Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

UPI नियमांमध्ये बदल! आता दिवसांत एवढ्या वेळाच तपासू शकता बँक खात्यातील बॅलेंस! 1 ऑगस्टपासून नवे नियम

UPI rules Change : युपीआय आणि इतर डिजिटल पेमेंट युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वारंवार बॅलेंस तपासणे किंवा व्यवहाराची स्थिती तपासण्यावर आता पुर्वीच्या तुलनेत मर्यादा आली आहे. १ ऑगस्ट २०२५ पासून UPI प्रणालीमध्ये काही नवीन बदल लागू होणार आहेत, जे तुमच्या दैनंदिन व्यवहारांवर थेट परिणाम करतील. NPCI (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ने UPI नेटवर्क अधिक कार्यक्षम आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी हे बदल केले आहेत.

UPI rules Change

नवीन नियमांचे कारण काय?

एप्रिल आणि मे २०२५ मध्ये UPI प्लॅटफॉर्मवर प्रचंड ताण (लोड) दिसून आला. याचे मुख्य कारण म्हणजे युजर्स वारंवार बॅलन्स तपासत होते किंवा एकाच व्यवहाराची स्थिती वारंवार रिफ्रेश करत होते. यामुळे सर्व्हरवर दबाव वाढून व्यवहार उशीरा किंवा अयशस्वी होत होते. ही समस्या दूर करून प्रणाली अधिक जलद आणि सुरक्षित करण्यासाठी हे नवीन नियम आणले आहेत.

कोणते बदल लागू होतील?

बॅलन्स तपासणी मर्यादा: तुम्ही दिवसातून फक्त ५० वेळा तुमच्या बँक खात्याचा बॅलन्स तपासू शकाल.

बँक खाते तपशील तपासणी: तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक केलेल्या बँक खात्याचे तपशील तुम्ही दिवसातून २५ पेक्षा जास्त वेळा तपासू शकणार नाही.

व्यवहार स्थिती तपासणी: एकाच व्यवहाराची स्थिती तुम्ही फक्त ३ वेळा तपासू शकाल, तीही प्रत्येक वेळी किमान ९० सेकंदांच्या अंतराने.

ऑटो-डेबिट पेमेंट्स : नेटफ्लिक्स, EMI, वीज बिल यांसारखी ऑटो-डेबिट पेमेंट्स आता फक्त नियोजित वेळेवर प्रोसेस होतील. यामुळे पेमेंट प्रणाली अधिक व्यवस्थित होईल.

या बदलांचा तुमच्यावर काय परिणाम होईल?

या बदलांमुळे युपीआय सामान्यतः वापरणाऱ्यांना कोणतीही विशेष अडचण येणार नाही. उलट, यामुळे UPI नेटवर्क अधिक सुरक्षित, वेगवान आणि विश्वासार्ह बनेल, ज्यामुळे तुमचे डिजिटल व्यवहार अधिक सुरळीत पार पडतील.

हरिद्वारमधील चेंगराचेंगरीचे एनआयनेही वृत्त दिले आहे. वृत्तानुसार, मनसा देवी मंदिरात प्रचंड गर्दी जमल्यानंतर ही घटना घडली. दरम्यान चेंगराचेंगरीतील मृतात ६ जण कोण याची माहिती प्रशासन घेत आहे. "आपण मी घटनास्थळी जात आहोत. या घटनेचा सविस्तर अहवाल येण्याची वाट पाहत आहोत असेही गढवाल विभागाचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी एएनआयलाला सांगितले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+