रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल 1 लाख 20 हजार पदांसाठी भरती, लवकर अर्ज करा, एका क्लिवर सर्व माहिती
Indian Railways Mega Recruitment 2025 : लाखो तरुणांचे आयुष्य बदलून टाकण्याची क्षमता असलेला 'गोल्डन चान्स' भारतीय रेल्वेने उपलब्ध करून दिला आहे. २०२४ आणि २०२५ या दोन वर्षांसाठी भारतीय रेल्वे विभागाने तब्बल १ लाख २० हजार ५७९ पदांसाठी आजवरची सर्वात मोठी भरती मोहीम सुरू केली आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः संसदेत या 'मेगाड्राइव्ह'ची घोषणा केली आहे. आता, या भरतीचे पूर्ण कॅलेंडर जारी झाल्यामुळे, ही संधी केवळ मोठी नाही, तर अत्यंत पारदर्शक आणि वेळेवर पूर्ण होणारी आहे. 'यंग इंडिया'च्या वाट्याला आलेली रेल्वेतील ही बंपर नोकरीची संधी आणि त्यासाठी अर्ज करण्याची तयारी कशी करावी, याबद्दलची जाणून घेऊया.

दोन वर्षांत १.२० लाखांहून अधिक जागा
एकूण पदे
भारतीय रेल्वेने २०२४ आणि २०२५ या दोन वर्षांसाठी १,२०,५७९ पदांवर भरती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
२०२४ मधील भरती
या वर्षात रेल्वेने १० वेगवेगळ्या अधिसूचना (Notification) जारी केल्या, ज्यानुसार ९१,११६ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.
२०२५ मधील भरती
पुढील वर्षासाठी ७ अधिसूचना काढल्या असून, त्याद्वारे ३८,४६३ पदांवर नियुक्त्या केल्या जातील.
कोणत्या प्रमुख पदांसाठी भरती सुरू?
या भरती मोहिमेत रेल्वेच्या जवळपास प्रत्येक विभागातील जागांचा समावेश आहे. यामध्ये तांत्रिक आणि गैर-तांत्रिक अशा दोन्ही प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत.
- सहाय्यक लोको पायलट
- तंत्रज्ञ
- आरपीएफ एसआय आणि कॉन्स्टेबल
- ज्युनियर इंजिनिअर
- डिपो मटेरियल सुपरिटेंडेंट
- केमिकल आणि मेटलर्जिक असिस्टंट
- पॅरामेडिकल स्टाफ
- एनटीपीसीच्या विविध श्रेणी
- मिनिस्टेरियल आणि आयसोलेटेड श्रेणी
- लेव्हल-१ पदे: (उदा. ट्रॅक मेंटेनर, असिस्टंट)
भरती कॅलेंडर जारी: पारदर्शकतेला प्राधान्य
रेल्वेने या भरतीसाठी संपूर्ण भरती कॅलेंडर जारी केले आहे. हा निर्णय लाखो उमेदवारांसाठी खूप महत्त्वाचा आहे. यामुळे: उमेदवारांना कोणत्या पदासाठी परीक्षा कधी होणार, याची नेमकी माहिती मिळेल. संपूर्ण प्रक्रिया कधी पूर्ण होईल, याचा अंदाज येईल. वेळापत्रक निश्चित झाल्यामुळे उमेदवारांना तयारीची योग्य दिशा मिळेल.
गेल्या २० वर्षांतील सर्वात मोठी भरती
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वेने मागील दशकाच्या तुलनेत नोकरी निर्मितीत मोठी वाढ केली आहे. २००४ ते २०१४: या काळात रेल्वेने सुमारे ४ लाख लोकांना नोकरी दिली होती. २०१४ ते २०२५: या अकरा वर्षांच्या काळात ही संख्या वाढून ५ लाख ८ हजार झाली आहे. सध्या सुरू असलेली १.२० लाखांहून अधिक पदांची भरती याच वाढत्या संधींचा भाग आहे असे 'वनइंडिया हिंदी'च्या वृत्तात नमूद आहे.












Click it and Unblock the Notifications