Ind-Pak Ceasefire:भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम; ट्रम्प यांच्या दाव्यानंतर दोन्हींकडून पुष्टी!
india pakistan ceasefire Latest News in Marathi : भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंदर्भात सर्वात आधी दावा केला. त्यानंतर भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांकडून युद्धबंदीचा निर्णयाला पुष्टी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून भारत व पाकिस्तान सीमारेषेवर सुरू असलेले युद्ध आता थांबणार आहे. ही युद्धबंदी कोणत्याही अटी व शर्थीवर झालेली नाही. पण, 12 मे रोजी दोन्ही देशांमध्ये पुढील चर्चा होणार आहे.
काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पोस्टद्वारे ही माहिती दिली. ते म्हणाले की, 'अमेरिकेच्या मध्यस्थीखाली काल रात्री झालेल्या दीर्घ चर्चेनंतर, मला हे कळवताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने तात्काळ आणि पूर्ण युद्धबंदीसाठी सहमती दर्शविली आहे. दोन्ही देशांनी एक सामान्य आणि समंजस निर्णय घेतल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री काय म्हणाले?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर काही वेळातच भारताकडून देखील या निर्णयाची पुष्टी देण्यात आली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सागितले की, आज दुपारी 3.35 वाजता दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये चर्चा झाली. दोन्ही देशांनी संध्याकाळी 5 वाजल्यापासून हवेत, पाण्यातून आणि जमिनीवरून होणारे हल्ले तात्काळ थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. आज. यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. 12 मे रोजी दोन्ही देशांचे अधिकारी पुढील रणनीतीवर चर्चा करतील, असेही मिस्त्री यांनी सांगितले.
डोभाल आणि जयशंकर यांनी साधला संवाद
भारत आणि पाकिस्तान दरम्यान अचानक उद्भवलेला संघर्षविराम के मागे कूटनीतिक कारण आहे, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या अमेरिकन समकक्षांसोबत सतत चर्चेत होते. या चर्चेचा उद्देश सीमेवरील वाढता तणाव संपवणे आणि शांततापूर्ण तोडगा काढणे हा होता.
— Donald J. Trump (@realDonaldTrump) May 10, 2025
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री आणि उपराष्ट्रपतींनी मोदींशी साधला संवाद
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाले की, उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि मी स्वतः गेल्या 48 तासांपासून भारत-पाकिस्तान अधिकाऱ्यांशी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान शाहबाज शरीफ, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, संरक्षण मंत्री असीम मुनीर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी बोलत आहोत.
मला तुम्हाला कळवण्यास आनंद होत आहे की, पाकिस्तान आणि भारत सरकारांनी तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. दोन्ही देशांनी निष्पक्ष व्यासपीठावर वाद सोडवण्यासाठी चर्चा करण्यास सहमती दर्शविली आहे. शांतीचा मार्ग सुज्ञपणे निवडल्याबद्दल आम्ही मोदी आणि शाहबाज शरीफ यांचे कौतुक करतो.
हे ही वाचा : बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे म्हणजे काय? भारत-पाकिस्तान तणावादरम्यान त्यांची ताकद समजून घ्या
कशी झाली चर्चा, जाणून घ्या सर्व काही
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी बुधवारी रात्री पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांनी दोन्ही देशांना तणाव कमी करण्याचे आणि दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले.
हे ही वाचा : PAK नागरिकांना ढाल म्हणून वापरतोय, 400 ड्रोनचा हल्ला; कर्नल सोफिया कुरेशींनी सांगितला रात्रीचा थरार!
दहशतवादाचा निषेध, पण भारताला संयमाचे आवाहन
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी सांगितले की, मार्को रुबियो यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्यांसाठी जयशंकर यांना फोनवरून शोक व्यक्त केला. म्हणाले की, दहशतवादाविरुद्ध अमेरिका भारतासोबत आहे. तथापि, त्यांनी भारताने हल्ल्यासाठी पाकिस्तानला दोष देताना आणि बदला घेण्याची मागणी करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, टॅमी ब्रूस म्हणाले की, पंतप्रधान शरीफ यांच्याशी फोनवरून झालेल्या संभाषणादरम्यान रुबियो यांनी पाकिस्तानला 22 एप्रिल रोजी काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यास आणि तपासात सहकार्य करण्यास सांगितले. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांना या हल्ल्याच्या तपासात पूर्ण सहकार्य करण्याची विनंती केली होती.
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर काय म्हणाले?
India and Pakistan have today worked out an understanding on stoppage of firing and military action.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) May 10, 2025
India has consistently maintained a firm and uncompromising stance against terrorism in all its forms and manifestations. It will continue to do so.












Click it and Unblock the Notifications