Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

इराण-इस्त्रायल युद्धाच्या भडक्याने शेअर बाजार कोसळला!; रुपया 92 च्या पार, गुंतवणूकदारांना मोठा फटका

Stock market crash sensex plunges 1800 points : होळीच्या सणासुदीत भारतीय शेअर बाजारात मात्र आज 'रक्ताची होळी' पाहायला मिळाली. इस्रायल-इराण युद्धाचा भडका आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेल्या भीतीचा थेट परिणाम दलाल स्ट्रीटवर झाला. बुधवारी सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली, ज्यामुळे अवघ्या काही तासांत गुंतवणूकदारांचे तब्बल १२ लाख कोटी रुपये मातीत गेले.

Stock market crash sensex

बाजार कोसळण्याची प्रमुख कारणे

  • १. युद्धाचा वाढता धोका: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर मध्यपूर्वेत सुरू झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ट्रम्प यांच्या विधानांमुळे युद्धाच्या कालावधीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
  • २. कच्च्या तेलाचा भडका: ब्रेंट क्रूड ८२ डॉलर प्रति बॅरलच्या पार गेल्याने भारताची चिंता वाढली आहे. भारत आपल्या गरजेच्या ९०% तेल आयात करतो, त्यामुळे तेलाच्या किमती वाढल्यास महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
  • ३. रुपयाची ऐतिहासिक घसरण: अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ६६ पैशांनी घसरून ९२.१५ या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. यामुळे आयात महाग होऊन कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होणार आहे.
  • ४. परकीय गुंतवणूकदारांची पाठ: विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणात पैसा काढून घेण्यास सुरुवात केली आहे. फेब्रुवारीपासून सुरू असलेला हा विक्रीचा सपाटा आजही कायम राहिला.

आकडेवारी काय सांगते?

  • 'वनइंडिया हिंदी'नुसार, सेन्सेक्स: १८०० अंकांनी कोसळून ७८,४४३.२० च्या पातळीवर आला.
  • निफ्टी: ५५० हून अधिक अंकांची घसरण होऊन २४,३०५.४० वर स्थिरावला.

गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान

  • बीएसई (BSE) सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४५७ लाख कोटींवरून ४४५ लाख कोटींवर आले, म्हणजेच एकाच दिवसात १२ लाख कोटींचा फटका बसला.
  • व्होलाटिलिटी इंडेक्स हा जोखीम मोजणारा निर्देशांक २०% नी वधारून २१ वर पोहोचला आहे, जो बाजारातील प्रचंड अस्थिरता दर्शवतो.

तज्ज्ञांचे मत काय?

बाजार तज्ज्ञांच्या मते, ही घसरण तात्पुरती असून भू-राजकीय तणावामुळे जागतिक स्तरावर 'रिस्क ऑफ' (Risk-off) मोड सुरू आहे. जरी अल्पकाळात गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागत असला, तरी भारताची पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रातील वाढ पाहता दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र, आरबीआय (RBI) आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्ह आता व्याजदरांबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : हॉर्मुझच्या समुद्रात ट्रम्पंची एन्ट्री! जागतिक अर्थव्यवस्थेची 'लाईफलाईन' वाचवण्यासाठी 'हा' प्लॅन

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+