Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

थरारक..पाण्याने घेतला बळी! केंद्रीय मंत्री नित्यानंद यांच्या भाच्याची गोळी झाडून हत्या! बहीण जखमी

Bihar bhagalpur news : बिहारच्या भागलपूरमध्ये पाण्याच्या वादाने एक बळी गेला असून तो दुसरा तिसरा कुणाचा नसून खुद्द केंद्रीय गृहराज्यमंत्र्याच्या भाच्याचा.. पाण्याचा वाद रक्तरंजित खुनात बदलला. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांचे भाचे विश्वजित यादव यांचा भागलपूरमधील नवगचिया येथे परस्पर वादातून गोळी लागल्याने मृत्यू झाला. तर विश्वजित यादव यांची आई आणि केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांची बहीण जखमी झाली आहे.

Bihar bhagalpur news

पाण्यावरून भावाभावांतच वाद, रक्त सांडले!

केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांचे दोन भाचे विश्वजित यादव आणि जयजित यादव यांच्यात पाण्यावरून किरकोळ वाद सुरू होता. वाद वाढत गेल्याने एका भावाने दुसऱ्या भावावर गोळी झाडली, तर दुसऱ्याने त्याच्याकडील शस्त्र हिसकावून गोळीबार केला. या घटनेत विश्वजीत यादव यांचा मृत्यू झाला.

दुसऱ्या भावाचीही प्रकृती चिंताजनक

या घटनेत विश्वजित यांचा भाऊ जयजित यादवची प्रकृतीही चिंताजनक आहे. या गोळीबारात दोघांची आईही जखमी झाली असून तिच्यावर भागलपूर येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. जयजित यादव यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या आईवरही उपचार सुरू आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+