वेटींग रेल्वे तिकीटातून रिझर्व्हेशन सेवा मिळणार नाही! LPG गॅस ते ATM आजपासून नियम बदलले, खिशाला फटका
New rules LPG gas railway ticket ATM rules changed From Today : महिन्याच्या प्रत्येक पहिल्या दिवशीपासून तुमच्या जीवनावश्यक आणि गरजेच्या गोष्टी बदलतात. कधी त्यांच्या किमती बदलतात तर कधी प्रक्रियेत बदल होतो. त्यामुळे त्याचे फायदे आणि नुकसान तु्म्हाला झेलावे लागतात. त्यामुळेच ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे.
आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या दिवशी केंद्र सरकारने काही गोष्टींच्या कार्यपद्धतीत विशेष बदल केले. त्याशिवाय आजपासून काही नियम बदलले आहेत.

तुमच्या खिशावर थेट परिणाम होईल अशा गोष्टी बदलल्या आहेत. या बदलाचा थेट परिणाम किमतीशी निगडीत असून आजपासून बदललेले कोणते नियम आहेतखिशावर होईल याची माहिती आपण घेऊया.
एलपीजी किंमत नवीन नियम
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजीच्या किमतीत बदल होतो. 7 एप्रिल रोजी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती, त्यानंतर आता 14 किलो गॅस सिलेंडरची किंमत 853 रुपये झाली आहे.
आजही एलपीजीच्या किमतीत बदल होण्याची अपेक्षा आहे परंतु आतापर्यंत इंडियन ऑइलने एलपीजीच्या किमती अपडेट केलेल्या नाहीत त्या लवकरच अपडेट होतील अशी अपेक्षा आहे.
रेल्वे तिकीट बुकिंगचे नियम बदलल्याचा फटका
आजपासून रेल्वे तिकीट बुक करण्याचे नियमही बदलले आहेत आणि नवीन नियम लागू होत आहेत. जर वेटिंगची वेळ संपली नाही, तर तुम्ही प्रवास करू शकणार नाही, वेटिंग तिकीट फक्त जनरल कोचसाठी वैध असेल, म्हणजेच आता तुम्ही वेटिंग तिकिटासह स्लीपर किंवा एसी कोचमध्ये प्रवेश करू शकणार नाही.
एटीएममधून पैसे काढणे महाग, खिशाला कात्री!
1 मे 2025 पासून एटीएममधून पैसे काढणे महाग होत आहे, म्हणजेच आजपासून एटीएममधून पैसे काढण्यावरील मोफत व्यवहारांची मर्यादा संपली आहे. आता तुम्हाला एटीएममधून पैसे काढण्यासाठी आणि बॅलन्स तपासण्यासाठी 19 रुपये द्यावे लागतील.
बचत खाते, एफडीचे व्याजदर घटले, आर्थिक नुकसानच
एफडी आणि बचत खात्याची आजपासून एफडी आणि बचत खात्याच्या दरांमध्येही बदल झाले आहेत, अलीकडेच आरबीआयने रेपो दर कमी केला आहे, त्यानंतर बहुतेक बँकांनी त्यांच्या एफडी आणि बचत खात्याच्या व्याजदरांमध्ये बदल केले आहेत.
15 बँका बंद, वन स्टेट वन आरआरबी योजना लागू
एक राज्य-एक प्रादेशिक ग्रामीण बँक म्हणजेच (आरआरबी) योजना आजपासून केंद्र सरकारने लागू केली आहे. ग्रामीण आणि प्रादेशिक बँकांच्या प्रक्रीयेत आमुलाग्र बदल घडवून ग्राहकांना दर्जेदार सेवा देणे हा याचा उद्देश आहे. या अंतर्गत सर्व प्रादेशिक ग्रामीण बँकांना एकत्र करून एक मोठी बँक तयार करण्यात आली आहे. ही योजना आजपासून आरआरबी एमपी, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटकमध्ये लागू करण्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications