Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Winter Health Tips : हिवाळ्यात गरम पाणी पिताय? तुमच्या शरीरासाठी योग्य की अयोग्य? जाणून घ्या

Winter Health Tips : बदलत्या वातावरणानुसार हिवाळ्यात सर्दी, पडसं, खोकला, असे आजार डोकंवर काढतात, त्यामुळे आपण तब्येतीची विशेष काळजी घेत असतो. बदलत्या हवामानामूळे आजारांपासून दूर राहण्यासाठी अनेक घरगुती उपाय देखील केले जातात.. त्यातच अनेकजण बदलत्या ऋतूत सर्दी, खोकला असे आजार होऊ नये म्हणून सतत गरम पाणी पित असतात.

कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जातं कारण, त्यामुळे पाचन तंत्र, रक्त परिसंचरण सुधारते आणि तणाव ही कमी होतो. मात्र, तुम्हाला माहितीये का खूप गरम पाणी प्यायल्यास त्याचे काही वाईट परीणामही शरीरावर होऊ शकतात. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असणार गरम पाणी आरोग्यासाठी चांगले की वाईट आणि याचे नेमके काय परिणाम होतात. हेच आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. यात एक व्हिडिओही तुम्हाला पाहता येणार आह.

Winter Health Tips

1.कोमट पाणी पिण्याचे फायदे

कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. गॅस आणि बद्धकोष्ठता यांसारख्या पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी हे गरम पाणी उपयुक्त आहे, तर गरम पाणी प्यायल्याने त्वचा चमकदार होते.. शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यास मदत करते, गरम पाणी रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे स्नायूंना आराम मिळतो आणि वेदनांपासून आराम मिळतो.

2. कोमट पाणी पिण्याचे तोटे

तुम्ही सतत खूप गरम पाणी प्यायल्यास शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडू शकते. डिहायड्रेशनसारख्या समस्या तसेच किडनीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, शरीरातील अतिरिक्त पाणी काढून टाकण्यासाठी किडनीला जास्त मेहनत करावी लागते, ज्यामुळे किडनीवर दबाव वाढू शकतो. खूप गरम पाणी प्यायल्याने घसा आणि जीभेला जळजळ होऊ शकते. खूप गरम पाणी प्यायल्याने निद्रानाशेची समस्या उद्धवू शकते.

हेही वाचा : Beauty Health Tips : तुम्हालाही कोरियन स्किन हवी आहे? 'हे' आहे ग्लास स्कीनचं रहस्य...घ्या जाणून

3 . किती तापमानापर्यंत पाणी पिणे योग्य?

136°F (57.8°C) तापमानातले पाणी पिण्यासाठी योग्य मानले जाते. या तापमानात भाजण्याचा धोका कमी असतो.

4. पाणी उकळून थोडे थंड करून प्या

पाणी आवश्यकतेपेक्षा जास्त गरम करुन पिणे आरोग्यासाठी योग्य नसतं.. त्यामुळे पाणी गरम करुन कोमट किव्हा पुर्णपणे थंड करुनचं पाणी पिणे हिवाळ्यात फायदेशीर ठरू शकते, परंतु जास्त गरम पाणी पिणे टाळायला हवं.

हेही वाचा : जयपूरमध्ये आढळला गाईच्या शेणाची भेसळयुक्त चहा आणि कॉफी! ,पिण्यापूर्वी खरी की खोटी ओळखायची? वाचा

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+