Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

India 4th largest economy : का वाढतेय भारतीय अर्थव्यवस्था? जपान मागे का पडला? जाणून घ्या कारणे

India 4th largest economy : जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. भारताने जपानला मागे टाकल्याची माहिती नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रम्हण्यम यांनी दिली. भारताने 4 ट्रिलियन अमेरिकी डॉलरपेक्षा जास्त अर्थव्यवस्थेचे भारताने लक्ष्य गाठले आहे.

दहाव्या नीती आयोगाच्या प्रशासकीय परिषद अर्थात गव्हर्निंग कौन्सिल बैठक 24 मे 2025 रोजी नवी दिल्ली इथं भारत मंडपम् येथे पार पडली. नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रह्मण्यम माहिती देताना म्हणाले, "भारत अशा टप्प्यावर आहे जिथे तो खूप वेगाने वाढू शकतो, पुढील 20 ते 25 वर्षांसाठी भारताला प्रत्यक्षात मिळणारा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश पाहता, आपण वेगाने वाढू शकतो. आपण जपानला मागे टाकले असून जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनलो "

India 4th largest economy

भारताची अर्थव्यवस्था सर्वात जास्त वेगाने वाढत आहे. सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात जीडीपीचा दर वेगात आहे तर भारताच्या तुलनेत जपानचा सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा वेग कमी आहे, भारताचा दर का वाढत आहे आणि जपान पिछाडीवर का पडला याची कारणे आज आपण जाणून घेणार आहोत. आयएमएफने त्यांच्या 'वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक' अहवालात ही माहिती दिली आहे.

जलद वाढीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत बदल होत आहेत. यामुळे भारताला त्याच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय समकक्षांपेक्षा लक्षणीय फायदा मिळतो. आयएमएफच्या आकडेवारीनुसार, मजबूत देशांतर्गत मागणी आणि अनुकूल लोकसंख्याशास्त्रीय ट्रेंडमुळे भारताची अर्थव्यवस्था वाढत असून ती वाढतच राहील.

भारताच्या तुलनेत जपान मागे का पडला?

  • जपान मागे राहण्याची अनेक कारणे आहेत.
  • जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता कायम आहे. व्यापारी तणाव आणि धोरणातील बदलांचा अनेक विकसित अर्थव्यवस्थांवर परिणाम झाला आहे. यामध्ये जपानचाही समावेश आहे.
  • बाह्य दबावांमुळे जपानच्या आर्थिक भवितव्याला धक्का बसला आहे.
  • अमेरिकेने लादलेल्या शुल्काचा नकारात्मक परिणाम.
  • जपानची लोकसंख्या वृद्ध होत आहे आणि कामगारांची संख्या कमी होत आहे. या दीर्घकालीन संरचनात्मक समस्या आहेत ज्या विकासात अडथळा आणत आहेत.
  • या कारणांमुळे, जपानची अर्थव्यवस्था भारतापेक्षा कमी वेगाने वाढत आहे.

का वाढतेय भारताची अर्थव्यवस्था?

  • भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीची अनेक कारणे आहेत.
  • एक प्रमुख कारण म्हणजे भारताची लोकसंख्या तरुण आहे आणि वेगाने वाढत आहे.
  • दुसरे कारण म्हणजे भारतात मोठा आणि वाढता मध्यमवर्ग आहे.
  • तिसरे कारण म्हणजे भारत सरकार आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी वचनबद्ध आहे, हे सरकारचे धोरण आहे.

अर्थव्यवस्था वाढत राहील्याने काय होणार?

अहवालानुसार, भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीमुळे देशातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारेल. यामुळे गरिबी नियंत्रणात येईल आणि बेरोजगारांची संख्या कमी होऊन रोजगाराच्या संधी वाढतील. भारताच्या अर्थव्यवस्थेतील वाढीमुळे देशाला जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावण्यास मदत होईल.

2030 पर्यंत भारत या देशाला मागे टाकेल

आयएमएफच्या अंदाजानुसार, 2030 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था जर्मनीपेक्षा 20% मोठी असेल. भारतीय अर्थव्यवस्था या काळात 6.8 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल. भारतीय अर्थव्यवस्था 2030 पर्यंत जपानपेक्षा 33 टक्क्यांनी पुढे असेल हे आयएमएफने म्हटले आहे तर याचाच संदर्भ देत नीती आयोगाचे सीईओ सुब्रम्हण्यम यांनीही नीती आयोगाच्या प्रशासकीय परिषदेच्या बैठकीत भारत 2030 पर्यंत तिसरी अर्थव्यवस्था होईल असे सांगितले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+