भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे 15 प्रेरक विचार अन् गाजलेली वाक्यं; जे वाचून अभिमान वाटेल
Ambedkar Jayanti 2025 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यकर्तृत्व सूर्यासारखे प्रखर आणि तेजस्वी आहे. ते केवळ राज्यघटनेचे शिल्पकारच नव्हे तर जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ, तत्ववेत्ताही होते. अफाट ज्ञान, मेहनत, संघर्ष आणि ध्येयाच्या जोरावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे शिल्पकार बनले. शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा मुलमंत्र जो जगाला प्रेरक आहे.
14 एप्रिल हा डाॅ. बाबासाहेबांचा जन्मदिवस. 1891 ला त्यांचा जन्म झाला. ते भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्यांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले.

ब्रिटिशकालीन भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात. या महापुरूषाचे एक एक विचार अमुल्य आहे बाबासाहेबांनी त्यांची तत्व आयुष्यभर अमलात आणली. त्यांचे विचार आजही प्रेरणादायी हे आपण जाणून घेऊया.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि गाजलेली वाक्य
1. "आम्ही भारतीय आहोत, प्रथम आणि शेवटपर्यंत."
2. "चांगला माणूस गुरु असू शकत नाही आणि गुरु माणूस असू शकत नाही."
3. "महिलांनी मिळवलेल्या प्रगतीच्या प्रमाणात मी समाजाची प्रगती मोजतो."
4. "एकसंध अखंड आधुनिक भारत हवा असेल तर सर्व धर्मांच्या धर्मग्रंथांचे सार्वभौमत्व संपुष्टात आले पाहिजे."
5. "इतिहास विसरू नका, नाहीतर तो तुम्हाला पुन्हा एकदा गुलाम बनवेल."
6. "आमची लढाई आहे; संपत्तीसाठी किंवा सत्तेसाठी नाही. आमची लढाई आहे; स्वातंत्र्यासाठी; मानवी व्यक्तिमत्त्वाच्या पुनरुत्थानासाठी."
7. "राज्यघटना हे केवळ वकिलांचे दस्तऐवज नाही, ते जीवनाचे वाहन आहे आणि त्याचा आत्मा हा नेहमीच युगाचा आत्मा असतो."
8. "स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवणारा धर्म मला आवडतो."
9. "जर तुमचा आदरपूर्ण जीवन जगण्यावर विश्वास असेल, तर तुमचा स्व-मदतीवर विश्वास आहे जी सर्वोत्तम मदत आहे."

10. "माणूस नश्वर आहे. कल्पनाही तशाच आहेत. एखाद्या कल्पनेला जशी वनस्पतीला पाणी पिण्याची गरज असते तितकीच प्रसाराची गरज असते. नाहीतर दोन्ही कोमेजून मरतात."
11 "स्वतंत्रता म्हणजे काय हे ज्याला कळले नाही, त्याला गुलामगिरीशिवाय पर्याय नाही."
12 " शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे, ज्यांनी पिले तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही"
13 "माझ्या नावाचा जप करण्यापेक्षा, मी दाखवलेल्या मार्गावर चालणे चांगले."
14 "कोणत्याही गोष्टीची चव बदलता येते पण विष अमृतात बदलता येत नाही."
15 " शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा."












Click it and Unblock the Notifications