Bahraich violence : बहराइच हिंसाचारातील सरफराज, तालिबचा एन्काउंटर! दोघांना लागली गोळी, प्रकृती गंभीर
Bahraich violence : उत्तर प्रदेशातील बहराईचमध्ये दुर्गापूजेच्या मूर्ती विसर्जनाच्या वेळी दगडफेक आणि हिंसाचार झाला. या हिंसाचारात राम गोपाल मिश्रा नावाच्या तरुणाचीही हत्या झाली होती. आता या घटनेत सहभागी असलेल्या संशयीत आरोपी सरफराज आणि तालीबचा एनकाऊंटर करण्यात आला असून दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. यातील एकाच्या पायाला गोळी लागली आहे.
याप्रकरणातील दोन आरोपी सरफराज आणि तालिब यांची नावे समोर आली होती.. बहराइचमध्ये रविवारी दुर्गापूजेच्या निमित्ताने मूर्ती विसर्जन यात्रेदरम्यान जातीय हिंसाचार उसळला तेव्हा 22 वर्षीय तरुण राम गोपाल मिश्रा याचा गोळ्या झाडून मृत्यू झाला आणि दगडफेक आणि गोळीबारात सुमारे 6 जण जखमी झाले होते.

बहराइचमध्ये झाला होता हिंसाचार
राम गोपाल मिश्रा यांच्या हत्येनंतर बहराइचमध्ये हिंसाचार पसरला होता. जमावाकडून मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. जमावाने घरे, दुकाने, शोरूम, रुग्णालये, वाहने इत्यादींना आग लावली, त्यानंतर बहराइच पोलिसांनी अनेक अज्ञात आणि काही नावाजलेल्या व्यक्तींविरुद्ध अनेक एफआयआर नोंदवले होते.
नेमके प्रकरण काय?
चार दिवसांपुर्वी हर्डी येथे दुर्गामूर्ती विसर्जनाच्या वेळी डीजे वाजवण्यावरून दुसऱ्या समाजाशी वाद झाला. या काळात हिंसाचार उसळला. दगडफेक आणि जाळपोळीसह 20 हून अधिक गोळीबार करण्यात आला. यामध्ये 22 वर्षीय राम गोपाल मिश्राचा या तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर येथील हिंसाचारात वाढ झाली. तणावाची परिस्थिती निर्माण झाला होता.
गोळीबार ठार झालेल्या युवकाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह घरी नेण्यात आला. यात 5 ते 6 हजारांचा जमाव जमला. मृतदेह घेऊन लोकांनी सुमारे 5 किमी अंत्ययात्रा काढली. पोलिसांनी समजावून सांगितल्यानंतर कुटुंबीय मृतदेह घरी घेऊन गेले, मात्र जमाव तेथून हटला नाही. जमावाने जाळपोळ केली होती.
पोलिसांनी या भागात छापे टाकून आतापर्यंत 55 पेक्षा अधिक संशयितांना अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये हिंसाचारादरम्यान परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. हजारोंच्या जमावाने एका हॉस्पिटलला आग लावली होती. अनेक शोरूम जळून खाक झाले होते. जमावाची गर्दी पाहून पोलिसांनी देखील माघार घ्यावी लागली होती.
आरोपींवर मोठी कारवाईचे दिले होते आश्वासन
मृत राम गोपाल मिश्रा यांचा मृतदेह महशी चौकाचौकात ठेवून आंदोलन करणाऱ्या लोकांची समजूत काढण्यात आली होती. महशी चौकाचौकात मृतदेह ठेवून आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थ आणि कुटुंबीयांसमोर स्थानिक आमदाराने मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली. आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले. आरोपींच्या घरांवर बुलडोझर फिरवला जाणार हेही सांगण्यात आले होते. त्यानंतर कुटुंबीयांनी मृताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचे मान्य केले होते.












Click it and Unblock the Notifications