बिहारमध्ये तिरंगी लढत का होतेय? मोदी फॅक्टर चालणार का; कुणाच्या हाती येणार सत्ता? वाचा 'हा' सर्व्हे
Bihar Election 2025 Opinion Poll : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच आता राजकीय वातावरण पूर्णपणे तापले आहे. ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, १४ नोव्हेंबरला सत्तेची चावी कोणाच्या हातात जाते, हे स्पष्ट होईल. मात्र, त्यापूर्वीच MATRIZE-IANS च्या ताज्या ओपिनियन पोलने बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

या सर्व्हेच्या निकालांनी स्पष्ट केले आहे की, लढत नक्कीच रंजक आहे, परंतु सध्या NDA (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) ची पकड मजबूत दिसत आहे. या ओपिनियन पोलनुसार, बिहारमध्ये NDA ची स्थिती भक्कम असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव (मोदी फॅक्टर) आजही कायम आहे. नितीश कुमार यांची लोकप्रियता टिकून आहे, परंतु प्रशांत किशोर (PK) आणि तेजस्वी यादव या दोघांच्या उपस्थितीमुळे ही लढत तिरंगी झाली आहे.
पंतप्रधान मोदी आजही 'विनिंग फॅक्टर' आहेत का?
या ओपिनियन पोलमधील सर्वात मोठा प्रश्न हाच होता की, नरेंद्र मोदी आजही बिहारमध्ये 'विनिंग फॅक्टर' आहेत का? सर्व्हेचे निकाल आश्चर्यकारक आहेत.
खूप मोठा परिणाम: ५७ टक्के लोकांनी सांगितले की पीएम मोदींचा परिणाम या निवडणुकीत होईल.
थोडा परिणाम: ८ टक्के लोकांनी म्हटले की त्यांचा परिणाम खूप कमी असेल.
कोणताही परिणाम नाही: २१ टक्के लोकांचे म्हणणे आहे की कोणताही परिणाम होणार नाही.
सांगता येत नाही: १४ टक्के लोकांनी यावर भाष्य केले नाही, सांगता येत नाही असा त्यांचा अंदाज आहे.
(या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, भाजपला आजही बिहारमध्ये मोदी फॅक्टरचा थेट फायदा मिळत आहे.)
सत्तेचा 'सरताज' कुणाच्या डोक्यावर?
२४३ जागा असलेल्या बिहार विधानसभेत या वेळी NDA (जनता दल युनायटेड + भाजप) ला १५० ते १६० जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, महागठबंधन (राष्ट्रीय जनता दल + काँग्रेस) ला ७० ते ८५ जागा आणि इतर पक्षांना ९ ते १२ जागा मिळू शकतात.
काय आहे ओपिनयन पोलचा कल?
- NDA (नितीश + भाजप) ४९ टक्के मतं मिळेल आणि १५० ते १६० जागा या युतीला मिळु शकेल.
- महाआघाडी (RJD + काँग्रेस) ३६ टक्के मतं मिळतील आणि ७० ते ८५ जागांवर यश येईल.
- इतर/नवीन पक्ष १५ टक्के मतं मिळतील ९ ते १२ जागा येऊ शकतील.
प्रशांत किशोर नवीन 'फॅक्टर', मोदींना आव्हान
या ओपिनियन पोलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रशांत किशोर (PK) यांनी तिसरा पर्याय म्हणून आपली जागा निर्माण केली आहे. ९% लोक त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छितात. जर हे समर्थन मतांमध्ये रूपांतरित झाले, तर बिहारच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
पोलचे निष्कर्ष काय? समजून घ्या
एकंदरीत, या ओपिनियन पोलचे निष्कर्ष सांगतात की बिहारमध्ये NDA ची स्थिती मजबूत आहे आणि मोदी फॅक्टर आजही प्रभावी आहे. नितीश कुमार यांची लोकप्रियता कायम आहे, परंतु प्रशांत किशोर आणि तेजस्वी यादव या दोघांच्या उपस्थितीमुळे ही लढत तिरंगी बनली आहे. आता १४ नोव्हेंबरला जनता बिहारचा नवीन नेता म्हणून कोणाला निवडते - नितीश यांची स्थिरता, तेजस्वी यांची युवाशक्ती की प्रशांत किशोर यांचे नवीन दृष्टिकोन - हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.












Click it and Unblock the Notifications