CBSE चे ऐतिहासिक पाऊल; होळीमुळे १५ मार्चचा पेपर ज्यांना देता येणार नाही, त्यांच्यासाठी 'ही' सवलत
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) १५ मार्च रोजी होणाऱ्या हिंदी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली. होळीमुळे १५ मार्चरोजी असणाऱ्या हिंदीच्या पेपरला जे विद्यार्थी बसू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी परीक्षा देण्याची आणखी एक संधी बोर्डाने जाहीर केली. या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड विशेष परीक्षा घेणार आहे.

वेळापत्रकात बदल नाही
काही राज्यांमध्ये होळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. १५ मार्च रोजी बारावीची हिंदी कोअर किंवा हिंदी ऐच्छिकचा पेपर घेण्यात येणार आहे. या परिक्षेत कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) स्पष्ट केले आहे. देशाच्या बहुतेक भागांमध्ये १४ मार्च २०२५ रोजी होळी साजरी केली जाईल. काही भागात १५ मार्चपर्यंत उत्सव साजरा होतो. या काळात जे विद्यार्थी हिंदीचा पेपर देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी मंडळाने नंतरच्या तारखेला एक विशेष परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सवांमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल, असे सीबीएसई बोर्डाने जाहीर केले.
काय आहे अधिकृत सूचना?
अधिकृत सूचनेत म्हटले आहे की, ''बोर्ड परीक्षांची तारीख पत्रक ०३ महिने आधीच जाहीर करून बोर्डाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाचे वेळापत्रक प्रभावीपणे आखण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला. या सक्रिय पाऊलामुळे विद्यार्थ्यांना त्यांचा वेळ अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यास आणि त्यांचा अभ्यास अधिक संघटित आणि कार्यक्षमतेने करण्यास मदत झाली. वेळापत्रकाचा एक भाग म्हणून, बारावीसाठी हिंदी कोअर (३०२)/हिंदी ऐच्छिक (००२) साठी सीबीएसई परीक्षा १५ मार्च २०२५ रोजी होणार आहे.''
विशेष परिक्षेबाबत दिली सवलत
बोर्डाने पुढे म्हटले आहे की, सण व उत्सवामुळे काही विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, असा निर्णय घेण्यात आला आहे की, १५.०३.२०२५ रोजी परीक्षा घेतली जाईल, परंतु ज्या विद्यार्थ्यांना त्यात बसणे कठीण वाटत असेल त्यांनी त्या दिवशी, म्हणजेच १५.०३.२०२५ रोजी बसू नये. पुढे, असा निर्णय घेण्यात आला आहे की, अशा विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांसोबत बसण्याची संधी दिली जाईल. ज्यांच्यासाठी बोर्डाच्या धोरणानुसार विशेष परीक्षा घेतली जाते. ज्यामध्ये राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा घेतली जाते.'', असे अधिकृत सूचनेमध्ये म्हटले आहे.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications