Diwali 2024 : सण-उत्सवात आपलं आरोग्य तंदुरुस्त ठेवायचं असेल तर या टिप्स महत्वाच्या
Diwali 2024 : ऑक्टोबर महिन्यात अनेक सण उत्सव असतात.नवरात्री उत्सवापासून सणासुदीला सुरुवात झाली असून प्रत्येकजण आपापल्या कुटुंबीयांसोबत सण उत्सव साजरा करतो. विशेष करुन या ऋतूमध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे कोलेस्ट्रॉल, मधुमेह, स्ट्रोक आणि हृदयाशी संबंधित अनेक आजारांना आपण बळी पडू शकतो..
या महिन्यात दसरा आणि दिवाळी असे मोठे दोन सण आहेत. या महीन्यात लोक आनंदात आपले सण उत्सव साजरे करण्यात व्यस्त असतात. त्यामुळे बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमध्ये आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. सणासुदीच्या काळात चविष्ट पदार्थ आणि भरपूर मिठाईचा आस्वाद घेताना आपण चांगल्या सवयी सोडतो. ज्यामुळे आपण आजारीही पडतो आणि आपली तब्येत बिघडते. अशावेळी खाण्यापिण्याची सवयी बद्दल काळजी घेणे गरजेचे आहे.

सणासुदीच्या काळात प्रत्येक घरात मिठाई तयार केली जाते, जी आपण लोभापोटी खातो. पण थोडासा निष्काळजीपणाही हृदयाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. मिठाईमध्ये वापरल्या जाणाऱ्या तेल आणि खव्यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ आढळून येते. ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जास्त साखर खाल्ल्याने रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे सणासुदीच्या काळात मिठाईचे सेवन मर्यादित प्रमाणातच करावे.
सणासुदीच्या काळात साखरेपासून बनवलेल्या मिठाईंबरोबरच अनेक नमकीन पदार्थही तयार केले जातात, ते पाहून आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही. आणि शेवटी त्याचे मोठ्या प्रमाणात सेवन करतो, जे हृदयासाठी हानिकारक आहे. जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत घरी बनवलेल्या पदार्थांमध्ये कमीत कमी मीठ वापरावे.जेणेकरुन आपले आरोग्य तंदुरुस्त राहील.












Click it and Unblock the Notifications