काही क्षणात मृत्यूचा तांडव; प्रवाशांनी भरलेल्या बसला भीषण आग; 20 जणांचा मृत्यू?, समृद्धीसारखाच थरार!
Jaisalmer Bus Accident News : राजस्थानमधील जैसलमेर येथे मंगळवारी (१४ ऑक्टोबर) एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. जैसलमेरहून जोधपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांनी भरलेल्या खासगी बसला अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत सुमारे २० जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बसमध्ये एकूण ५७ प्रवासी होते. दरम्यान,अशी घटना ही समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजा परिसरात घडली होती. आज झालेल्या राजस्थानमधील घटनेने समृद्धी महामार्गावरील थराराची आठवण करून दिली आहे.
नेमकी घटना काय घडली?
मंगळवारी दुपारी ३:४० वाजता जैसलमेरहून जोधपूरकडे निघालेल्या या बसला जैसलमेरपासून काही अंतरावर, थैयत गावाजवळ अचानक आग लागली. बसच्या मागील भागातून अचानक धूर येऊ लागला आणि काही क्षणातच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
बसच्या समोरील भागात बसलेल्या प्रवाशांनी कसाबसा स्वतःचा जीव वाचवत बाहेर पळ काढला, परंतु मागील भागातील प्रवासी आगीत अडकले. या घटनेमुळे परिसरात मोठी घबराट पसरली.

हानीची भीती
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात बसमधील अनेक प्रवासी गंभीररित्या भाजले गेले आहेत. यात सुमारे २० जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये तीन मुले आणि चार महिलांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
सहाय्यक अग्निशमन अधिकारी कृष्णा पाल सिंह राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. आत अडकलेल्यांपैकी कोणीही जिवंत सापडले नाही. आत सुमारे २० जण असण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
जैसलमेर में बड़ा हादसा..
— Desi Sach (@Desisach) October 14, 2025
जितनी भी निजी बसें चलती हैं यह सभी सुरक्षा मानकों के अनुसार नहीं बनी हैं आपातकालीन स्थिति में लोगों का मरना तय हैं सरकारें न तो इनकी जांच करवाती ओर ना ही कोई कार्यवाही करती...
यह बसें चलता फिरता ताबूत हैं#jaisalmer #RajasthanNews #jaisalmernews pic.twitter.com/CZPuEiyz2K
बचावकार्य आणि मदत
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू केले.
भाजलेल्या प्रवाशांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. अनेक प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी जोधपूरला रेफर करण्यात आले आहे. अनेकांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दुःख
राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांनी या बस दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी जिल्हाधिकारी आणि एसपींशी फोनवरून चर्चा करून पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री शर्मा अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात असून, ते आज रात्री किंवा उद्या सकाळी जैसलमेरला भेट देऊ शकतात. जैसलमेरचे जिल्हाधिकारी प्रताप सिंह यांनी घटनेची तीव्रता लक्षात घेऊन तत्काळ हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.












Click it and Unblock the Notifications