RBIचा मोठा निर्णय: एप्रिल-2026 पासून 'क्रेडिट स्कोअर' दर 7 दिवसांनी अपडेट होणार; हे होणार फायदे!
CIBIL score update rules : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने देशाची क्रेडिट स्ट्रक्चर (पत संरचना) अधिक मजबूत, पारदर्शक आणि ग्राहक-केंद्रित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
२६ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या या मसुदा मार्गदर्शक तत्त्वांनुसार, १ एप्रिल २०२६ पासून क्रेडिट स्कोअर अपडेट होण्याच्या प्रक्रियेत मोठे बदल होणार आहेत. या बदलांमुळे आता कर्जदारांना त्यांच्या क्रेडिट स्कोअरच्या अपडेटसाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही, ज्यामुळे कर्ज आणि क्रेडिट कार्ड अर्ज प्रक्रियेत मोठी गती येईल.

'क्रेडिट स्कोअर' अपडेटमध्ये येणार गती
सध्या, क्रेडिट स्कोअर सामान्यतः दर १५ दिवसांनी एकदा अपडेट केले जातात. मात्र, नवीन नियमांनुसार, सर्व क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना (CICs) आता दर ७ दिवसांनी क्रेडिट स्कोअर अपडेट करणे बंधनकारक असेल.
महत्त्वाच्या अपडेटच्या तारखा
CICs ला प्रत्येक महिन्याच्या खालील तारखांना डेटा अपडेट ठेवणे आवश्यक आहे: ७, १४, २१ आणि २८ तारीख.
महिन्याचा शेवटचा दिवस
बँका आणि वित्तीय संस्थांना प्रत्येक महिन्याच्या ३ तारखेपर्यंत मूलभूत डेटा CICS ला पाठवावा लागेल. या व्यतिरिक्त, नवीन बदल (जसे की नवीन खाते उघडणे/बंद करणे, क्रेडिट स्कोअरवर परिणाम करणारे बदल) या चार तारखांना पाठवले जातील.
या बदलाचे काय होणार फायदे!
आरबीआयच्या या निर्णयामुळे कर्जदारांचे जीवन अधिक सुलभ होणार आहे. या बदलांमुळे ग्राहकांना खालीलप्रमाणे थेट ४ मोठे फायदे मिळतील:
कर्ज/क्रेडिट कार्ड बंद झाल्यानंतर त्वरित स्कोअर सुधारणा
आता बँकांना कर्ज खाते किंवा क्रेडिट कार्ड बंद होताच त्याच दिवशी CIBIL (आणि इतर CICs) ला कळवावे लागेल.
पूर्वी या प्रक्रियेत अनेक आठवडे किंवा महिने लागत होते, ज्यामुळे खाते बंद होऊनही कर्जदारांना नवीन कर्ज मिळण्यात अडचणी येत होत्या. आता ही अडचण दूर होणार आहे.
अनधिकृत क्रेडिट चेक थांबणार
बँका आणि NBFCs आता ग्राहकांच्या स्पष्ट परवानगीशिवाय क्रेडिट रिपोर्ट मिळवू शकणार नाहीत. यामुळे 'सॉफ्ट इन्क्वायरी' आणि 'हार्ड इन्क्वायरी' मुळे अनावश्यकपणे CIBIL स्कोअरमध्ये होणारी घसरण टळेल आणि ग्राहकांच्या क्रेडिट प्रोफाइलचे संरक्षण होईल.
चुकीच्या अहवालासाठी मोठा दंड
चुकीचा अहवाल देणे, विलंबाने केलेल्या सुधारणा किंवा अनधिकृत क्रेडिट तपासणीसाठी वित्तीय संस्थांवर मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात येणार आहे. या दंडामुळे बँकांना क्रेडिट डेटा अधिक अचूक आणि तत्काळ अपडेट ठेवण्यास भाग पाडले जाईल, परिणामी ग्राहकांना त्यांच्या स्कोअरमध्ये जलद सुधारणा अनुभवता येईल.
(टीप: जर बँक वेळेवर डेटा सादर करण्यात अयशस्वी झाली, तर CICS ला हे RBI च्या दक्ष पोर्टलवर कळवावे लागेल.)
कर्जाची अचूक किंमत
बँकांना दर ७ दिवसांनी अद्ययावत होणारे नवीन क्रेडिट रिपोर्ट मिळतील. यामुळे जोखीमचे अधिक चांगले मूल्यांकन होईल. परिणामी, बँकांना कर्जाची अचूक किंमत (म्हणजेच, योग्य व्याजदर), रक्कम आणि कालावधी निश्चित करता येईल, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या चांगल्या क्रेडिट प्रोफाइलचा लाभ मिळेल.
क्रेडिट स्कोअर म्हणजे काय?
क्रेडिट स्कोअर हा एक सांख्यिकीय सारांश आहे, जो एखाद्या व्यक्तीच्या कर्ज परतफेडीच्या क्षमतेचे आणि सवयींचे प्रतिनिधित्व करतो.
क्रेडिट रिपोर्टमध्ये काय असते?
- तुमची सर्व कर्ज खाती (क्रेडिट कार्ड, गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज इ.)
- दिवाळखोरी आणि उशिरा पेमेंटचा तपशील (असल्यास)
- कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी कधी अर्ज केला, कोणत्या संस्थांकडून कर्ज मिळाले.
- तुम्ही कर्जाचे ईएमआय आणि बिले वेळेवर भरली आहेत की नाही.
- तुमच्या क्रेडिट अहवालाचे पुनरावलोकन केलेल्या बँका/एनबीएफसींची यादी.
- सध्या, भारतातील परवानाधारक क्रेडिट माहिती कंपन्या (CICs) जसे की CIBIL, Equifax, Experian, आणि Highmark द्वारे क्रेडिट अहवाल जारी केले जातात.
क्रेडिट स्कोअर कोणत्या घटकांवर अवलंबून असतो?
क्रेडिट स्कोअर ३०० ते ९०० दरम्यान मोजला जातो. हा स्कोअर एखाद्या व्यक्तीची कर्ज पात्रता ठरवतो आणि खालील घटकांवर लक्षणीयरीत्या अवलंबून असतो:
- घटक स्कोअरवर परिणाम : (अंदाजित)
- वेळेवर परतफेडीचा इतिहास : ३०% (कर्ज EMI/क्रेडिट कार्ड बिले वेळेवर भरणे)
- कर्ज सुरक्षित आहे की असुरक्षित : २५% (सुरक्षित कर्जाला प्राधान्य)
- क्रेडिट एक्सपोजर : २५% (जुने आणि वैविध्यपूर्ण क्रेडिट इतिहास)
- क्रेडिट वापर प्रमाण : २०% (क्रेडिट लिमिटपैकी किती वापरली जाते)
क्रेडिट स्कोअरची श्रेणी!
- ५५० ते ७००: चांगला स्कोअर (Good Score)
- ७०० ते ९००: खूप चांगला स्कोअर (Very Good to Excellent Score)












Click it and Unblock the Notifications