अक्षम्य निष्काळजीपणा! दिल्ली आयएएस कोचिंग सेंटर दुर्घटनेला जबाबदार कोण, 3 जीवांचे कुणी घेतले बळी?

नवी दिल्ली - दिल्लीतील राजेंद्रनगर येथील कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी साचल्याने तीन उमेदवारांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना आयएएस परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जेवढी भीषण आणि दुर्दैवी तेवढीच निष्काळजी या कोचिंग सेंटर व्यवस्थापनाने केली आहे.

प्रश्न हा की, ज्यांनी भविष्याची स्वप्ने पाहत दिल्ली गाठली. त्यांच्याच नव्हे तर कुटुंबांची स्वप्नही उद्धवस्त झाली. या निष्पाप तीन जीवांच्या मृत्यूला जबाबदार कोण? या दुर्घटनेचे आरोपी कोण हा प्रश्न आहे. या दुर्घटनेनंतर आता काय उपाय करता येतील हाही प्रश्न तेवढाच मोठा आहे.

Delhi IAS coaching accident  3 dead students protest latest update

3 उमेदवारांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

  • राऊ आयएस कोचिंग सेंटरची लायब्ररी ज्या ठिकाणी सुरू होती त्या ठिकाणी अशा घटना रोखण्यासाठी साधनसामग्री उपलब्ध नाही, दुसरीकडे नाल्यांची साफसफाई होत नव्हती.

  • जुन्या राजेंद्र नगरमध्ये 10 हून अधिक कोचिंग सेंटर आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व कोचिंग सेंटर्सच्या तळघरात लायब्ररी आहेत. याबाबत स्थानिकांनी तक्रारीही केल्या होत्या, मात्र या तक्रारी कधीच ऐकल्या जात नसल्याचा आरोप होत आहे.

  • वेळीच कारवाई झाली असती तर तीन जीव वाचले असते. अपघातानंतर एमसीडीची झोप उडाली. परिसरातून पाण्याचा निचरा होत असून नाल्यांची स्वच्छता करण्यात येत आहे.

  • हे वाचनालय बेकायदेशीरपणे सुरू होते, राऊ आयएएस कोचिंग सेंटरमध्ये किती घातक निष्काळजीपणा करण्यात आला हेही उघड झाले आहे.

  • कोचिंग सेंटरच्या कम्प्लिशन सर्टिफिकेटमध्ये जे लिहिले होते त्याच्या नेमके उलटे काम येथे केले जात होते.
  • गंभीर बाब म्हणजे कोचिंग सेंटरच्या तळघरात बेकायदेशीरपणे लायब्ररी बांधण्यात आली होती.
  • तळघर पार्किंगसाठी वापरण्यात येणार असल्याचे प्रमाणपत्रात स्पष्ट लिहिले आहे. या पूर्णत्वाच्या प्रमाणपत्रानुसार, तळघर स्टोरेजसाठी वापरला जाईल, म्हणजे, प्रमाणपत्रामध्ये व्यावसायिक गोष्टींना परवानगी नव्हती.
  • Delhi IAS coaching accident  3 dead students protest latest update

    मोठे शुल्क घेऊन सुविधांकडे दुर्लक्ष

    युपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मोठे शुल्क कोचिंग संस्था आकारतात. पण या विद्यार्थ्यांना मूलभूत सुरक्षेत कसर ठेवली गेल्याचे या घटनेवरुन दिसते. कोचिंग संस्थेकडून काही उपाय योजण्यात आले होते का..आग लागली अथवा दुर्घटना घडल्यास पुर्वनियोजित उपाययोजनांचा अभाव या दुर्घटनेवरुन दिसून येतो.

    Delhi IAS coaching accident  3 dead students protest latest update

    भाजप-आपमध्ये आरोप-प्रत्यारोप

    दिल्ली सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असतानाच, भाजप आणि आम आदमी पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांचे निषेध आंदोलन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता कोचिंग सेंटरचे मालक आणि समन्वयक यांना ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी आणि इतर आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे.

    विद्यार्थ्यांचे आंदोलन

    Delhi IAS coaching accident  3 dead students protest latest update

    मध्य दिल्लीच्या जुन्या राजिंदरनगर भागात मुसळधार पावसामुळे कोचिंग सेंटरच्या इमारतीच्या तळघरात शनिवारी पाणी पोहचले. यात तीन युपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा मृत्यू झाला. यानंतर संतप्त विद्यार्थी दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) आणि कोचिंग इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापनाविरोधात निदर्शने करत आहेत.

    पावसाळी उपाययोजना केल्या होत्या का?

    महानगर पालिका आणि कोचिंक इन्स्टिट्यूट व्यवस्थापनावर सर्व जबाबदारी होती हे दिसून येते पण या दोन्ही संस्थांनी पावसाळ्यातील संभाव्य उपाययोजना केल्या होत्या का जर त्या केल्या असेल तर ही दुर्घटना का झाली आणि जर उपाययोजना केल्या नसतील तर का केल्या नाही, हेही चौकशीतून समोर येईल.

    दिल्ली महानगर पालिका जबाबदार?

    युपीएससी उमेदवारांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगितले की, या दुर्घटनेला "एमसीडी जबाबदार आहे. त्यांनी सुरक्षा उपायांची खात्री केली नाही. एमसीडी आणि आरएयू आयएएस दोघेही दोषी आहेत, त्यांना संयुक्तपणे जबाबदार धरायला हवे."

    या उपाययोजना आवश्यक, विद्यार्थ्यांच्या या मागण्या

    • सर्वात आधी बेसमेंटमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेली ही सर्व लायब्ररी बंद करावी.
    • एमसीडीने हा प्रश्न ताबडतोब सोडवावा.
    • मागच्या वेळी पाऊस पडला होता, त्यामुळे गाड्या तरंगत होत्या. एका वर्षात त्यांनी काय उपाययोजना केल्या, याचे ऑडीट व्हावे.
    • दिल्लीच्या राजेंद्रनगरात जे घडले ते अक्षम्य आहे आणि यापुढे अशा समस्यांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे महापाप ठरु शकते त्यामुळे वेळीच उपाय सरकारने योजावेत.
    • कोचिंग सेंटरचे ऑडीट, फायर ऑडीटसह अन्य तपासण्यांची गरज आहे.
    • अनाधिकृत कोचिंग सेंटरवर कारवाई व्हायला हवी. कोचिंग सेंटर इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट व्हायला हवे. बांधकाम, इमारत ढासळण्यासंदर्भातील ऑडीटचीही गरज आहे.
    • दोषींवर कठोर कारवाई करावी.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+