Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

डॉलरसमोर भारतीय रुपयाची किंमत घटली; देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय होतात गंभीर परिणाम? वाचा 5 मुद्द्यात

Indian Rupee vs Dollar : सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमत सातत्याने घसरण सुरु आहे. सध्या एका डाॅलरला रुपयाची किंमत ८९.८९ रुपये आहे, ते ८२ रुपयावरुन ८९ रुपयांपर्यत पोहचले आहे. रुपयाचे हे अवमूल्यन भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अनेक आव्हाने घेऊन आले आहे. रुपयाची किंमत घसरल्यास देशाला तात्काळ आणि दूरगामी काय नुकसान होते आणि याचे परिणाम सामान्य नागरिकांपासून ते मोठ्या उद्योगांपर्यंत कसे जाणवतात, हे आपण सविस्तर जाणून घेऊया.

Indian Rupee vs Dollar

१. आयात महाग : महागाईचा मोठा फटका

रुपया घसरल्याचा सर्वात मोठा आणि थेट परिणाम आयातीवर होतो. भारताची आयात मोठी असल्याने, आयातीवर आधारित वस्तू महाग होतात. आता भारत खास करुन इंधन-ऊर्जेशी संबंधित बाबी आयात करतो तर बऱ्याच प्रमाणात कच्चा मालही आयात करतो याचा थेट महागाईवर परिणाम होतो.

इंधन आणि ऊर्जा

भारत आपल्या गरजेपैकी मोठा वाटा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आयात करतो. रुपया कमकुवत झाल्यास, प्रत्येक डॉलरच्या बदल्यात जास्त रुपये द्यावे लागतात. यामुळे पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस (LPG) च्या किंमती वाढतात, ज्यामुळे वाहतूक खर्च वाढतो आणि महागाई सामान्य नागरिकांच्या किचनपर्यंत पोहोचते.

इलेक्ट्रॉनिक्स आणि मशीनरी

मोबाईल फोन, लॅपटॉप, कंप्युटर पार्ट्स, तसेच कारखान्यांमध्ये वापरली जाणारी अत्याधुनिक मशीनरी आयात करणे महाग होते. याचा थेट फटका उत्पादन खर्च आणि ग्राहकांना बसतो.

कच्चा माल

औषधे, प्लास्टिक आणि अनेक उद्योगांसाठी आवश्यक असलेला कच्चा माल आयात करणे महाग होते, ज्यामुळे देशांतर्गत वस्तूंच्या किंमतीही वाढतात.

२. परदेशी कर्ज आणि सरकारी तिजोरीवर ताण

रुपया घसरल्यामुळे देशाचे परदेशी कर्ज वाढते आणि ते फेडणे अधिक महाग होते. हे रुपया घसरल्यानंतरचा परिणाम आहे. त्याचा थेट अर्थव्यवस्थेची संबंध आहे.

कर्जाची परतफेड: भारत सरकारने किंवा भारतीय कंपन्यांनी डॉलरमध्ये जे कर्ज घेतले आहे, त्याची परतफेड करताना जास्त रुपये खर्च करावे लागतात. उदा. जर १०० डॉलरचे कर्ज असेल, तर रुपया घसरल्यानंतर ते फेडण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त भारतीय रुपये मोजावे लागतील. यामुळे सरकारी तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक ताण येतो.

व्याजाचा भार: विदेशी कर्जावरील व्याज भरण्यासाठीही अधिक रुपये खर्च करावे लागतात.

३. शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान

उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेलेल्या किंवा जाण्याचा विचार करणाऱ्या कुटुंबांना मोठा फटका बसतो, त्यांना महागाईचा सामना करावा लागतो. चलनातील सातत्याने होणारा बदल परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम करतो.

ट्युशन फी आणि खर्च

परदेशातील विद्यापीठांची फी आणि राहण्याचा खर्च डॉलर (किंवा संबंधित विदेशी चलन) मध्ये असतो. रुपया कमकुवत झाल्यास, फी भरण्यासाठी कुटुंबांना पूर्वीपेक्षा २० ते ३० टक्के अधिक रुपये खर्च करावे लागतात. यामुळे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांचे परदेशात शिक्षण देण्याचे बजेट पूर्णपणे कोलमडते.

४. विदेशी गुंतवणूकदारांची अनिच्छा

रुपयाची किंमत अस्थिर झाल्यास किंवा घसरल्यास परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसे काढून घेण्यास सुरुवात करतात, यामुळे अनेक मोठे तोटे असतात.

बाजारातील अस्थिरता

जर गुंतवणूकदाराला वाटले की रुपया आणखी घसरेल, तर ते आपला नफा सुरक्षित करण्यासाठी भारतीय स्टॉक आणि बॉन्ड बाजारातून डॉलर काढून घेतात. यामुळे शेअर बाजारात मोठी अस्थिरता निर्माण होते.

नवीन गुंतवणुकीत घट

रुपयातील घट भविष्यातील नफा कमी करू शकते, या भीतीने नवीन परदेशी गुंतवणूकदार भारतात येणे टाळतात.

५. परदेशी प्रवास महागतो

सामान्य नागरिकांसाठी परदेशी प्रवास करणे प्रचंड महाग होते, त्यामुळे हाही एक फटकाच आहे.

टूरिझम आणि वैद्यकीय खर्च

जर एखाद्याला पर्यटन किंवा वैद्यकीय उपचारांसाठी परदेशात जायचे असेल, तर हॉटेल, तिकिटे आणि तेथील स्थानिक खर्च भागवण्यासाठी जास्त रुपये मोजावे लागतात. पण, एक दिलासादायक बाजूही आहे! रुपयाचे अवमूल्यन काही प्रमाणात देशातील निर्यातदारांसाठी फायदेशीर ठरते.

निर्यातदारांना फायदा

रुपया घसरल्यामुळे, भारतीय निर्यातदारांना त्यांच्या मालाच्या बदल्यात डॉलरमध्ये जे उत्पन्न मिळते, त्याचे रुपयामध्ये रूपांतर केल्यास त्यांना अधिक रुपये मिळतात. उदा. जर १०० डॉलरचा माल विकला आणि रुपया कमकुवत असेल, तर त्यांच्या हातात अधिक रुपये येतात. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय उत्पादने स्वस्त होतात आणि ती अधिक स्पर्धात्मक बनतात.

एकंदरीतच फायदा एक नुकसान अनेक..

एकंदरीत, रुपयाचे अवमूल्यन हे भारतासाठी चिंतेचे कारण आहे. निर्यातदारांना तात्पुरता दिलासा मिळत असला तरी, आयातीवर आधारित अर्थव्यवस्थेमुळे देशात महागाई वाढते, परदेशी कर्जाचा बोजा वाढतो आणि सामान्य नागरिक आर्थिक संकटात येतात. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी रिझर्व्ह बँक आणि सरकारने मजबूत आर्थिक धोरणे राबवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+