कुणाल कामराने एकनाथ शिंदेंना "गद्दार" म्हटल्यावर कंगना राणौत संतापली, म्हणाली 'हे कोण आहेत लोक...'
प्रसिध्द स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली. त्यानंतर शिवसेना संतप्त झाली आहे. एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणणाऱ्या कामराच्या टिप्पणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, "मला विनोद समजतो पण त्यालाही एक मर्यादा असायला हवी."
बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौतने कामराच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. कंगना राणौतने कुणाल कामरावर निशाणा साधला आहे. "हे लोक कोण आहेत, आपण विचार करायला हवा की समाज कुठे चालला आहे"

दरम्यान, जेव्हा महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार सत्तेत होते आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा अभिनेत्री कंगना राणौतचे मुंबईतील आलिशान कार्यालय बुलडोझर वापरून पाडण्यात आले होते. त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि कंगना राणौत यांच्यात जोरदार युद्ध सुरू झालं होते. एवढेच नाही तर कंगना राणौतने हे प्रकरण न्यायालयात नेले होते आणि तत्कालीन ठाकरे सरकारला प्रश्न विचारला होता. न्यायालयाने कंगना राणौतच्या बाजूने निकाल दिला होता.
खार पोलिसांकडून कामराला समन्स
मुंबईच्या खार पोलिसांनी कामराला समन्स पाठवले आहेत. हे समन्स उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टिप्पणीशी संबंधित आहे. कामरा शहराबाहेर आहे म्हणून पोलिसांनी कामराला व्हॉट्सअॅपद्वारे समन्स पाठवला आहे. या समन्समध्ये कामराला सकाळी ११ वाजता येऊन त्याचे म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.
कामराने त्यांच्या विधानाबद्दल माफी मागण्यास दिला नकार
कामरा यांनी सोशल मीडियावर एक निवेदन प्रसिद्ध केल्यानंतर एका दिवसातच हे समन्स बजावण्यात आले आहे, ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले की, ते त्यांच्या विधानाबद्दल माफी मागणार नाही. त्यांच्या यूट्यूब व्हिडिओंवरील टीकेला उत्तर देताना, कामरा म्हटलं आहे की मनोरंजन स्थळे फक्त प्लॅटफॉर्म आहेत आणि त्यांच्या कंटेंटसाठी त्यांना जबाबदार धरू नये.












Click it and Unblock the Notifications