नवीन वर्षात बदलांसह निरोगी जीवनशैली सुरू करा, आजार तुम्हाला स्पर्शही करणार नाहीत, 'या' आहेत टीप्स

New Year 2025 Make lifestyle changes for good health : आज 1 जानेवारी 2025 नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. 2024 मध्ये अनेक अशा गोष्टी आणि चुकीच्या सवयी अनेकांना असतील ज्यामुळे झोपेपासून, जीवनशैली आणि आजारापर्यंत अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. म्हणतात ना..आरोग्यम् धनसंपदा आता नवीन वर्षात तुमचे हेच आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर तुम्हाला काही गोष्टींमध्ये बदल करावे लागतील जर हे बदल आपण केले तर आपले नवीन वर्ष सुख, समृद्धीचे जाईल.

नवीन वर्ष एक नवीन सुरुवात करण्याची संधी देते आणि दरवर्षी आम्ही त्यासंबंधित आरोग्याचे अनेक संकल्प पुढे नेले जातात. हे संकल्प बऱ्याचदा काही आठवड्यांत विसरुन जातात. कारण आपण हाताळू शकतो त्यापेक्षा जास्त अपेक्षा असतात आणि काही गोष्टी आपल्यावर हावी होतात. या वर्षी, आरोग्य उद्दिष्टे निश्चित करा आणि ते वर्षाच्या अखेरपर्यंत तडीस न्या. तुमच्या जीवनात काय बदल होतात, मग बघा.

New Year 2025 Make lifestyle changes for good health

रोज 20 मिनिटे चालणे, निरोगी आहार बदलणे किंवा स्क्रीन टाइम कमी करणे. छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला दीर्घकाळासाठी प्रेरित ठेवतील आणि तुमच्या जीवनशैलीत मोठे बदल करण्यात मदत करतील. तंदुरुस्त राहण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या संकल्पाला चिकटून राहण्यासाठी या वर्षी काय करावे हे जाणून घेऊया?

हेही वाचा Health News : यूरिन इंफेक्शन ते सर्दी-खोकल्यापर्यंत गुणकारी आहे अजवानची चहा पिऊन तर पाहा!

सकाळी लवकर उठण्याची सवय लावा

दिवसभर उर्जावान आणि ताजेतवाने राहण्यासाठी, लवकर उठण्याची सवय लावा सकाळी ही चांगली सवय तुमच्या शरीराला निरोगी ठेवते हे अगदी वडीलधारेही म्हणतात. सकाळी लवकर उठून ध्यान आणि अभ्यास केल्याने मन शांत राहते आणि यशाकडे वाटचाल होते. यासोबतच ही सवय दिवसभर ताजेतवाने वाटण्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

नियमित व्यायाम करा

तुम्हाला आवडणारी शारीरिक क्रिया निवडा आणि दिवसातून किमान 30 मिनिटे व्यायाम करण्याचे ध्येय ठेवा. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक शांतीसाठी योगासने किंवा ध्यानाचा सराव करा. या सवयी तुम्हाला निरोगी आणि संतुलित जीवन जगण्यास मदत करतील.

हेही वाचा Beauty Health Tips : तुम्हालाही कोरियन स्किन हवी आहे? 'हे' आहे ग्लास स्कीनचं रहस्य...घ्या जाणून

रोजची न्याहारी टाळू नका

निरोगी शरीरासाठी नाश्ता खूप महत्वाचा आहे. सलाद, चीज, दूध आणि फळे यांसारख्या आरोग्यदायी पदार्थांचा नाश्त्यात समावेश करा. न्याहारी वगळल्याने जास्त खाण्याचा धोका वाढू शकतो आणि शरीरात उर्जेची कमतरता निर्माण होऊ शकते, म्हणून कधीही न्याहारी स्किप करु नका.

तणाव कमी करा

तणाव कमी करण्यासाठी, ध्यान आणि योगाचा सराव करा. आपल्या छंदांसाठी वेळ काढा आणि मित्र आणि कुटुंबियांसोबत दर्जेदार वेळ घालवा. या सर्व सवयी मानसिक शांती आणि तणावापासून मुक्त होण्यास मदत करतील.

हेही वाचा Diwali 2024 : सण-उत्सवात आपलं आरोग्य तंदुरुस्त ठेवायचं असेल तर या टिप्स महत्वाच्या

भरपूर पाणी प्या

शरीराला ऊर्जावान आणि हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे महत्वाचे आहे. पाणी कमी प्यायल्याने थकवा, अशक्तपणा आणि आजार होऊ शकतात. पुरेसे पाणी प्यायल्याने विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि संसर्ग टाळतात.

नियमित तपासणी करा

वार्षिक आरोग्य तपासणी वर्षातून एकदा करा आणि दर 6 महिन्यांनी दातांची तपासणी करा. या नियमित तपासणीमुळे तुमचे आरोग्य राखण्यात आणि वेळेत समस्या ओळखण्यास मदत होईल.

चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक भरपूर झोप घ्या

रोज सात ते आठ तास झोपा आणि झोपण्याची व उठण्याची वेळ नियमित ठेवा. झोपण्यापूर्वी शांत वातावरण तयार करा जेणेकरून झोप चांगली लागेल. या सवयी तुम्हाला दिवसभर ऊर्जा आणि आरोग्य राखण्यास मदत करतील.

हेही वाचा Winter Health Tips : हिवाळ्यात गरम पाणी पिताय? तुमच्या शरीरासाठी योग्य की अयोग्य? जाणून घ्या

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+