Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

विरोधकांचा प्रचंड तरीही मोदी २ तास बोलत राहीले, काँग्रेसवर सडकून टीका

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देत आहेत. पंतप्रधान मोदी बोलण्यासाठी उभे राहताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घातला. विरोधकांच्या गदारोळामुळे नरेंद्र मोदींना बोलण कठीण झालं आहे. मोदींनी हेडफोन लावून भाषणाला सुरुवात केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देत आहेत. पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घातला. विरोधी खासदारांच्या घोषणाबाजीत पंतप्रधानांचे भाषण सुरूच आहे. सभापती ओम बिर्ला यांनी विरोधी खासदारांना फटकारले आहे.

narendra modi speech in loksabha

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले की, जनतेने आमच्या 10 वर्षांच्या सरकारचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला आहे. लोकसेवा आणि ईश्वर सेवा हा मंत्र बनवून आम्ही काम केले. भ्रष्टाचाराबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण देशाने आपल्याला दिले आहे.

आज जगात भारताचा गौरव होत आहे. जगात विश्वासार्हता वाढली आहे. भारताकडे पाहण्याचा अभिमानास्पद दृष्टीकोनही प्रत्येक भारतीय अनुभवत आहे. नेशन फर्स्ट हे आमचे एकमेव ध्येय आहे. भारत प्रथम आहे. आमचे प्रत्येक धोरण, प्रत्येक निर्णय, प्रत्येक कामाचा एकच मापदंड आहे - भारत प्रथम. इंडिया फर्स्टच्या भावनेने आवश्यक सुधारणाही सुरू ठेवल्या आहेत.

गेल्या 10 वर्षात आमचे सरकार सबका साथ, सबका विकास या मंत्राचे पालन करून सर्वांचे कल्याण करण्याचा प्रयत्न करत आहे असे मोदींनी म्हटले आहे.

राहुल गांधींच्या विधानाचा समाचार

राहुल गांधी यांनी काल (सोमवारी १ जुलै) केलेल्या विधानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार समाचार घेतला. राहुल गांधींवर टीका करत मोदी म्हणाले, सभागृहात बाल बुद्धि पहायला मिळाली. सहानुभूती मिळवण्यासाठी नाटक केले गेले. हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या गुन्ह्यात आपण जामिनावर बाहेर आहोत, याचा त्यांना विसर पडत आहे. ओबीसी वर्गाला चोर म्हटल्याबद्दल त्यांना शिक्षा झाली असल्याचा टोला राहुल गांधी यांना मोदींनी लगावला.

पीएम मोदी पुढे म्हणाले की, एखाद्या नरभक्षक प्राण्याला तोंडाला रक्ताची चटक लागते त्याप्रमाणे काँग्रेसला खोटं बोलण्याची सवय लागली आहे. देशाने काल १ जुलै रोजी खटाखट दिवसही साजरा केला. 8500 रुपये आले की नाही हे पाहण्यासाठी लोक त्यांचे खाते तपासत होते, असा टोला मोदींनी यावेळी लगावला.

आता कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहेः पंतप्रधान मोदी

लोकसभेत झालेल्या गदारोळावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस चुकीच्या हेतूने देशात खोटं पसरवते, ज्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे कारण त्यांचा हेतू योग्य नाही. नंतर गदारोळ करून ते लपवण्याचा प्रयत्न करतात. यावर कारवाई करण्याची गरज आहे. याला आता बालिश बुद्धिमत्ता म्हणत दुर्लक्ष करता येणार नाही.

कलम 370 वर पंतप्रधान काय म्हणाले?

पीएम मोदींनी कलम 370 चाही उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले, आज देशातील प्रत्येक नागरिकाला माहित आहे की भारत आपल्या सुरक्षेसाठी काहीही करू शकतो. कलम 370 ची पूजा करणाऱ्यांनी, व्होटबँकेचे राजकारण करणाऱ्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये अशी परिस्थिती निर्माण केली होती की, भारतीय राज्यघटना जम्मू-काश्मीरच्या सीमेवर जाऊ शकत नाही. 370 च्या काळात सैन्यावर दगडफेक झाली आणि लोक निराश झाले आणि म्हणाले की आता जम्मू-काश्मीरमध्ये काहीही होऊ शकत नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+