आईसक्रिममध्ये डिटर्जंट! 'हा' होऊ शकतो त्रास, खरी अन् बोगस Icecream कशी ओळखायची? 6 मुद्यात समजून घ्या
Detergent in ice cream can affect the kidneys : हल्ली उन्हाळ्याचे दिवस आणि आपण दुकानवर जातो आणि बिनधास्त आईसक्रीम घेऊन खातो पण याच आईसक्रिममध्ये नेमके काय काय घटक असतात बहुतांशजण कधी पाहत नाही. ते पदार्थ काय आहेत, त्यात काय मिसळलेले असते आणि एक्सपायरी डेटही आपण पाहत नाही. पण या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने तुमच्या आरोग्याला धोके उत्पन्न होतात.
कर्नाटकमध्ये अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन (FDA) ने अलिकडेच छापे घातले. यामध्ये अनेक आईस्क्रीम युनिट्स अत्यंत घाणेरड्या आणि अस्वच्छ परिस्थितीत कार्यरत असल्याचे आढळून आले. जवळजवळ अर्ध्या युनिट्समध्ये गंभीर प्रमाणात भेसळ आढळून आली, यामध्ये कृत्रिम दूध, डिटर्जंट्स, युरिया, कृत्रिम रंग आणि सॅकरिन सारख्या धोकादायक रसायनांचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक बाबी समोर आली आहे.

एवढेच नाही तर आइस्क्रीमसोबतच आइस कँडी आणि कोल्ड्रिंक्समध्येही घाणेरडे पाणी आणि जास्त चवीचे पदार्थ आढळून आले. ही घटना उघडकीस आल्यानंतर, बोल्डस्कायने आरोग्यविषयक वृत्त दिले. त्यानुसार, प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट आणि आहारतज्ज्ञ डॉ. रेबेका पिंटो यांनी सोशल मीडियावर सतर्कता दर्शविली आणि सांगितले की, आईस्क्रीमचा पोत मलईदार दिसावा यासाठी त्यात डिटर्जंटसारख्या गोष्टी मिसळल्या जात आहेत. पण त्याचा शरीरावर होणारा परिणाम अत्यंत घातक ठरू शकतो.
2021 मध्ये 'हेल्थलाइन' मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, डिटर्जंटचे सेवन केल्याने पोटात जळजळ, उलट्या, जुलाब आणि अगदी अवयव निकामी होऊ शकतात. डिटर्जंट्समध्ये आढळणारे ब्लीचिंग एजंट्स कपडे स्वच्छ करण्यासाठी असतात, मानवी पचनसंस्थेसाठी नाही.
अशा आईसक्रिम खाल्ल्याने काय होते?
बोल्ड स्कायने दिलेल्या वृत्तात डॉ. पिंटो म्हणतात की, जेव्हा हे भेसळयुक्त पदार्थ सेवन केले जातात तेव्हा ते केवळ घसा आणि पोटात जळजळ करत नाहीत तर खाताना जर ते श्वासात घेतले तर ते खोकला, श्वास घेण्यास त्रास आणि फुफ्फुसांवर परिणाम करू शकतात. त्यांचे जास्त काळ सेवन केल्याने यकृत, मूत्रपिंड आणि मज्जासंस्थेचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे शरीरात कायमस्वरूपी समस्या निर्माण होऊ शकतात.
मग..आईसक्रिम खावी की नाही?
- जर आईसक्रिममध्ये घातक पदार्थ टाकले जात असतील तर आपण आईसक्रिम खावी की नाही हा प्रश्न येतो. त्यावर काही खास उपायही आहे. ते खालीलप्रमाणे..
- आईसक्रिम खाण्याचा सवोत्तम मार्ग म्हणजे घरी आईस्क्रीम बनवणे आणि खाणे.
- जेणेकरून तुमचे आईसक्रिममधील घटकांवर आणि स्वच्छतेवर पूर्ण नियंत्रण असेल.
- बाजारातून आईस्क्रीम खरेदी करताना, त्याचा ब्रँड, पॅकिंगची स्थिती, एक्सपायरी डेट आणि FSSAI मार्क नक्की तपासावा.
- पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला आईस्क्रीम खाण्याची इच्छा होईल तेव्हा त्याच्या चवीचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो का याचा विचार करा.
खरी आणि बनावट आईस्क्रीम कशी ओळखायची?
1. पॅकेटच्या मागील बाजूस लिहिलेले घटक वाचा : जेव्हा तुम्ही आईस्क्रीम खरेदी करता तेव्हा त्याच्या पॅकेटवर लिहिलेले घटक काळजीपूर्वक वाचा. जर त्यात वनस्पती तेल, पाम तेल किंवा कृत्रिम रंगांचा उल्लेख असेल, तर ते खरे आईस्क्रीम नसून गोठवलेले मिष्टान्न आहे. गोठवलेल्या मिष्टान्नांमध्ये सहसा दूध नसते तर त्याऐवजी शरीरासाठी हानिकारक कृत्रिम घटक असतात.
2. पाण्याची चाचणी करा : एका ग्लास स्वच्छ पाण्यात थोडेसे वितळलेले आईस्क्रीम घाला. खरा आइस्क्रीम पाण्यात सहज विरघळेल. जर पाण्यात फेस येऊ लागला किंवा बुडबुडे दिसले तर ते भेसळयुक्त आहे असे समजावे.
3. रबिंग टेस्ट (बोटांनी टेस्टिंग) : बोटांच्या मध्ये थोडेसे आईस्क्रीम घासणे. जर ते साबणासारखे चिकट वाटत असेल तर समजून घ्या की त्यात डिटर्जंट किंवा इतर कृत्रिम पदार्थ मिसळले आहेत.
4. वासाने ओळखा : खऱ्या आईस्क्रीममध्ये दूध, क्रीम, व्हॅनिला किंवा स्ट्रॉबेरीसारखे नैसर्गिक सुगंध असतात. दुसरीकडे, बनावट आईस्क्रीममध्ये तीव्र वास आणि कृत्रिम चव असते जी रासायनिक असते.
5. आईसक्रिमचा पोत : अनुभवा खऱ्या आईस्क्रीममध्ये गुळगुळीत आणि मलाईदार पोत असते. बनावट किंवा भेसळयुक्त आईस्क्रीममध्ये अनेकदा बर्फाचे स्फटिक किंवा दाणेदारपणा असतो. तोंडात शिरताच ते जाणवते.
6. टिश्यू पेपर : टेस्ट टिश्यू पेपरवर एक चमचा आइस्क्रीम ठेवा आणि थोडा वेळ थांबा. जर त्यातून तेल किंवा पाण्याचे डाग निघाले तर समजून घ्या की ते बनावट आईस्क्रीम आहे. खऱ्या आईस्क्रीममध्ये असं होत नाही.












Click it and Unblock the Notifications