Buddha Purnima 2025 : बुद्ध पौर्णिमा 11 की 12 मे रोजी आहे, जाणून घ्या योग्य तारीख अन् महत्त्व?
Buddha Purnima 2025 Latest Marathi News : बुद्ध पौर्णिमेचा सण हा हिंदू आणि बौद्ध दोन्ही समुदायांसाठी एक अतिशय पवित्र आणि सन्मानजनक दिवस मानला जातो. हा दिवस केवळ भगवान गौतम बुद्धांच्या जन्माचे स्मरण करत नाही तर बोधगया येथील बोधिवृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली तो दिवस देखील आहे. म्हणूनच, हा दिवस त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे प्रमुख प्रतीक मानले जाते. गौतम बुद्धांची जयंती अर्थात बुद्ध पौर्णिमा कधी आहे, यााबाबत अनेकाना संभ्रम निर्माण होतो, चला तर त्याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया...!

2025मध्ये बुद्ध पौर्णिमा कधी आहे?
पंचांगानुसार, बुद्ध पौर्णिमा 2025 रोजी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी रविवार, 11 मे रोजी रात्री 8:01 वाजता सुरू होईल आणि सोमवार, 12 मे रोजी रात्री 10:25 वाजता संपेल.
उदय तिथीच्या मान्यतेमुळे, बुद्ध पौर्णिमेचा उत्सव सोमवार, 12 मे 2025 रोजी साजरा केला जाईल. या वर्षी, भगवान बुद्धांची 2587 वी जयंती साजरी केली जाणार आहे.
शुभ काळ आणि योग
या वर्षी बुद्ध पौर्णिमेला वरीयण आणि रवि योगाचा एक अतिशय शुभ संयोग तयार होत आहे.
रवि योग : सकाळी 5.32 ते 6.17
भाद्रवास योग : सकाळी 9.14 पर्यंत
धार्मिक मान्यतेनुसार, या योगांमध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, दान करणे आणि भगवान बुद्ध आणि विष्णूची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते.
बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व
भगवान बुद्ध हे भगवान विष्णूचे नववे अवतार मानले जातात, अशी देखील आख्यायिका सांगितली जाते. हा दिवस शांती, करुणा, अहिंसा आणि सत्याच्या शिकवणी आत्मसात करण्याची संधी प्रदान करतो.
या दिवशी ध्यान, साधना आणि दान यांचे विशेष महत्त्व आहे. भगवान बुद्धांच्या शिकवणी आजही मानवतेला मार्गदर्शन करत आहेत.
बुद्ध पौर्णिमेला केलेले स्नान, दान, ध्यान आणि सेवा केवळ पुण्यपूर्ण फळे देत नाहीत तर मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग देखील आपल्यासाठी मोकळा करतात.
बुद्ध पौर्णिमेला भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती
पौराणिक कथेनुसार, भगवान बुद्धांचे नाव पूर्वी सिद्धार्थ होते. सिद्धार्थ एक राजपुत्र होता. गृहस्थ असूनही आणि सर्व सुखसोयी असताना देखील सिद्धार्थला त्याचे जीवन ध्येयहीन वाटले. सिद्धार्थने सत्याच्या शोधात सात वर्षे घालवली. अखेर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांना बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली.
पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी राजकुमार सिद्धार्थ यांना बुद्ध म्हणून ज्ञानप्राप्ती झाली होती, म्हणून या वैशाख पौर्णिमेला त्यांचा नवीन जन्म मानला जातो.
तेव्हापासून या दिवसाला बुद्ध पौर्णिमा म्हणतात. बुद्ध पौर्णिमेला, भगवान बुद्धांनी खीर खाऊन उपवास सोडला, म्हणून या दिवशी खीर बनवून बुद्धांना प्रसाद म्हणून अर्पण केली जाते, अशी आख्यायिका सांगितली जाते.












Click it and Unblock the Notifications