मोठी बातमी ! केजरीवाल का हारले? ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी सांगितलं खरं कारण...
दिल्ली विधानसभा निवडणुकीची आज सकाळपासून मतमोजणी सुरू झाली आहे. सध्याच्या कलानुसार भाजप ४४ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे गेली दहा वर्षे सत्तेत असलेले आम आदमी पक्षाला फक्त २६ जागांवर आघाडीवर दिसत आहे. दिल्लीतील याच सत्ताबदलाच्या कलानुसार आता राजकीय व सामाजिक वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे एक विधानही समोर आले आहे. अरविंद केजरीवाल का हारले, याचा लेखाजोखाच हजारे यांनी मांडला. त्यांचे हेच वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.

काय म्हणाले अण्णा?
दिल्ली विधानसभेच्या सुरुवातीच्या कलानुसार पत्रकारांनी अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया विचारली. त्यावर अण्णा हजारे म्हणाले, "त्यांनी दारूच्या दुकानांचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी दारू का आणली? कारण त्यांना पैसा आणि संपत्ती हवी होती. या दारूमुळे ते कुप्रसिद्ध झाले. त्यामुळे लोकांनाही त्यांना नाकारण्याची संधी मिळाली. मी अगोदरपासून सांगत होतो की, निवडणूक लढवताना उमेदवाराचे चारित्र्य चांगले असले पाहिजे, विचार चांगले असले पाहिजेत आणि प्रतिमेवर कोणताही डाग नसावा. पण, त्यांना (आप) हे समजले नाही. ते दारू आणि पैशात अडकले. यामुळे त्यांची प्रतिमा खराब झाली आणि म्हणूनच निवडणुकीत ते कमी पडले.
#WATCH रालेगण सिद्धि (महाराष्ट्र): दिल्ली विधानसभा चुनाव के नतीजों पर समाज सेवक अन्ना हजारे ने कहा, "...लोगों ने नई पार्टी पर विश्वास किया था। लेकिन आगे चलकर शराब की दुकान बढ़ाने के कारण उसकी(अरविंद केजरीवाल) छवि खराब होने लगी। निस्वार्थ भाव से जनता की सेवा ही भगवान की पूजा होती… pic.twitter.com/ViZzBbHWA7
— ANI_HindiNews (@AHindinews) February 8, 2025
अण्णा 'आप'बाबत काय म्हणाले?
हजारे म्हणाले की, लोकांनी पाहिले आहे की ते चारित्र्याबद्दल बोलतात पण दारूला बढावा देतात. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत राहतात. कोणीतरी तो दोषी नाही हे सिद्ध करावे लागेल. सत्य हे सत्यच राहील. जेव्हा बैठक झाली तेव्हा मी पक्षाचा भाग राहणार नाही असे ठरवले आणि त्या दिवसापासून मी पक्षापासून दूर आहे. चारित्र्य आणि विचार जपले पाहिजे. राजकारणात हे सगळं चालत नाही, असं म्हणत अण्णा हजारे यांनी आपपासून दूर राहण्याचं कारण सांगितलं.












Click it and Unblock the Notifications