छत्तीसगडमधील गरियाबंदमध्ये पोलिस- नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 14 नक्षलवादी ठार
Chhattisgarh Naxal Encounter: छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यातून एक मोठी बातमी येत आहे. सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली आहे. या चकमकीमध्ये सुरक्षा दलांच्या जवानांनी 14 नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. ओडिशा आणि छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या कुल्हाडी घाटाच्या जंगलात ही चकमक घडली आहे.
रविवारी रात्री सुरू झालेली ही चकमक सोमवार रात्रीपर्यंत सुरू होती. या कारवाईत सुरक्षा दलांच्या जवानांनी 12 नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि शस्त्रे जप्त केली आहेत. या चकमकीत एक महिला नक्षलवादीही ठार झाली आहे. या कारवाईत कोब्रा बटालियनचा एक सैनिक जखमी झाला आहे. जखमी जवानाला विमानाने रायपूरला पुढील पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

फोटो सौजन्य- एआयएन
या कारवाईत छत्तीसगड आणि ओडिशा पोलिसांच्या 10 पथकांनी संयुक्तपणे कारवाई केली आहे. यामध्ये 3 एसओजी (ओडिशा), 2 छत्तीसगड पोलिस पथके आणि 5 सीआरपीएफ पथकांचा सहभाग होता. चकमकीदरम्यान सुरक्षा दलांनी त्वरीत परिसराला वेढा घातला त्यानंतर नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सध्या या घटनेनंतर कुल्हाडी घाट गाव आणि आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. भाटीगड स्टेडियमचे छावणीत रुप आलं आहे. तसेच याठिकाणी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत.
गरियाबंद: छत्तीसगढ़-ओडिशा सीमा पर छत्तीसगढ़ पुलिस के साथ मुठभेड़ में 14 से अधिक नक्सली मारे गए। मुठभेड़ अभी भी जारी है: छत्तीसगढ़ पुलिस
— ANI_HindiNews (@AHindinews) January 21, 2025
अधिक जानकारी की प्रतीक्षा है। pic.twitter.com/fZ60w8PQjV
मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी सैनिकांच्या शौर्याला केला सलाम
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांची प्रतिक्रिया शेअर केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, रविवार रात्रीपासून गरियाबंद जिल्ह्यातील मैनपूर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कुल्हाडीघाट भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 10 हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत.
मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी पुढे लिहिले की, यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि माननीय केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहाजींच्या दृढनिश्चयाला बळकटी देत, सुरक्षा दल सतत यश मिळवत आहेत आणि त्यांच्या लक्ष्याकडे वेगाने वाटचाल करत आहेत. सैनिकांनी मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे. त्यांच्या शौर्याला मी सलाम करतो. आमच्या डबल इंजिन सरकारच्या अंतर्गत, आमचे छत्तीसगड मार्च 2026 पर्यंत निश्चितच नक्षलवादापासून मुक्त होईल." अशी पोस्ट त्यांनी केली आहे.
गरियाबंद जिले के मैनपुर थाना अंतर्गत कुल्हाड़ीघाट क्षेत्र में सुरक्षाबलों की नक्सलियों के साथ रविवार रात से अब तक जारी मुठभेड़ में 10 से अधिक नक्सलियों के मारे जाने की खबर है।
— Vishnu Deo Sai (@vishnudsai) January 21, 2025
मार्च 2026 तक देश-प्रदेश में नक्सलवाद के खात्मे के यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी जी एवं माननीय…
दरम्यान 2024 मध्ये बस्तर विभागात नक्षलवाद्यांविरुद्ध सुरक्षा दलांची मोहीम मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली आहे. विजापूर आणि सुकमा येथे झालेल्या अनेक कारवायांमध्ये 50 हून अधिक नक्षलवादी ठार करण्यात सुरक्षा जवानांना यश मिळालं आहे. तसेच अनेक नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आणि अनेकांनी आत्मसमर्पण केलं आहे. ही कारवाई सुरक्षा दलांच्या नक्षलवाद्यांविरुद्धच्या सततच्या सक्रिय आणि कठोर कारवाईचा एक भाग आहे, जी परिसरात शांतता आणि सुरक्षा स्थापित करण्यासाठी केली जात आहे.
चकमकीशी संबंधित माहिती
- 20 जानेवारी रोजी सुरू झालेले हे ऑपरेशन कुल्हाडी घाट राखीव जंगलात करण्यात आलं.
- चकमकीदरम्यान 3 आयईडी (इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइसेस) देखील जप्त करण्यात आले.
- सुरक्षा दलांना 12 मृतदेह सापडले, त्यापैकी 10 जणांची ओळख पटली आहे.
- यापूर्वी 16 जानेवारी रोजी छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर झालेल्या चकमकीत 18 नक्षलवादी मारले गेले होते, ज्यात दामोदरचाही समावेश होता, ज्यांच्या डोक्यावर 50 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.












Click it and Unblock the Notifications