Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'ही' 3 कारणं पुरुषांमधील वंध्यत्वाचे प्रमाण वाढण्यास ठरत आहेत कारणीभूत; डॉक्टरांचा मोलाचा सल्ला वाचा

Male Infertility Rising Due to Desk Jobs and Poor Sleep : बदलती जीवनशैली आणि कामाचा वाढता ताण यामुळे पुरुषांच्या आरोग्याबाबत एक चिंताजनक वास्तव समोर आले आहे. जिथे पूर्वी वंध्यत्व ही केवळ महिलांची समस्या मानली जात होती, तिथे आता डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे की, सुमारे ३० ते ४० टक्के प्रकरणांमध्ये वंध्यत्वास पुरुष कारणीभूत आहेत. गेल्या ६ वर्षांत पुरुषांमधील वंध्यत्वाच्या समस्येत २०-२५ टक्क्यांनी वाढ झाली असून, ३१ ते ३५ वयोगटातील तरुण सर्वाधिक प्रभावित होत आहेत.

Male Infertility

डेस्क जॉब आणि लॅपटॉपचा अतिवापर घातक

आयटी क्षेत्रातील लोक आणि व्यावसायिकांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणावर आढळते. तासनतास लॅपटॉपसमोर बसून काम केल्यामुळे कमरेच्या खालच्या भागात उष्णता निर्माण होते, ज्याचा थेट परिणाम स्पर्म (शुक्राणू) निर्मितीवर होतो. कामाचा ताण, रात्रीची शिफ्ट आणि विस्कळीत झालेली झोप यामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते, ज्यामुळे शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता कमी होते.

जिम सप्लीमेंट्स आणि स्टेरॉइड्सचा धोका

आजच्या काळात फिट राहण्यासाठी जिममध्ये जाण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, प्रशिक्षित मार्गदर्शकाशिवाय घेतलेले प्रोटीन पावडर, स्टेरॉइड्स आणि एनर्जी ड्रिंक्स पुरुषांच्या फर्टिलिटीवर विपरीत परिणाम करत आहेत. सुमारे १०-१५ टक्के प्रकरणांमध्ये असे दिसून आले आहे की, सप्लीमेंट्समुळे शरीरातील नैसर्गिक टेस्टोस्टेरॉनची पातळी बिघडते आणि शुक्राणूंची हालचाल मंदावते.

संक्रमणाकडे दुर्लक्ष करू नका

डॉक्टरांच्या मते, ग्रामीण आणि निमशहरी भागात स्वच्छतेचा अभाव आणि संसर्गामुळे वंध्यत्व वाढते. जोडीदाराला होणारे यीस्ट इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन शरीरसंबंधांच्या माध्यमातून पुरुषांपर्यंत पोहोचते. वेळीच उपचार न घेतल्यास यामुळे गुप्तांगांमध्ये वेदना आणि स्पर्म काउंट कमी होण्यासारख्या समस्या उद्भवतात.

डॉक्टरांचा सल्ला: जीवनशैलीत करा 'हे' बदल

बोल्ड स्कायने मदरहुड फर्टिलिटीच्या तज्ज्ञ डॉ. मंदावी राय आणि नोव्हा आयव्हीएफच्या डॉ. पारुल गुप्ता खन्ना यांचा सल्ला प्रकाशित केला त्यानुसार, पुरुषांना या डाॅक्टरांनी महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.

  • नियमित तपासणी: वंध्यत्वाच्या समस्येसाठी केवळ स्त्रियांना दोष न देता पुरुषांनीही 'सीमेन ॲनॅलिसिस' (वीर्य तपासणी) करून घ्यावी.
  • आहार आणि व्यायाम: झिंक, अँटीऑक्सिडंट्सयुक्त आहार घ्या आणि नियमित पण हलका व्यायाम करा.
  • व्यसनांपासून दूर राहा: मद्यपान आणि सिगारेटमुळे शुक्राणू कमकुवत होतात, ते पूर्णपणे टाळा.
  • झोप आणि विश्रांती: दिवसाला ७-८ तासांची शांत झोप हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी आवश्यक आहे.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+