बिहारचा 'मुख्यमंत्री' कोण होणार? सस्पेन्स संपला! भाजपच्या 'फायरब्रँड' नेत्याची थेट 'किंगमेकर' घोषणा!
Bihar CM Suspense Ends : बिहार विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या राजकीय धुमश्चक्रीला आणि अनेक दिवसांच्या 'सस्पेन्स'ला आता अचानक पूर्णविराम मिळाला आहे! केंद्रीय मंत्री आणि भाजपचे धडाडीचे नेते गिरिराज सिंह यांनी मंगळवारी थेट मैदानात उतरत स्पष्ट केले की, 'जदयू-भाजप' आघाडीचा पुढील नेता कोण असेल. त्यांच्या या एका निर्णायक घोषणेने बिहारच्या सत्तासमीकरणांवरचे ढग दूर झाले असून, एनडीएतील 'खेचाखेची'च्या चर्चांना पूर्णपणे ब्रेक लागला आहे!

गिरिराज सिंहांचा स्पष्ट संदेश: 'नितीश कुमारच मुख्यमंत्री'!
राजकीय वर्तुळात पसरलेल्या सर्व 'भ्रमा'ची गरज नाही, असे स्पष्ट मत केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, भाजपची आणि जदयूची स्वतंत्र बैठक होईल, त्यानंतर एनडीएच्या सर्व घटक पक्षांच्या संयुक्त बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. मात्र, त्यांनी पूर्ण आत्मविश्वासाने सांगितले की, "मी विश्वासपूर्वक सांगतो की नितीश कुमार हेच मुख्यमंत्री बनतील." त्यांच्या या वक्तव्याने, भाजपने नेतृत्वाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केल्याचे संकेत मिळत आहेत.
वाड्रांच्या वक्तव्यावर गिरिराज सिंहांचा पलटवार
बिहार निवडणुकीच्या निकालांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून रॉबर्ट वाड्रा यांनी अनियमिततेचा आरोप केला होता. यावर गिरिराज सिंह यांनी अत्यंत कठोर शब्दात उत्तर दिले. त्यांनी टिप्पणी केली की, वाड्रा हे नक्कीच कोणाचे तरी जावई असतील, पण आता त्यांचा काळ राहिलेला नाही.
"लोकशाही आता राणीच्या पोटातून जन्माला येत नाही," असे म्हणत त्यांनी घराणेशाहीवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, जनताच ठरवते की मुख्यमंत्री कोण होणार. देशातील जनता वारंवार 'युवराजां'ना नाकारत आहे, याचमध्ये लोकशाहीची खरी ताकद आहे.
मुख्यमंत्री पदाच्या वादावर पडला 'निर्णायक' पडदा
गेल्या काही दिवसांपासून 'भाजप स्वबळावर दावा करणार का?', 'जदयू दबावाखाली आहे का?' अशा अनेक अटकळी बिहारच्या राजकारणात सुरू होत्या. या सर्व प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर गिरिराज सिंह यांचे हे वक्तव्य अत्यंत निर्णायक मानले जात आहे. त्यांच्या सार्वजनिक घोषणेने एनडीएतील मतभेदांना कोणतीही जागा नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. एनडीएच्या महत्त्वपूर्ण बैठका होण्यापूर्वीच भाजपच्या या फायरब्रँड नेत्याने मुख्यमंत्रिपदाचा सस्पेंस जवळपास संपवला आहे.












Click it and Unblock the Notifications