काय आहे मोदीं विरोधातील 'GAYYAB' पोस्ट? भाजप- काँग्रेसमध्ये 'X' वाॅर; लावलाय थेट पाकिस्तानशी संबंध
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील राजकीय वातावरणही अस्थित होऊ पाहत आहे. या भ्याड हल्ल्यानंतर विरोधी पक्षांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. सत्ताधारी व विरोधकांच्या या शाब्दीक युद्धानंतर राजकीय गोंधळ तीव्र होऊ लागला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. त्यातच आता काँग्रेसने मोदीविरोधात 'एक्स' वर एक पोस्ट केल्यानंतर, देशातील राजकारण पुन्हा ढवळले. कारण या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, भाजपने काँग्रेसचा थेट पाकिस्तानशी संबंध जोडला आहे.

काय आहे काँग्रेसची पोस्ट?
पहलगाम हल्ल्यानंतर काँग्रेसने त्यांच्या एक्स या हॅण्डेलवर एक पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये एक फोटो शेअर करताना फक्त एवढेच लिहिले - जबाबदारीच्या वेळी गायब. या पोस्टद्वारे काँग्रेसने पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. यावर भाजपने प्रत्युत्तर दिले आहे.
'जिम्मेदारी' के समय - Gayab pic.twitter.com/gXFublGkGn
— Congress (@INCIndia) April 28, 2025
भाजपचा जोरदार पलटवार
काँग्रेसने 'X' वर 'गायब' पोस्ट केल्यानंतर भाजप नेते अमित मालवीय यांनी यावर प्रश्न उपस्थित केले . या पोस्टवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, काँग्रेसने ज्या पद्धतीने 'सर तन से जुदा' चित्र वापरले, त्यावरून आता ते केवळ राजकीय विधान नाही असे दिसतेय. मुस्लिम मतपेढी मिळविण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न आहे. हे पंतप्रधानांविरुद्ध छुपी चिथावणी आहे. काँग्रेसने अशी रणनीती स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ नाही.
#WATCH | Delhi: BJP MP Anurag Thakur says, "... 'Congress aur unke netaaon ki kya majboori hai, ki Pakistan ke bol bolne zaruri hain?' Why are they supporting Pakistan? Do they not get angry when they see the bloodshed of Indians?... Their leader and former cabinet minister… pic.twitter.com/MJjUM6LH76
— ANI (@ANI) April 29, 2025
काँग्रेस हिंसाचाराचे समर्थक
अमित मालवीय पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांनी अनेक वेळा लोकांना पंतप्रधानांविरुद्ध भडकवले आहे. हिंसाचाराचे समर्थन केले आहे. तरीही काँग्रेस कधीही यशस्वी होणार नाही. कारण पंतप्रधानांना लाखो भारतीयांचे प्रेम आणि आशीर्वाद आहेत. उलट जर कोणाची मान कापली गेली असेल तर ती काँग्रेसची आहे. आज काँग्रेस हा एक प्रमुख नसलेला पक्ष बनला आहे ज्याला काय करावे हे कळत नाही. ते ध्येयहीनपणे भटकत आहेत.
#WATCH | Delhi: On Congress's 'Gayab' post targeting PM Modi, Congress MP Jairam Ramesh says, "We hope that our demand for a special session will be fulfilled...PM Modi was not present at the all-party meeting. We demanded on 22nd April that the all-party meeting should be held… pic.twitter.com/Eij4REgYDq
— ANI (@ANI) April 29, 2025
विशेष अधिवेशनाची काँग्रेसची मागणी
या पोस्टपूर्वी काँग्रेसने एक मोठी मागणी केली. पहलगाम हल्ल्याबाबत विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. काँग्रेस खासदार जयराम रमेश म्हणाले की, आम्ही अनेक विरोधी पक्षांशी बोललो आणि त्यानंतरच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विशेष अधिवेशन बोलावण्याची आणि चर्चा करण्याची मागणी केली. सध्याची परिस्थिती पाहता, एकता आवश्यक आहे. त्यामुळेच आम्ही विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे.












Click it and Unblock the Notifications