Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Beauty Health Tips : तुम्हालाही कोरियन स्किन हवी आहे? 'हे' आहे ग्लास स्कीनचं रहस्य...घ्या जाणून

Beauty Health Tips : दरवेळी नवनवीन ट्रेंड ब्युटी इंडस्ट्रीमध्ये येत असतात काही दिवसांनी त्यांची क्रेझ कमी होते. के पॉप इंडस्ट्रीबद्दल भारतीयांचं कुतुहूल निर्माण झालं. त्यांचे गाणे आणि के ड्रम भारतातल्या लोकांना आवडू लागले,फॅन फॉलोविंग वाढलं आणि मग इतके सुंदर दिसणारे हे कोरियन लोक विशेषतः महिला त्यांचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी काय करतात? हा प्रश्न अनेकांना पडतोच.

अगदी चेहऱ्यावर एकही सुरकुती नाही आणि प्लॅस्टिकच्या बाहुलीसारख्या दिसणाऱ्या या महिलांचं ब्युटी सिक्रेट आहे तरी काय? जाणून घेऊयात या लेखातून..

Beauty Health Tips

खर्च करण्याची गरज नाही

आता हि कोरियन ब्युटी मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रोडक्टवर हजारो रुपये खर्च करण्याची गरज नाही. भारतीय आयुर्वेदात जस चेहरा गोरा करण्यासाठी, उजवण्यासाठी वेगवेगळ्या आयुर्वेदिक गोष्टींचा आणि फेस पॅकचा वापर आपण करतो, आपली आई, आज्जी जे घरगुती उपाय आपल्याला सांगते अगदी तसंच वर्षानुवर्षे कोरिअयन महिला या गोष्टींचा वापर त्यांचं सौंदर्य वाढवण्यासाठी करत आल्या आहेत.

कोरियन स्किन मिळवण्याचा सर्वात सोप्पा उपाय

  • कोरियन स्किन केअर रूटीनमध्ये त्वचा आतून स्वच्छ करून ती ग्लोइंग करण्याचा प्रयत्न केला जातो आणि कोरियन स्किन मिळवण्याचा सर्वात सोप्पं उपाय म्हणजे तांदळाचा वापर.
  • भारतात जसं हळद,डाळीचं पीठ आणि चंदन वैगेरे सर्रास सौंदर्यासाठी वापरलं जात तसाच कोरियात तांदूळ त्वचेला चमकण्यासाठी वापरतात. जसे तांदळाचे पाणी, तांदळाचे पिठ आणि तांदळाचे पीठ.
  • आपल्या सर्वांच्या घरी तांदूळ असतो, मग आपण त्याचा वापर स्वच्छ त्वचा मिळविण्यासाठी का करू शकत नाही. तांदूळ त्वचेला आतून स्वच्छ करण्यास आणि ती निरोगी ठेवण्यास मदत करू शकतो.

मग आता ह्या तांदळाचा आपल्या चेहऱ्यावर वापर कसा करायचा तर त्यासाठी काही खास आणि लगेचच रिजल्ट देणारे फेसपॅक अगदी घरात उपलब्ध असतील त्या गोष्टींपासून कसे तयार करायचे हे जाणून घेऊयात.

तांदळाच्या पिठाच्या फेसपॅक कसा बनवायचा?

  • तांदळाच्या पिठाच्या फेसपॅक कसा बनवण्यासाठी अगोदर तांदूळ बारीक करून त्याची पावडर बनवावी लागेल.
  • किंवा तुम्ही तांदूळ धुवूनसुद्धा बारीक करू शकतात यानंतर हे तांदूळ पीठ 1 भांड्यात घालून त्यामध्ये थोडं दही, कोरफड आणि मध मिक्स करून १० मिनटं चेहऱ्यावर लावून ठेवा.
  • नंतर हलक्या हाताने स्क्रब करून चेहरा स्वतःच धुवून घ्या. जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही त्यात दूध आणि केशरही टाकू शकता. यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते आणि मृत पेशी काढून टाकतात आणि चमकदार त्वचा मिळण्यास मदत होते.
  • तांदळाच्या पिठापासून बनवलेला, हा फेस पॅक त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करतो.
  • त्वचा शांत करतो आणि तुम्हाला स्वच्छ आणि चमकदार त्वचा मिळविण्यात मदत करतो.
  • तांदळाच्या पिठाची खास गोष्ट म्हणजे ते उत्कृष्ट स्क्रबसारखे काम करते आणि त्वचेच्या छिद्रांमधील घाण साफ करण्यास मदत करते.
  • याशिवाय, मुरुमांच्या जीवाणूंचा प्रसार रोखण्यात आणि त्वचेला आतून डिटॉक्सिफाय करण्यात मदत होते. त्यामुळे या सर्व कारणांसाठी तुम्ही तुमच्या त्वचेसाठी हा फेस पॅक वापरावा.

तांदळात अमीनो ॲसिड आणि जीवनसत्त्वे

तांदळात अमीनो ॲसिड आणि जीवनसत्त्वे असतात, जे त्वचेला गोरे करण्याचे काम करतात. जर तुम्हाला चेहरा उजळवायचा असेल तर गोरा रंग येण्यासाठी तांदूळ बारीक वाटून घ्या. त्यात मध आणि दही मिसळून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा.अर्धा तास असेच ठेवा, नंतर हातावर पाणी लावून चेहरा हलक्या हाताने स्क्रब करा, ५ मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा. हा फेस पॅक सुरकुत्या आणि काळी वर्तुळे देखील दूर ठेवतो.

हे करा..

चेहऱ्यावरील मुरुम, सुरकुत्या आणि टॅनिंगपासून सुटका है असेल तर एका भांड्यात 2 चमचे तांदळाचे पीठ घ्या. त्यात एक चमचा मध आणि एक चमचा कच्चे दूध घालून मिक्स करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 10-15 मिनिटे सुकण्यासाठी सोडा. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील मुरुम, सुरकुत्या आणि टॅनिंगपासून सुटका होईल. त्याच्या नियमित वापराने तुम्हाला चमकदार आणि डागरहित त्वचा मिळू शकते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+