दिलजीत दोसांझने चाहत्यांना दिला मोठा धक्का, लाईव्ह शोमध्ये सांगितले कारण
Diljit Dosanjh: प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. त्यांच्या कॉन्सर्टची तिकिटे लाखांत विकली जातात. मात्र आता दिलजीत दोसांझने अशी घोषणा की, त्याच्या चाहत्यांची निराशा होऊ शकते.
सरकार जोपर्यंत कॉन्सर्टच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करत नाही, तोपर्यंत तो भारतात दुसरा कॉन्सर्ट करणार नसल्याचे दिलजीत दोसांझने म्हटलं आहे. शनिवारी रात्री चंदीगडमध्ये एका शोदरम्यान दिलजीतने हे वक्तव्य केले आहे. कॉन्सर्टमधील एका चाहत्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिलजीत स्टेजवर उभा आहे आणि देशातील कॉन्सर्टच्या पायाभूत सुविधांबद्दल नाराजी व्यक्त करताना दिसत आहे.

दिलजीत दोसंथ म्हणाला की, "मी तुम्हाला सांगतो की भारतात लाईव्ह शोसाठी सुविधा नाहीत. हे एक मोठे कमाईचे ठिकाण आहे. जोपर्यंत असे होत नाही, तोपर्यंत मी भारतात शो करणार नाही, हे निश्चित आहे. प्रशासनला मी विनंती करतो की, कृपया या प्रकरणाकडे लक्ष द्या."
दिलजीत पुढे म्हणाला की, "मी मध्यभागी स्टेज लावण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून गर्दी पसरली जाईल. परंतु जोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत मी येथे शो करणार नाही. आम्हाला त्रास देण्याऐवजी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करा." या शोची तिकिटे महागड्या किमतीत विकली जात असल्यानं दिलजीतच्या कॉन्सर्टवरही टीका झाली होती. काही लोक दिलजीतवर कॉन्सर्टच्या तिकिटांचा काळाबाजार केल्याचा आरोपही करत होते, पण दिलजीतने सांगितले की, त्याचा अशा काळ्याबाजाराशी अजिबात संबंध नाही.
अशा पद्धतीने तिकिटांची विक्री होत असेल तर कलाकार काही करू शकत नाही, असा स्पष्ट संदेश दिलजीत दोसांझने दिला आहे. दिलजीत दोसांझच्या भारतातील मैफिली नेत्रदीपक झाल्या आहेत. त्याच्या 'दिल-लुमिनाटी' दौऱ्याचा एक भाग म्हणून, दिलजीतने या दौऱ्याची सुरुवात दिल्लीत शानदार उद्घाटन केली. यानंतर, त्याने जयपूर, हैदराबाद, अहमदाबाद, लखनऊ, पुणे, कोलकाता आणि बंगळुरू यांसारख्या अनेक शहरांमध्ये दमदार परफॉर्मन्स दिले आहेत, जिथे हजारो प्रेक्षकांनी त्यांचे स्वागत केले आहे.












Click it and Unblock the Notifications