना दरमहा 2100 रुपये मिळणार आहेत.
- लक्ष्मी जोहर योजनेंतर्गत 500 रुपयांत गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन. वर्षभरात दोन सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासन.
- भाजपच्या 'निवडणूक जाहीरनाम्यात' तरुणांना त्यांच्या करिअरमध्ये मदत करण्यासाठी त्यांना 2 वर्षांसाठी दरमहा 2,000 रुपये प्रोत्साहन देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
- 21 लाख कुटुंबांना कायमस्वरूपी घरे देण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबत मोफत वाळू आणि नळ कनेक्शनही भेट देण्यात येणार आहे.
- भाजपचे सरकार येताच घुसखोरांना रोखण्यासाठी आणि ताब्यात घेतलेल्या जमिनी परत करण्यासाठी कडक कायदे लागू केले जातील.
-महिलांसाठी फक्त 1 रुपायात मुद्रांक शुल्क आकारले जाईल. म्हणजेच जमीन नोंदणीसाठी महिलांना फक्त एक रुपया मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे.
- सरकारी संस्थांमध्ये बीएड, नर्सिंग आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे मोफत शिक्षण दिले जाईल, असे आश्वासन भाजपने दिले आहे. खासगी संस्थांमधील शिक्षण शुल्कही माफ केले जाईल.
#WATCH | Ranchi: Union Home Minister Amit Shah releases party's 'Sankalp Patra' (manifesto) for the #JharkhandAssemblyElections2024
— ANI (@ANI) November 3, 2024
Assam CM Himanta Biswa Sarma, Union Ministers Shivraj Singh Chouhan, Sanjay Seth, BJP Jharkhand president Babulal Marandi are also present. pic.twitter.com/72jaOoUlsB
10 वर्षात मोदी सरकारने 3 लाख कोटी रुपये दिले
अमित शाह म्हणाले, हेमंत सोरेन पंतप्रधान मोदींकडे एक लाख कोटी रुपयांचा हिशोब मागत होते. मी हिशोब घेऊन आलो आहे. काँग्रेस आणि लालू प्रसाद यांच्या यूपीए सरकारने 2004 ते 2014 या 10 वर्षांत झारखंडला 84 हजार कोटी रुपये दिले होते. पंतप्रधान मोदींनी 2014 ते 2024 दरम्यान झारखंडला 3 लाख 8 हजार कोटी रुपये देण्याचे काम केलं असल्याचं शाह यांनी सांगितले.
पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, "बेरोजगारी आणि पेपरफुटीमुळे त्रस्त झालेले तरुण आज भाजपसोबत त्यांचे भविष्य शोधत आहेत. झारखंडचे लोक भ्रष्टाचारामुळे गरीबांच्या संपत्तीचे वाटप करणाऱ्या सरकारऐवजी गरिबांचे कल्याण करणारे सरकार शोधत आहेत, म्हणून भाजपने आज निवडणूक संकल्पपत्र आणलं आहे. अमित शाह म्हणाले, "आज पुन्हा एकदा भाजप झारखंडच्या जनतेकडे नव्या आशेने जात आहे की आम्ही विकास, सुरक्षा, भ्रष्टाचार निर्मूलन आणि राज्याला विकासाकडे नेण्यासाठी काम करू", असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications