Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

हॉर्मुझच्या समुद्रात ट्रम्पंची एन्ट्री! जागतिक अर्थव्यवस्थेची 'लाईफलाईन' वाचवण्यासाठी 'हा' प्लॅन

Donald trump strait of hormuz us navy protection iran israel war impact : इराण आणि इस्रायलमधील युद्ध आता केवळ दोन देशांपुरते मर्यादित राहिले नसून, ते जागतिक ऊर्जा संकटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. जगातील सर्वात महत्त्वाचा समुद्री मार्ग समजल्या जाणाऱ्या 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) सध्या युद्धाच्या छायेत आहे. इराणच्या वाढत्या हल्ल्यांमुळे तेल कंपन्यांनी या मार्गावरून जाण्यास नकार दिल्यानंतर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी खेळी खेळली आहे. "गरज पडल्यास अमेरिकन नौदल व्यापारी जहाजांना संरक्षण देऊन हा मार्ग पार करून देईल," अशी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे.

Donald trump strait of hormuz us navy protection

काय आहे ट्रम्प यांची 'रणनिती'?

इराणच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या भीतीने तेल टँकर्सची वाहतूक ठप्प झाली होती. विमा कंपन्यांनी प्रीमियमचे दर १० पटीने वाढवल्याने कंपन्यांचे कंबरडे मोडले होते. यावर तोडगा म्हणून ट्रम्प यांनी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत:

मिलिटरी एस्कॉर्ट: अमेरिकन नौदलाची युद्धजहाजे आता व्यापारी टँकर्सच्या सोबत राहून त्यांना सुरक्षा कवच प्रदान करतील.

फायनान्शिअल गॅरंटी: ट्रम्प यांनी अमेरिकन एजन्सी (DFC) ला निर्देश दिले आहेत की, त्यांनी शिपिंग कंपन्यांना 'पॉलिटिकल रिस्क इन्शुरन्स' आणि आर्थिक हमी द्यावी. यामुळे कंपन्यांवरील आर्थिक जोखमीचे ओझे कमी झाले आहे.

हॉर्मुझ का आहे जगासाठी इतके महत्त्वाचे?

हॉर्मुझची सामुद्रधुनी म्हणजे जागतिक व्यापाराची 'शीर' आहे. हा एक अरुंद समुद्री मार्ग आहे जो पर्शियन आखाताला ओमानच्या आखाताशी जोडतो.

तेलाचा पुरवठा

जगातील एकूण तेल वापराच्या सुमारे 20% हिस्सा याच मार्गातून जातो.

दैनिक व्यापार

रोज सुमारे 2 कोटी बॅरलपेक्षा जास्त कच्चे तेल येथून निर्यात होते.

नैसर्गिक वायू

कतरसारख्या देशांतून येणारा एक तृतीयांश LNG (लिक्विफाइड नॅचरल गॅस) याच मार्गावर अवलंबून आहे.

भारतावर परिणाम

भारत आपल्या गरजेच्या 50-60 टक्क्यांपेक्षा जास्त कच्चे तेल सौदी अरेबिया, इराक आणि युएई सारख्या देशांकडून याच मार्गाने मागवतो. हा मार्ग बंद झाल्यास भारतात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडू शकतात.

इतिहासाची पुनरावृत्ती, पण आव्हान नवीन!

यापूर्वी १९८० च्या दशकात इराण-इराक युद्धादरम्यान 'टँकर वॉर' झाले होते, तेव्हाही अमेरिकेने अशाच प्रकारे जहाजांना संरक्षण दिले होते. मात्र, आजच्या काळात इराणकडे आधुनिक घातक ड्रोन आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्रे आहेत. त्यामुळे ट्रम्प यांचे हे 'सुरक्षा कवच' किती यशस्वी ठरते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. ट्रम्प यांच्या या विधानानंतर जागतिक तेल बाजारात किंचित स्थिरता पाहायला मिळत असली, तरी प्रत्यक्ष युद्धभूमीवरील तणाव अद्याप कायम आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+