दिल्ली CM आतिशी यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यास 5 लाखांच्या रोख रकमेसह अटक, वाचा संपूर्ण प्रकरण
Delhi Assembly Election 2025 : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्यास 5 लाख रोख रुपयांसह पकडले गेले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
दुसरीकडे, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी देखील आप नेत्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.
बुधवारी दिल्लीत मतदान होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री आतिशी यांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्यास 5 लाख रुपयांसह पकडले गेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
AAPच्या वतीने आरोप फेटाळले, म्हणाले- हे सर्व 'प्लान्टेड'
दुसरीकडे, आम आदमी पक्षाने 5 लाख रुपयांची रोकड जप्त करण्याच्या प्रकरणाला 'प्लान्टेड' म्हटले आहे. पक्षाने म्हटले आहे की व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीने हे त्याचे स्वतःचे पैसे असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. आम आदमी पक्षाने म्हटले आहे की जिथे प्रत्यक्षात पैसे वाटले जात आहेत, तिथे दिल्ली पोलिसांना काहीही दिसत नाही.
या कलमातंर्गत केजरीवालांवर गुन्हा दाखल?
केजरीवाल यांनी हरियाणा सरकारवर यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केला होता. शहााबाद येथील रहिवासी जगमोहन मनचंदा यांच्या तक्रारीवरून, केजरीवाल यांच्याविरुद्ध बीएनएस कायद्याच्या कलम १९२, १९६(१), १९७(१), २४८(अ) आणि २९९ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला.

जगमोहन मनचंदा यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या विधानाने हिंदूंच्या धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, दोन्ही राज्यातील लोक भडकले आहेत.
जर ते पाणी दिल्लीत शिरले असते तर...
केजरीवाल म्हणाले, दिल्लीतील लोकांना हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून पिण्याचे पाणी मिळते. यमुनेमार्गे हरियाणाला पिण्याचे पाणी येते. हरियाणाच्या भाजप सरकारने यमुनेतून येणाऱ्या पाण्यात विष मिसळून ते दिल्लीला पाठवले आहे.
तक्रारीतील केजरीवाल यांच्या विधानाचा हवाला देत ते पुढे म्हणाले, आमच्या दिल्ली जल बोर्डाच्या अभियंत्याने ते पकडले हे चांगले आहे. त्यांनी ते पाणी दिल्ली सीमेवर थांबवले आणि दिल्लीत येऊ दिले नाही. जर ते पाणी दिल्लीत शिरले असते आणि पिण्याच्या पाण्यात मिसळले असते तर दिल्लीत किती लोकांचा मृत्यू झाला असता कोणास ठाऊक? हरियाणाच्या भाजप सरकारने दिल्लीला पाठवलेले हे पाणी दिल्लीत पोहोचले असते तर मोठ्या प्रमाणात नरसंहार झाला असता, असा आरोप केजरीवाल यांनी केला.












Click it and Unblock the Notifications