Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

हरियाणातील विजयानंतर काँग्रेसवर PM मोदींचे मोठे आरोप! काय म्हणाले पंतप्रधान? 3 मुद्द्यांत समजून घ्या

Haryana Jammu Kashmir Election Result :हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल आज हाती आले. यात हरियानात भाजप तर काँग्रेस-नॅशनल काॅन्फरन्स युतीचे सरकारला बहुमत मिळाले. हरियाणामध्ये विजयी केल्याबद्दल आणि जम्मू-काश्मीर येथील जनतेने भाजपला मतदान केल्याबद्दल आज नवी दिल्लीत दोन्ही राज्यांची जनतेला धन्यवाद देण्यासाठी तसेच भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आज संबोधन केले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमके काय म्हणाले हे तीन मुद्द्यांत समजून घेऊया.

हरियाणात छप्पर फाडके मतं - मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, हरियानात छप्पर फाडके मत भाजपला दिले आहेत. हा विजय दुर-दुरपर्यंत गाजत राहीलं. भाजप केवळ जगातील मोठा पक्षच नाही तर विकासतही मोठे काम आहे. गुजरात आणि मध्यप्रदेशात दोन दशके तर गोवा आणि अरुणाचलमध्ये दोनवेळा तर युपीमध्ये लोक आम्हाला वारंवार संधी देत आहेत.

Haryana Jammu Kashmir Election Result

1. काँग्रेसवर सत्तेसाठी हपापलेले, जातीवाद पसरवल्याचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आता काँग्रेसची पोल उघडकीस आली आहे. काँग्रेस सत्तेला आपला जन्मसिद्ध अधिकार मानते. काँग्रेसला सत्ता मिळाली नाही तर पाण्याबाहेर आलेल्या माशासारखी त्यांची स्थिती होते. सोन्याचे चमचे तोंडात घेऊन जन्मले ते गरीबांना जाती-जातीत लढवण्याचे काम करत आहेत. हे कधीही दलित मागासवर्गीयाना, आदीवासींना सत्तेत येऊ देत नाही. ते या वर्गाला सापत्न वागणूक देत आहे. काँग्रेसच्या शाही परिवाराने आरक्षण संपवणार असे म्हटले आहे. ते वेगवेगळ्या वर्गांना भडकवत असून आग लावण्याचे काम करत आहे.

2. काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवले, जवानांचा अपप्रचार

पीएम मोदी म्हणाले, शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण हे शेतकरी भाजपसोबत आहेत. आमच्या सैन्याचा अपप्रचार केला. हरियानातील जवानांनीही काँग्रेसच्या कटाला तिलांजली दिली. देशविरोधी राजकारण आता चालणार नाही हे सर्वांनी सांगिले आहे. देशभक्तांत फुट पाडण्याचा कट जनतेने हाणून पाडला.

3. काँग्रेस परजीवी, आंतरराष्ट्रीय कटात सहभागी

पीएम मोदी म्हणाले, भारताच्या लोकशाही, अर्थकारणाला कमजोर करण्यासाठी कट रचले जात आहेत. आंतरराष्ट्रीय कट होत आहेत. आज मी जबाबदारीने देशवासीयांना सांगतो की, काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष या कटात सामिल आहे. देशभक्त हरियानाने आज या कटाला उत्तर दिले. लोकसभेत काँग्रेसने जेवढ्या जागा जिंकल्या त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त जागा त्यांच्या मित्रपक्षांच्या होत्या पण त्यांनाच घेऊन आता हे डुबत आहे. काँग्रेसच्या वाईट कामगिरीचे परिणाम मित्रपक्षांना भोगावे लागले. हा पक्ष म्हणजे परजीवी पक्ष आहे.

या 3 राज्यातील भाजपने सांगितलं प्लॅनिंग!

हरियानात विजय आपल्याला मिळाला. आता महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्लीही जिंकायची आहे असे म्हणत भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काँग्रेवर आणि त्यांच्या धोरणावर टीका केली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर आरोपही केले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+