Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

हेराफेरी 3 चा वाद सुटला! बाबूभैय्या परतले, अक्षयकुमारसह सिनेमात झळकणार, वाचा काय म्हणाले परेश रावल?

Hera Pheri 3 controversy settled : गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु असलेला 'हेरा फेरी ३'चा वाद आता संपुष्टात आल्यात जमा आहे. यासंदर्भात खुद्द या चित्रपटातील बाबूभैय्या ही भुमिका अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी म्हटले आहे. त्यामुळे हेराफेरी ३ मध्ये पुन्हा एकदा अक्षयकुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांची केमेस्ट्री पाहायला मिळणार आहे.

हेराफेरी, फिर हेराफेरी हे दोन्ही चित्रपट सुपरहीट ठरले. पहिल्या चित्रपटापासूनच बाबूभैय्या आणि त्यांचे दोन सहकारी यांनी चित्रपटात धमाल केली होती. या त्रिकुटांना रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. आता 'हेरा फेरी ३'मध्येही हे त्रिकुट दिसणार हे स्पष्ट झाले आहे.

Hera Pheri 3 controversy settled


तसे पाहिले तर हा चित्रपट त्याच्या घोषणेपासूनच चर्चेत होता. चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती. त्यानंतर हा चित्रपट वादात सापडला, परेश रावल यांनी चित्रपटापासून स्वतःला दूर केल्याचे सांगितले होते. त्यानंतर या चित्रपटाच्या निर्माते आणि परेश रावल यांच्यात कायदेशीर नोटीसनाट्यही रंगले. त्यानंतर परेश यांनी व्याजासह साइनिंगची रक्कम परत केल्याचे एक्सवरील त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले होते.

Take a Poll

आता बाबूभैय्या हेराफेरी ३ मध्ये दिसणार

सांगायचे झाले तर आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. कारण चित्रपटाचा वाद आता संपला आहे. हेरा फेरी ३ मध्ये परेश रावल परतले आहेत. याची स्पष्टता स्वतः परेश रावल यांनी दिली आहे.

काय म्हणाले परेश रावल?

परेश रावल पॉडकास्टर हिमांशू मेहता यांच्याशी बोलत होते. येथे त्यांना हेरा फेरी ३ शी संबंधित एक प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, 'कोणताही वाद नाही. मला वाटते जेव्हा लोकांना एखादी गोष्ट खूप आवडते तेव्हा तुम्हाला अधिक काळजी घ्यावी लागते. प्रेक्षकांप्रती आपल्या काही जबाबदाऱ्या देखील आहेत. प्रेक्षकांनी तुमचे खूप कौतुक केले आहे. तुम्ही गोष्टी हलक्यात घेऊ शकत नाही. कठोर परिश्रम करून त्या द्या. म्हणूनच मी मानत होतो की प्रत्येकाने ते हातात घ्यावे, कठोर परिश्रम करावे आणि दुसरे काहीही नाही. ते लवकर येणार होते, परंतु आपल्याला स्वतःला चांगले बनवावे लागले. शेवटी, प्रत्येकजण खूप सर्जनशील आहे, मग तो प्रियदर्शन असो, अक्षय असो किंवा सुनील.

तिघेही माझे मित्र...

अक्षय, सुनील आणि प्रियदर्शन हे तिघेही वर्षानुवर्षापासून माझे मित्र आहेत. आधी असे वृत्त आले होते की परेशने साइनिंग अमाउंट घेतल्यानंतर कोणालाही न कळवता चित्रपट सोडला. त्यानंतर अक्षयने त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली. प्रत्युत्तरादाखल परेश रावल यानी साइनिंग अमाउंट १५ टक्के व्याजासह अक्षयच्या कंपनीला परत केली. तेव्हापासून या चित्रपटाबाबत कोणतेही विशेष अपडेट आलेले नव्हते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+