जगाला सांगू PAK आमच्या मुलींना कसे विधवा बनवतोय, शिष्टमंडळात सामील होताच ओवैसी काय काय म्हणाले?
Asaduddin Owaisi News : भारताने 'ऑपरेशन सिंदूर' आणि सीमापार दहशतवादाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून सर्वपक्षीय शिष्टमंडळाची घोषणा करून जगभरात त्याची चर्चा करण्यासाठी हे शिष्टमंडळ जाणार आहे. या भारतीय शिष्टमंडळाच्या टीममध्ये एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचाही समावेश करण्यात आला आहे.
या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये भाजपचे खासदार रविशंकर प्रसाद, बैजयंत पांडा, जेडीयूचे संजय कुमार झा, डीएमकेच्या कनिमोझी करुणानिधी, काँग्रेसचे शशी थरूर, राष्ट्रवादीच्या (शरद पवार) सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे (शिंदे गट) श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे. प्रत्येक टीममध्ये 5 खासदार असणार आहेत. असदुद्दीन ओवैसी हे बैजयंत पांडा यांच्या टीमचा भाग असतील.

हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानविरुद्धच्या 'टीम इंडिया' शिष्टमंडळात समावेश केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. असदुद्दीन ओवैसी म्हणाले, आम्ही भारत सरकार आणि आमच्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहोत, आम्ही त्या देशांमध्ये जाऊन सांगू की आमच्या मुली कशा विधवा होत आहेत, आमची मुले अनाथ होत आहेत आणि पाकिस्तान आमच्या देशाला कसे अस्थिर करू पाहत आहे. ओवेसी म्हणाले, मी ज्या टीमचा भाग आहे, त्याचे नेतृत्व माझे चांगले मित्र बैजयंत जय पांडा करत आहेत.
#WATCH | Hyderabad, Telangana | AIMIM Chief Asaduddin Owaisi says, "...As of now, I know that the group I belong to will be headed by my good friend Baijayant Jay Panda. I think this group will include Nishikant Dubey, Phangnon Konyak, Rekha Sharma, Satnam Singh Sandhu, and… https://t.co/jdrdjAzEse pic.twitter.com/tMNd8RqvPY
— ANI (@ANI) May 17, 2025
पाकिस्तान आपल्या देशात दहशतवादाला प्रोत्साहन देतो
असदुद्दीन ओवैसी पुढे बोलतााना म्हणाले की, पाकिस्तान आपल्या देशात दहशतवादाला प्रोत्साहन देतो, हे आपल्याला संपूर्ण जगाला सांगावे लागेल. हा कोणत्याही पक्षाशी संबंधित विषय नाही. परदेशात जाण्यापूर्वी आपण एक बैठक देखील घेऊ. हे खूप मोठे काम आहे. ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करणार आहे, असेही ते म्हणाले.
भारताची पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था
जर भारतात अस्थिरता असेल तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होईल, हे कधीही विसरू नका, की सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबारात 26 नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. पूंछमध्ये 4 मुलांचा मृत्यू झाला. आमचे पाच सैनिक शहीद झाले. आम्ही हे सर्व देशांसमोर ठेवू... आम्ही आमच्या क्षमतेनुसार भारत सरकारचे दृष्टिकोन काय आहे, ते मांडू.
'कंधार विमान अपहरण ते पहलगाम हल्ल्यापर्यंतची कहाणी सांगावी लागेल'
असदुद्दीन ओवैसी म्हणाले, भारत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा बळी राहिला आहे. हे (माजी पाकिस्तानी राष्ट्रपती) मुहम्मद झिया-उल-हक यांच्या काळात सुरू झाले आणि आपण त्याबद्दल जगाला सांगितले पाहिजे. कंधार विमान अपहरण, 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला, 2001 मधील संसदेवरील हल्ला, उरी आणि पठाणकोट घटना, रियासी आणि पहलगाममधील पर्यटकांच्या हत्या याबद्दल सांगण्याची गरज आहे.
हे मानवतेसाठी धोका आहे. आपण भारताची कहाणी पुढे मांडली पाहिजे. पाकिस्तान स्वतःला इस्लामिक देश म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु भारतातही सुमारे 20 कोटी मुस्लिम आहेत. आपल्याला त्याबद्दल जगाला सांगण्याची गरज आहे.












Click it and Unblock the Notifications