KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा
Kendriya vidyalaya admission 2026 : आपल्या पाल्याला केंद्रीय विद्यालयात (Kendriya Vidyalaya) शिकवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो पालकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय विद्यालय संघटनेकडून (KVS) आजपासून सुरू करण्यात आली आहे. मार्च २०२६ च्या चौथ्या आठवड्यात ही प्रवेशप्रक्रीया सुरु होईल असे यापुर्वीच सांगण्यात आले होते.
सध्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान आणि ऐन शेवटच्या क्षणी धावपळ होऊ नये आणि तांत्रिक अडचणींमुळे आपल्या मुलाची संधी हुकू नये, यासाठी पालकांनी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करणे आवश्यक आहे, म्हणूनच ही उपयुक्त माहीती देत आहोत.

इयत्तेनुसार अशी असेल प्रवेश प्रक्रिया (Class-wise Process)
१. इयत्ता १ ली (आणि बालवाटिका): या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असते. विद्यार्थ्यांची निवड 'लॉटरी सिस्टम' आणि प्राधान्य श्रेणीनुसार केली जाते.
२. इयत्ता २ री ते ८ वी: या वर्गांसाठी ऑफलाइन अर्ज करावे लागतात. जागा उपलब्ध असल्यास लॉटरीद्वारे प्रवेश दिला जातो, यासाठी कोणतीही प्रवेश परीक्षा घेतली जात नाही.
३. इयत्ता ९ वी आणि १० वी: जागा रिक्त असल्यास ऑफलाइन पद्धतीने प्रवेश मिळतो. ९ वी साठी प्रवेश परीक्षा घेतली जाऊ शकते.
४. इयत्ता ११ वी: १० वीच्या बोर्ड परीक्षेतील गुणांच्या आधारावर प्रवेश दिला जातो.
अर्ज कसा करावा? (Application Steps)
१. ऑनलाइन नोंदणी: १ ली साठी kvsangathan.nic.in वर जाऊन 'New Registration' करा.
२. फॉर्म भरणे: सर्व माहिती अचूक भरून कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी अपलोड करा.
३. निवड यादी: अर्ज केल्यानंतर केव्हीएस (KVS) निवड यादी जाहीर करते.
४. कागदपत्र पडताळणी: यादीत नाव आल्यास संबंधित शाळेत जाऊन कागदपत्रांची पडताळणी करा.
५. प्रवेश शुल्क: प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विहित शुल्क भरून प्रवेश निश्चित करा.
(विशेष टीप: इयत्ता १ ली साठी ऑनलाइन नोंदणी करताना कोणतेही अर्ज शुल्क आकारले जात नाही. अधिकृत माहितीसाठी केवळ केव्हीएसच्या अधिकृत वेबसाइटवरच विश्वास ठेवावा.)
हेही वाचा : केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स












Click it and Unblock the Notifications