Bharat Bandh 9 July : उद्या 25 कोटी कर्मचारी, कामगार संपावर! काय बंद, काय सुरु राहणार जाणून घ्या
Bharat Bandh 9 July : देशात मोठ्या कालावधीनंतर भारत बंद पुकारण्यात आला आहे. बुधवारी (९ जुलै) रोजी देशातील २५ कोटींहून अधिक कर्मचारी देशव्यापी सर्वसाधारण संपावर जाणार आहेत. १० केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्या सहयोगी युनिट्सनी या संपाची हाक दिली आहे. कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदचा परिणाम सर्व अत्यावश्यक सेवांवर दिसून येणार आहे.

का पुकारला जातोय बंद?
देशातील जवळपास प्रमुख दहा कामगार संघटना एकत्र आल्या आहेत. सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि देशविरोधी धोरणांच्या निषेधार्थ हा देशव्यापी संप करण्यात येत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
काय आहेत कामगारांच्या मागण्या
कामगार संघटनांच्या मंचाने सांगितले की, त्यांनी गेल्या वर्षी कामगार मंत्र्यांना १७ कलमी मागण्यांचे निवेदन सादर केले होते. यामध्ये..
- सरकार गेल्या १० वर्षांपासून वार्षिक कामगार परिषद आयोजित करत नाही.
- चार नवीन कामगार संहिता लागू करून, सरकार कामगारांचे हक्क कमकुवत करत आहे.
- सामूहिक व्यवहार, संपाचा अधिकार आणि कामगार कायद्यांचे उल्लंघन गुन्हा मानला जात नाही, यासारख्या धोरणे कामगारांसाठी घातक आहेत.
- नोकऱ्यांचा अभाव, महागाई आणि घसरणारे वेतन यासारख्या समस्या वाढत आहेत. या सर्व मागण्यांवर सरकारने उपाय योजावेत असे कामगार संघटनांचे म्हणणे आहे.
काय बंद काय राहणार सुरु?
- भारत बंदचा परिणाम संपूर्ण देशावर होऊ शकतो.
- बंदचा सर्व क्षेत्रांच्या अत्यावश्यक सेवांवर परिणाम होऊ शकतो.
- बँकिंग
- विमा
- रेल्वे आणि इतर क्षेत्रांवर परिणाम
- टपाल सेवा
- कोळसा खाण
- राज्य वाहतूक
- कारखाने आणि इतर अत्यावश्यक सेवांवर परिणाम होऊ शकतो.
- बँक किंवा पोस्ट ऑफिसशी संबंधित कामांवर परिणाम
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या अमरजीत कौर म्हणाल्या की, आतापर्यंत अनेक मोठ्या शेतकरी आणि कामगार संघटनांनी संप प्रभावी करण्यासाठी पाठिंबा दिला आहे. शेतकरी आणि ग्रामीण कामगारांनीही देशाच्या विविध भागात संपाला पाठिंबा जाहीर केला आहे. NMDC लिमिटेड, इतर खनिजे, स्टील कंपन्या, राज्य सरकारी विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे कर्मचारी देखील संपात सामील होणार आहे. प्रमुख शेतकरी संघटना संयुक्त किसान मोर्चा आणि कृषी श्रमिक संघटना देखील यात सामील होत आहेत. यापूर्वी, शेवटचा देशव्यापी संप १६ फेब्रुवारी २०२४ रोजी पुकारण्यात आला होता.












Click it and Unblock the Notifications