दिल्लीकरांना भाजपची आणखी एक गॅरंटी, विद्यार्थ्यांना 1000 रुपये, गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण
Delhi Assembly election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणूकीचा प्रचार आता चांगलाच रंगात आला आहे. भाजपाने आज मंगळवारी (ता. 21 ) रोजी दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 साठीच्या त्यांच्या जाहीरनाम्याचा दुसरा भाग प्रसिद्ध केला.
भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी 'संकल्प पत्र' प्रकाशित करताना म्हटलं आहे की, भाजपाचे सरकार दिल्लीत स्थापन झाल्यानंतर गरजू विद्यार्थ्यांना दिल्लीतील सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये केजी ते पीजी पर्यंत मोफत शिक्षण दिलं जाईल..

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या 'संकल्प पत्र'चे प्रकाशन करताना भाजप खासदार अनुराग ठाकूर म्हणाले, "आम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी दिल्लीतील तरुणांना 15,000 रुपयांची एक वेळची आर्थिक मदत देणार आहोत. तसेच दोन वेळा प्रवास आणि अर्ज शुल्काची परतफेड देखील करू. ही मोदींची गॅरंटी आहे" , असं अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे.
केजी ते पीजी पर्यंत मोफत शिक्षण
भाजपने आपल्या जाहीरनाम्याचा दुसरा भाग प्रसिद्ध केला आहे. या संकल्प पत्रात तरुण आणि कामगारांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. जर भाजपचे सरकार आले तर दिल्लीतील सरकारी संस्थांमध्ये केजी टू पीजी पर्यंतच्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाईल, अशी मोठी माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की याशिवाय, ऑटो-टॅक्सी चालक आणि घरगुती मदतनीसांना विम्याचे फायदे देखील मिळतील.
#WATCH | Delhi | Launching BJP's 'Sankalp Patra' for Delhi Assembly polls, BJP MP Anurag Thakur says," We will provide to the youth of Delhi one-time financial assistance of Rs 15,000 for preparation of competitive examinations and reimburse two-time travel and application fees.… pic.twitter.com/muyCpF8SJ7
— ANI (@ANI) January 21, 2025
विद्यार्थी आणि कामगारांसाठी आधार
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या दिल्लीतील विद्यार्थ्यांना 15,000 रुपयांची मदत मिळेल. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना डॉ. भीमराव आंबेडकर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळेल. ज्यामध्ये मासिक 1,000 रुपये स्टायपेंड दिले जाईल. मागील सरकारांनी पाच वर्षांत फक्त पाच अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मदत केली, तर मोदी सरकारने 34.5 लाख अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मदत केली असल्याचं ठाकूर यांनी सांगितले.
ऑटो-टॅक्सी चालकांना 10 लाख रुपयांपर्यंतचा जीवन विमा आणि 5 लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा देण्यासाठी भाजप ऑटो टॅक्सी कल्याण मंडळ स्थापन करण्याची योजना आखत आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देखील दिली जाईल. घरगुती मदत कल्याण मंडळाद्वारे माळी आणि स्वयंपाकी यांसारख्या घरगुती कामगारांना 10 लाख रुपयांचा जीवन विमा आणि 5 लाख रुपयांचा अपघात विमा देण्याचा प्रस्ताव असल्याचं ठाकूर यांनी म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications