'सलमान खान चेकबुक घेऊन आला होता', लॉरेन्स बिश्नोईच्या भावाचे मोठं विधान, म्हणाला- काहीही होऊ शकते
Lawrence Bishnoi Brother On Salman Khan: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खान चांगलाच चर्चेत आहे. सलमान खानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अशा परिस्थितीत सलमान खानच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे.
काळवीट शिकार प्रकरणापासून लॉरेन्स बिश्नोई सलमान खानच्या मागे हात धूवून लागला . सलमान खानचे वडील आणि चित्रपट लेखक सलीम खान यांनी एका वृतवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, सलमानने काहीही चुकीचे केले नाही आणि तो कोणाचीही माफी मागणार नाही, असं त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं.

लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ रमेश बिश्नोईचं विधान चर्चेत
या मुलाखतीनंतर आता तुरुंगात असलेला लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ रमेश बिश्नोई याचं एक विधान चांगलचं चर्चेत आलं आहे. सलमान खानने बिश्नोई समाजाला मोठी रक्कम देण्यासाठी तयार होता, असा दावा रमेश बिश्नोई याने केला आहे. रमेश बिश्नोईने एनडीटीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे की, सलमानने बिश्नोई समुदायाला खूप आधी पैसे देऊ केले होते, परंतु त्यांनी ते घेण्यास नकार दिला होता, असं त्यांनी मुलाखतीत म्हटलं आहे.
'सलमान खान चेकबुक आला होता'
रमेश बिश्नोई याने मुलाखतीत म्हटलं आहे की, सलमान खानचे वडील सलीम खान म्हणाले की, लॉरेन्स बिश्नोई गँग पैशासाठी हे करत आहे. मला त्यांना आठवण करून द्यायची आहे की, त्यांचा मुलगा म्हणजेच सलमान खानने स्वतः चेकबुक घेऊन बिश्नोई समाजासमोर आला होता. तुम्हाला पाहिजे तेवढी रक्कम हवी आहे तेवढी भरा,आणि ती घ्या, असं त्यांनी सांगितले होते. जर आम्हाला पैशाची भूक असती तर लगेच घेतले असते, असं त्यांने एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

'बिष्णोई समाजाचे रक्त खवळलं'
रमेश बिश्नोई यांनी सांगितले की, जेव्हा काळवीट प्रकरण घडले तेव्हा संपूर्ण बिश्नोई समाजाचे रक्त खवळलं होतं. बिष्णोई समाज प्राण्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देऊ शकतो. रमेश बिश्नोई म्हणाला की, जेव्हा सलमान खानने काळवीटची शिकार केली होती तेव्हा प्रत्येक बिश्नोईचे समाजाचं रक्त खवळलं होतं. त्याचा निर्णय आम्ही कोर्टावर सोडला आहे. रमेश पुढे म्हणाला की, बिष्णोई समाजाची चेष्टा केली तर समाज संतप्त होईल. संपूर्ण बिष्णोई टोळी लॉरेन्सच्या पाठीशी उभी आहे. काहीही होऊ शकते.
1998 मध्ये काळ्या हरणाची शिकार
लॉरेन्स बिश्नोई आणि सलमान खान यांच्यात सुरू असलेला वाद 1998 मध्ये काळवीटाच्या शिकारीशी संबंधित आहे.या प्रकरणात सलमान खानचे नाव पुढे आले होते. त्यानंतर त्याला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले होते. मात्र, दोषी ठरल्यानंतर सलमान खानची पुराव्याअभावी जामिनावर सुटका करण्यात आली. तेव्हापासून लॉरेन्स बिश्नोई सलमानच्या मागे लागला आहे.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications