Bajrangi Bhaijaan 2 : बजरंगी भाईजान पार्ट 2 कधी येणार? 10व्या वर्धापनदिनी कबीर खाननं स्पष्ट सांगितलं
Kabir Khan on 'Bajrangi Bhaijaan Part 2' : बजरंगी भाईजान असा एक सिनेमा जो निखळ मनोरंजन आणि सुपर हिट ठरलेला आहे. भारतीय व्यक्ती आणि पाकिस्तानी मुलीची गोष्ट सांगणारा आणि दोघांतील नात्यांची गुंफन आणि अढळ विश्वास दाखवणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाला रसिकांनी खूपच डोक्यावर घेतले. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी याने केलेल्या पत्रकाराची भूमिका लोकांच्या खूपच लक्षात राहीली.
सलमान खानचा जबरदस्त असलेला बजरंगी भाईजान हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावासा वाटणारा आहे पण आता रसिकांना वेध लागले ते या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टची.. कारण बजरंगी भाईजान हा चित्रपट 10 वर्ष पुर्ण करत आहे. बऱ्याच काळापासून अशा बातम्या येत आहेत की सलमान आणि बजरंगी भाईजानचे दिग्दर्शक कबीरखान पुन्हा एका चित्रपटात एकत्र काम करणार आहेत आणि हा चित्रपट कधी येईल याची रसिक वाट पाहत आहेत. यावर कबीर खान यांनी स्पष्टच सांगितले आहे.

सध्या सलमान खान त्याच्या नवीन चित्रपट 'बॅटल ऑफ गलवान'च्या तयारीत व्यस्त आहे. या चित्रपटात तो पहिल्यांदाच दिग्दर्शक अपूर्व लाखियासोबत काम करणार आहे. याआधी त्याने अनेक मोठ्या दिग्दर्शकांसोबत त्याने काम केले आहे. यामध्ये कबीरखानचा नंबर लागतो. सलमान आणि कबीर यांनी 'एक था टायगर', 'ट्यूबलाईट' आणि 'बजरंगी भाईजान' सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे, आता या दोघांचा पुढचा चित्रपट कोणता असेल असा प्रश्न रसिकांना पडला आहे.
काय म्हणाले बजरंगी भाईजानचे दिग्दर्शक कबीर खान?
'बजरंगी भाईजान' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला 10 वर्षे पूर्ण होत आहेत. अशा परिस्थितीत, बजरंगी भाईजानचे दिग्दर्शक कबीर खान यांनी एका मुलाखतीत या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल सांगितले. पिंकव्हिलाशी बोलताना कबीरखान म्हणाले, "आजकाल आपण सतत अनेक कथांबद्दल बोलत असतो. जर यापैकी कोणतीही कथा चांगली आणि बरोबर वाटत असेल तर माझा पुढचा चित्रपट जाहीर केला जाईल. आम्ही 'बजरंगी भाईजान -2' बद्दल देखील बोलत आहोत."
"... तोपर्यंत चित्रपट बनवणार नाही"
कबीरखान म्हणाले, "आजकाल सर्व चित्रपट फ्रँचायझी चांगली कामगिरी करत आहेत. परंतु आम्ही 'बजरंगी भाईजान - 2' बद्दल खूप काळजी घेत आहोत. कारण पहिला चित्रपट हिट झाला होता, म्हणून आम्हाला त्याचा सिक्वेल बनवायचा नाही. सलमान आणि मी दोघेही यावर सहमत आहोत. जोपर्यंत आम्हाला चांगली आणि तितकीच उत्तम कथा मिळत नाही तोपर्यंत आम्ही पुढचा भाग बनवणार नाही."
"तेव्हाच बजरंगी भाईजान पुन्हा बनवू"
कबीरखान म्हणाले, "100 टक्के स्पष्ट आहे की बजरंगी भाईजान - 2 बनवला जाईल, पण आत्ता नाही. तसेच, कबीरच्या पुढील चित्रपटात कोण असेल हे देखील अद्याप निश्चित झालेले नाही. कबीर खानचा शेवटचा चित्रपट चंदू चॅम्पियन होता. ज्यामध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. तसेच, चित्रपटाला प्रेक्षकांकडून अनेक पुरस्कार आणि प्रेम मिळाले."












Click it and Unblock the Notifications