अमेरिकेच्या 'टॅरिफ'ला का मात देऊ शकतो भारत! जागतिक युद्ध काळातही आपला देश कणखर कसा बनला? वाचा कारणे
Why can India overcome US tariffs : सध्या जगात अशांतता आहे, युद्धजन्य स्थिती आणि भू-राजकीय तणाव तरीही भारतीय अर्थव्यवस्था कणखर बनत आहे, विशेष म्हणजे 'टॅरिफ'- आयात शुल्काच्या परिणामाची तमा भारताने बाळगली नाही, जगात असे अनिश्चिततेचे वातावरण असतानाही, भारताची अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असल्याचे देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी म्हटले आहे.
नवी दिल्लीत 'एआयएमए' (AIMA) च्या एका कार्यक्रमात त्यांनी यासंदर्भात भाष्य केले. यासंदर्भात एएनआयने वृत्त दिले आहे. भारताने गेल्या दशकात केलेल्या देशांतर्गत आणि संरचनात्मक सुधारणांमुळे देशाला अशी लवचिकता मिळाली आहे की, जागतिक आव्हानांना तोंड देत असतानाही भारताची वाढ सकारात्मक राहील.

युएस 'टॅरिफ' वर का मात देऊ शकतो भारत
व्ही. अनंत नागेश्वरन म्हणाले, भारताने जागतिक घटकांना तोंड देण्यासाठी आणि रचनात्मक सुधारणांमुळे एक विशिष्ट फ्लेक्झिबिलीटी आधीच निर्माण केली आहे. यामुळे, सध्याची 'टॅरिफ' अनिश्चितता कधी आणि कशी दूर होते, याची पर्वा न करता, भारताच्या वाढीच्या परिणामांमुळे नकारात्मक आश्चर्याऐवजी अधिक सकारात्मक आश्चर्य वाटेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ही अनिश्चितता लवकरच संपुष्टात येईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
गेल्या १०-११ वर्षांतील काय घडले?
- नागेश्वरन यांनी मत व्यक्त केले की, गेल्या १०-११ वर्षांपासून सुरू असलेल्या संरचनात्मक सुधारणांचे सकारात्मक परिणाम आता वाढ आणि रोजगाराच्या बाबतीत दिसू लागले आहेत. या सुधारणांमध्ये भारताने व्यवसाय सुलभता नोंदणी, वाद निवारण, आणि नियमांचे पालन सुलभ करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे असे ते म्हणाले.
- जीएसटी दरांमध्ये अलीकडील कपात आणि प्रक्रिया सुधारणा, तसेच फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पात जाहीर झालेली थेट करात महत्त्वपूर्ण कपात आणि प्राप्तिकर विधेयकातील घडामोडी महत्वाच्या ठरल्या.
- यासह कर अधिकारी, कर प्रक्रिया आणि कर अमलबजावणीच्या संबंधित मुद्द्यांवर व्यवसाय सुलभतेच्या चिंता प्रामुख्याने केंद्रित असतात. इतर अनेक क्षेत्रांपेक्षा कर-संबंधित बाबी अधिक जलदगतीने सोडवण्यावर सरकारचा भर आहे, कारण ही देशांतर्गत आणि परदेशी व्यवसायांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
भारताने ही गोष्ट केली साध्य
नागेश्वरन यांनी सांगितले की, कोविड महामारीच्या आव्हानात्मक काळात आणि प्रादेशिक सुरक्षा वातावरणातही वित्तीय सावधगिरी आणि वित्तीय स्थिरता राखण्याची क्षमता ही एक महत्त्वाची संरचनात्मक सुधारणा आहे, ज्याचे पुरेसे कौतुक केले जात नाही. भारत सरकारने पाच वर्षांत वित्तीय तूट ९.२% वरून निम्म्यापेक्षा कमी करण्याचे आश्वासन दिले होते, जे पूर्ण केले आहे. या आर्थिक वर्षातही ४.४% वित्तीय तूट प्रमाण साध्य केले जाईल, अशी अपेक्षा आहे. वित्तीय स्थिरता राखणे हे आर्थिक विस्तारासाठी आणि खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी मूलभूत पाया आहे.
जागतिक संघर्षातही ऊर्जेचा योग्य कमी वापरामुळे भारताचा विकास
भारत सरकारने दिलेले आणखी एक महत्त्वाचे योगदान म्हणजे, गेल्या ४ वर्षांत जागतिक स्तरावर सुरू असलेल्या अशांततेला न जुमानता, देशात स्थिर आणि कमी ऊर्जा किमती राखणे. या कमी ऊर्जा किमती हेच भारताच्या भरभराटीचे एक कारण आहे.












Click it and Unblock the Notifications