Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

23 वर्षापूर्वीचा 'तो' निर्णय, साक्षात देवाचे दर्शन आणि संन्यास; ममता कुलकर्णीची 'स्टोरी' थक्क करणारी

प्रयागराज येथील कुंभमेळ्यात अभिनेत्री ममता कुलकर्णीने शुक्रवारी सन्यास घेतला. प्रयाग येथील संगमात स्नान करुन ती गृहस्थ जीवनातून संन्यस्थ आयुष्यात गेली. नव्वदीच्या दशकात लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी आणि लाखो दिलों की धडकन असणारी ममता कुलकर्णी अचानक सन्यासी का झाली? हा प्रश्न सर्वांनाच पडला. शिवाय तिने किन्नर आखाडाच का निवडला? हा प्रश्नही होताच. या सर्व प्रश्नांची उत्तरे तिने स्वतःच दिली. रुपेरी पडद्यापासून किन्रर आखाड्यापर्यंतची तिची स्टोरी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही. तिच स्टोरी आपण आज पाहणार आहोत.

Mamta Kulkarni

दोन दशकांपूर्वीचा निर्णय

दोन दशकांपूर्वी म्हणजेच साधारणः २३ वर्षांपूर्वी, केवळ आनंदाचा शोध घेण्यासाठी ममता कुलकर्णीने बाँलिवूड सोडले. तिने स्वतः एका मुलाखतीत हे सांगितले होते. ती म्हणाली होती की, मी ४०-५० चित्रपटात काम केले. पण मला आनंद मिळला नव्हता. त्यानंतर मी बाँलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मी हा निर्णय घेतला तेव्हा मी एक यशस्वी कलाकार होते. माझ्या हातातही २५ चित्रपट होते. मात्र मला आता बाँलिवूडमध्ये परत जायचे नव्हते.

सनातन धर्माचा संबंध

आनंदाच्या शोधातच ममता कुलकर्णीने बाँलिवूड सोडले. त्यानंतर ती कुपोली आश्रमातील जुन्या आखाड्याचे चैतन्य गगनगिरी महाराज यांच्याकडे गेली. त्यांच्याकडून २३ वर्षापूर्वी तिने दीक्षा घेतली. या काळात तीने आनंद व समाधान शोधण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही परिस्थितीत बाँलिवूडमध्ये परत जायचे नाही, हे तिने ठरवले होते, असे तिने आवर्जून सांगितले होते. गगनगिरी महाराजांकडून दिक्षा घेतल्यानंतर तिने सनातन धर्माचा आभ्यास केला. त्यानंतर स्वामी महेंद्रानंद गिरी, इंद्र भारती महाराज आणि आणखी एक महाराज माझ्यासमोर ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या रूपात प्रकट झाले, अशी आठवणही ममताने सांगितली होती. माझ्या मनाने मला सांगितले की तू 23 वर्षे तपश्चर्या केलीस तर तुला याचे प्रमाणपत्र मिळायलाच हवे.

किन्नर आखाड्याची निवड

गगनगिरी महाराजांकडून दिक्षा घेतल्यानंतर दोन वर्षांपूर्वी ममता कुलकर्णीची लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्याशी ओळख झाली. त्यांनीच ममताची २३ वर्षांची तपश्चर्या ओळखली. ममता याबद्दल सांगतेय की, "लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी माझी 23 वर्षांची तपश्चर्या समजून घेतली. स्वामी महेंद्रानंद गिरी महाराज यांनी माझी परीक्षा घेतली. त्यात मी उत्तीर्ण झाले. आखाड्याकडून माझी तीन दिवस परीक्षा घेतली जातेय, हेही मला माहित नव्हते. या परिक्षेत उत्तीर्ण झाल्यावर मला गुरुवारी महामंडलेश्वर बनवण्याचे निमंत्रण मिळाले." ममता पुढे म्हणाली की, "किन्नर आखाडा मध्यम मार्गी आहे. मला बॉलिवूडमध्ये परत जायचे नव्हते. त्यामुळेच मी या मध्यम मार्गाचा अवलंब केला, आणि किन्नर आखाडा निवडला.

नावही बदलले

किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर कौशल्या नंद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली ममता कुलकर्णीने गंगेत स्नान केले. गंगा काठावर पिंडदान केले. संध्याकाळी सुमारे आठ वाजता किन्नर आखाड्यात वैदिक मंत्रोच्चारादरम्यान महामंडलेश्वर म्हणून त्यांचा पट्टाभिषेक करण्यात आला. या कार्यक्रमात जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी महेंद्रानंद गिरी, किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी उपस्थित होते. ममता कुलकर्णी यांना आता नवे नाव यमाई ममता नंद गिरी देण्यात आले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+