पंबन पुलावरचा 'हा' भयंकर अपघात माहीतए का? प्रवाशांसह अख्खी ट्रेन गेली होती वाहून; २५० मृत्यू आणि...
रामनवमीच्या शुभमुहूर्तावर पतंप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूतील पंबन पुलाचे उद्धाटन करणार आहेत. हा नवीन पूल शंभर वर्षे जुन्या पुलाची जागा घेणार आहे. भारतातील हा पहिला उभा लिफ्ट समुद्री पूल अभियांत्रिकी चमत्कार मानला जातोय. मात्र यानिमित्ताने चर्चेत आलेला हा पूल एका भयंकर अपघाताचीही साक्ष देतोय. या पुलावरुन प्रवाशांनी खचाखच भरलेली एक ट्रेन समुद्रात वाहून गेली होती. विशेष म्हणजे, त्यावेळी फक्त ट्रेन सापडली होती. ट्रेनमध्ये प्रवास करणारे सुमारे २५० प्रवाशी समुद्रात वाहून गेले होते.

कसा होता जूना पुल?
जुन्या पंबन पुलाचे बांधकाम १९११ मध्ये सुरू झाले आणि १९१४ मध्ये तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. व्यापारासाठी बांधलेला हा भारतातील पहिला समुद्री पूल होता. ब्रिटीश राजवटीच्या त्या काळात भारतातील धनुषकोडी आणि श्रीलंकेतील तलाईमन्नार या दोन बंदरांमध्ये जहाजे ये-जा करत असत. जुन्या पुलावर दुहेरी-पानांचा बेस्क्युल भाग होता ज्यामध्ये कात्री रोलिंग-प्रकारचा लिफ्ट स्पॅन होता जो जहाजांना जाऊ देण्यासाठी उंचावला होता. हे एक तांत्रिक चमत्कार मानले जात होता.
कोणता होता भयानक अपघात?
२३ डिसेंबर १९६४ च्या रात्री आलेल्या एका भयंकर वादळाने पंबन पुलावर मोठा आपघात झाला होता. प्रवाशांनी भरलेली ट्रेन समुद्रात वाहून गेली होती. रात्री ११ वाजता ६५३ पंबन-धनुषकोडी पॅसेंजर ट्रेनचे सहा डबे रामेश्वरमहून धनुषकोडीला जात होते. मात्र वादळात संपूर्ण ट्रेन समुद्रात वाहून गेली. सकाळी फक्त ट्रेनचे इंजिन दिसत होते. या अपघातात किती जणांचा मृत्यू झाला, हा आकडा कळालाच नाही. रेल्वे सुरक्षा आयोगाच्या (CRS) अहवालात म्हटले आहे की, ट्रेनमध्ये १०० ते ११० प्रवासी आणि १८ रेल्वे कर्मचारी होते ज्यांचा मृत्यू झाला. काही अंदाजांनुसार, मृतांची संख्या २५० पर्यंत होती.
नेमके काय झाले होते?
सुरक्षा आयोगाच्या अहवालानुसार, "तीव्र वादळीमुळे धनुषकोडी किंवा रामेश्वरम रस्त्यावरील कोणताही कर्मचारी ट्रेनचे काय झाले, हे शोधण्यासाठी बाहेर जाऊ शकला नाही. कॉलनी आणि यार्डसह संपूर्ण परिसरात समुद्राचे पाणी भरल्याने धनुषकोडी येथील कर्मचारी स्वतः अडकले होते. स्टेशन इमारत ही एकमेव कोरडी जागा होती. सकाळी सहा वाजता वादळ कमी झाल्यावर कर्मचाऱ्यांना रामेश्वरम रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाण्याशिवाय काहीच दिसले नाही. ट्रेनचे काय झाले हे २४ डिसेंबर १९६४ रोजी सकाळीच कळू शकले."
किती झाले होते नुकसान?
या वादळात जुना पांबन पूल वादळात टिकून राहिला असला तरी त्याचे पुलावरचे १४६ पैकी १२६ स्पॅन वाहून गेले होते. पुलाचे दोन खांबही निकामी झाले होते. त्यानंतर मेट्रो मॅन ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध असलेले ई. श्रीधरन यांनी पंबन पुलाचे नूतनीकरण केले. हा पूल दुरुस्त करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. पण त्याने फक्त ४६ दिवसांत पूल पुन्हा बांधला.












Click it and Unblock the Notifications