Children's Day 2025 Short Speech in Marathi: पं. नेहरू जयंती बालदिन विद्यार्थ्यांसाठी 5 प्रेरक भाषणं
Children's Day 2025 Short Speech in Marathi pandit neharu jayanti Baldin : आजचा दिवस खूप खास आहे! आज, १४ नोव्हेंबर, आपण आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करतो. लहान मुलांवर अपार प्रेम करणाऱ्या नेहरूजींना आपण प्रेमाने 'चाचा नेहरू' म्हणतो. त्यांच्या जयंतीचा हा दिवस 'बालदिन' (Children's Day) म्हणून साजरा केला जातो.
बालदिन साजरा करण्याचे कारण म्हणजे पंडित नेहरूंचे म्हणणे होते की, "आजची मुले ही उद्याचा भारत आहेत." चला तर मग, या महान नेत्याला वंदन करूया आणि बालदिनाच्या निमित्ताने त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊया! खास विद्यार्थ्यांसाठी 5 भाषणं देत आहोत.

१. भाषण १: 'चाचा नेहरू' आणि प्रेम
आदरणीय शिक्षक आणि माझ्या मित्रांनो..
आज बालदिन आहे! बालदिन म्हणजेच भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांचा जन्मदिन. बालदिन म्हणजे खूप मजा आणि आनंद. हा दिवस आपण आपले लाडके चाचा नेहरू यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा करतो. नेहरूजींना फुले आणि लहान मुले खूप आवडायची. ते नेहमी मुलांमध्ये रमायचे, त्यांच्याशी खेळायचे. म्हणून आम्ही त्यांना 'चाचा नेहरू' म्हणतो.
चाचा नेहरूंकडून आपण एक गोष्ट शिकायची - ती म्हणजे सर्वांवर प्रेम करणे.
सर्वांना बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा! धन्यवाद!
२. भाषण २: बालपण म्हणजे देशाचे भविष्य
आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित श्रोतेहो,
आज देशाचे स्वातंत्र्यसेनानी आणि पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांची जयंती. नेहरूजी नेहमी म्हणायचे, "मुलांना प्रेमानेच जिंकता येते." ते मानत की, प्रत्येक मुलामध्ये एक मोठी शक्ती असते आणि ही शक्तीच आपल्या देशाचे भविष्य घडवते. म्हणूनच, त्यांनी नेहमी मुलांना चांगले शिक्षण आणि चांगले संस्कार मिळावेत यासाठी प्रयत्न केले. आज बालदिनाच्या दिवशी आपण वचन देऊया की, आपण खूप अभ्यास करू, चांगले वागू आणि चाचा नेहरूंच्या स्वप्नातील एक मजबूत आणि आनंदी भारत घडवू.
सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद!
३. भाषण ३: नेहरूंचे विचार आणि ज्ञान
माझ्या आदरणीय गुरुजनांना आणि मित्रांना नमस्कार,
आज आपण एका महान दूरदृष्टीच्या नेत्याची जयंती साजरी करत आहोत. ज्यांचे नाव आहे पंडीत जवाहरलाल नेहरु, पंडित नेहरू हे केवळ एक राजकारणी नव्हते, तर ते ज्ञान आणि विज्ञानाचे मोठे पुरस्कर्ते होते. त्यांनी नेहमी मुलांना शिकण्यासाठी प्रोत्साहित केले. 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा त्यांचा ग्रंथ त्यांची बुद्धिमत्ता दर्शवतो.
नेहरूजींचा संदेश स्पष्ट होता: ज्ञानी व्हा आणि तर्कशुद्ध विचार करा.
बालदिनाच्या या दिवशी, आपणही वाचनाची आणि नवीन गोष्टी शिकण्याची सवय लावून भारताच्या प्रगतीमध्ये आपले योगदान देऊया! धन्यवाद.
४. भाषण ४: बालदिन आणि बाल हक्क
आदरणीय व्यासपीठ,
बालदिन म्हणजे केवळ भारताचे पहिले पंतप्रधान म्हणजेच चाचा नेहरूंचा वाढदिवस नाही, तर हा दिवस बालकांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा दिवस आहे. प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण, पोषण आणि सुरक्षित बालपण मिळायला हवे, यासाठी नेहरूजींनी आग्रह धरला. एक सुजाण नागरिक म्हणून आपण याची जाणीव ठेवली पाहिजे की, आपल्या आजूबाजूच्या कोणत्याही मुलाचे बालपण हिरावले जाऊ नये. मुलांचे हसणे हे राष्ट्राचे हसणे आहे.
चला, आज आपण बाल हक्कांचा आदर करण्याचा आणि लहान मुलांना मदतीचा हात देण्याचा संकल्प करूया! धन्यवाद.
५. भाषण ५: एकता आणि बंधुता
प्रिय मित्रांनो,
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंच्या जीवनातील एक महत्त्वाचे मूल्य म्हणजे 'एकता आणि बंधुता' भारताच्या विविधतेत एकता टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. आपण सर्व मुले वेगवेगळ्या धर्माची, भाषेची आणि प्रांताची असू शकतो, पण आपण सर्व भारतीय आहोत आणि चाचा नेहरूंच्या 'नव्या भारता'चे भविष्य आहोत. बालदिनाच्या निमित्ताने, आपण एकमेकांशी प्रेमाने आणि आदराने वागण्याची शपथ घेऊया.
सर्वांना पुन्हा एकदा बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!












Click it and Unblock the Notifications