औरंगजेबच्या भुमिकेत बाॅबी देओल! आंध्रचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा 'हरिहर वीरमल्लू'कसा आहे? वाचा
Harihar Veermallu Review : बहुप्रतिक्षित 'हरिहर वीरमल्लू' चित्रपट अखेर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि दिग्गज दाक्षिणात्य स्टार पवन कल्याण यांच्या या चित्रपटाचे तब्बल १४ वेळा प्रदर्शन पुढे ढकलले त्यानंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गुरुवारी, 24 जुलै 2024 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. खास बाब म्हणजे सोळाव्या शतकातील कथा, मुघलांचे साम्राज्य कोहीनूर हिरा चोरी आणि औरंगजेबाची बाॅबी देओल करत असलेली भूमिका हे या चित्रपटाचे खास आकर्षण आहे.
पवन कल्याण यांच्या व्यस्त राजकीय वेळापत्रकामुळे आणि व्हीएफएक्समधील विलंबामुळे चित्रपट 14 वेळा पुढे ढकलण्यात आला, जो एक विक्रम मानला जातो. पवनकल्याण यांनी स्वतः कधीही न पाहिलेल्या प्रमोशनमध्ये भाग घेतला, ज्यामुळे चित्रपटाची प्रसिद्धी वाढली.

हरिहर वीरमल्लूच्या भुमिकेत स्टार कलाकार आणि आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे आहेत. पवन कल्याण यांचा संपूर्ण भारतभर प्रदर्शित होणारा पहिलाच चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाची ठळक वैशिष्ट्ये, स्टारकास्ट, संगीत कुणी साकारले आणि चित्रपट कसा आहे हे आपण जाणून घेऊया.
चित्रपटात कोण - कोण आहेत?
पवन कल्याण (हरिहर वीरमल्लू), निधी अग्रवाल (नायिका पंचमी), बॉबी देओल (औरंगजेब), अनुपम खेर,सुनील, नास्सर, कबीर सिंग, सुब्बाराजू, नोरा फतेही, विक्रम जीत, जिशु सेनगुप्ता, सचिन केडकर (लहान श्रेष्ठी).
दिग्दर्शन: ज्योतिकृष्ण आणि क्रिश यांचे आहे तर छायालेखन: मनोज परमहंस यांचे आहे.
संगीत: ऑस्कर विजेते एम.एम. कीरावानी यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. कीरावानीचे संगीत हा चित्रपटाचा प्राण आहे. पहिल्या भागापासून ते क्लायमॅक्सपर्यंत, पार्श्वसंगीताने चित्रपटात रंग भरले. गाणी देखील चांगल्या प्रकारे रचली गेली.
कशी आहे कथा?
चित्रपटाची कथा सोळाव्या शतकातील आहे. हरिहर वीरमल्लू (पवन कल्याण) हा गरिबांना मदत करणारा एक चोर आहे, जो हिरे आणि मौल्यवान वस्तू चोरतो. दुसरीकडे, मुघल सम्राट औरंगजेब (बॉबी देओल) दिल्लीची सत्ता हस्तगत करून हिंदू लोकांवर 'जिझिया कर' लादत आहे. लहान श्रेष्ठी (सचिन केडकर) नावाच्या व्यक्तीकडे असलेले हिरे गोलकोंड्याच्या नवाबाला द्यायचे असतात. तो वीरमल्लूशी करार करून ते हिरे चोरण्यास सांगतो. वीरमल्लू हैदराबादच्या नवाबाचा हिऱ्याचा रथ बंदरहून चारमिनारला घेऊन जातो आणि त्यातील संपत्ती चोरतो. याच दरम्यान त्याची पंचमी (निधी अग्रवाल) शी ओळख होते आणि तिला तो वाचवतो.
वीरमल्लूची प्रतिभा पाहून गोलकोंडाचा नवाब त्याला एका मोठ्या मोहिमेवर पाठवतो. दिल्लीला जाऊन मुघल सम्राटाकडून कोहिनूर हिरा चोरून परत आणणे. वीरमल्लू हे मिशन का स्वीकारतो, पंचमीची भूमिका काय आहे आणि तो औरंगजेबाच्या साम्राज्यात कसा घुसखोरी करतो, हे चित्रपटात दाखवले आहे.
पहिला भाग: वीरमल्लू म्हणून पवन कल्याण यां ची एन्ट्री, अॅक्शन सीक्वेन्स, एलिव्हेशन सीन्स, "कोल्लागोट्टीनादिरो" गाणे, बंदरातील लढाई आणि चारमिनार सीन्स अत्यंत आनंददायी आहेत.
दुसरा भाग: कथेचा दुसरा भाग थोडा कंटाळवाणा वाटतो. काही दृश्ये ताणलेली दिसतात अशीही चर्चा आहे.
बॉबी देओल खास आकर्षण
बॉबी देओलने औरंगजेबाची भूमिका खासपणे साकारली. खलनायक म्हणून तो खूपच परफेक्ट वाटतो. बॉबीचा औरंगजेबचा लूक चांगला आहे आणि त्याने आपल्या डोळ्यांच्या अभिनयाने खलनायकी दाखवली. नायक आणि खलनायक यांच्यात एकही थेट दृश्य या चित्रुटात नाही जो किमान दुसऱ्या भागात अपेक्षित होता.












Click it and Unblock the Notifications