Credit Cardचा अयोग्य वापर तुम्हाला कर्जाच्या विळख्यात टाकेल; कसे वापरायचे क्रेडिट कार्ड, जाणून घ्या
How to use credit card how to avoid late fees : माणसाला दैनदिन जीवनात कायम पैशाची निकड पडत असते. कधी कधी तर पैशाची इतकी गरज असते पण तेव्हा त्याच्याकडे ते नसतात. अशावेळी क्रेडीट कार्डचा नक्कीच फायदा होतो. क्रेडीट कार्डचा योग्य व नियमावनुसार वापर केला तरच ते लाभदायी ठरते, नाहीतर क्रेडिट कार्ड माणसाला कर्जाच्या जाळ्यात अडकवते हे अगदी निश्चित आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नुसार, डिसेंबर 2024 पर्यंत क्रेडिट कार्डवरील एकूण थकबाकी 6,742 कोटी रुपये होती. ही रक्कम 2023 च्या तुलनेत 1500 कोटी रुपये जास्त असल्याचे सांगितले गेले. म्हणजेच क्रेडिट कार्ड वापरताना निष्काळजीपणा मोठ्या प्रमाणात होत आहे.
माहितीच्या अभावामुळे लोक कर्जाच्या जाळ्यात अडकत आहेत. ईएमआय चुकला किंवा मर्यादा ओलांडल्यास, क्रेडिट कार्ड कंपन्या किंवा बँका उच्च व्याजदरांसह दंड आकारतात. त्यामुळे सदर ग्राहकाचे दिवाळे निघाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आज आपण क्रेडिट कार्ड वापरताना काय काळजी घ्यावी, क्रेडिट कार्डचे फायदे काय आहेत, क्रेडिट कार्डचे तोटे काय आहेत, यावर सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत...!

आधी समजून घ्या- क्रेडिट कार्ड म्हणजे काय?
क्रेडिट कार्ड हे एक प्लास्टिक कार्ड आहे, जे डेबिट कार्ड (एटीएम कार्ड) सारखेच असते. आपण आपल्या बँक खात्यातून डेबिट कार्डद्वारे पैसे काढू शकतो. तर, क्रेडिट कार्डद्वारे आपण बँक किंवा एनबीएफसीकडून कर्ज घेऊन खरेदी करू शकतो. दरमहा, क्रेडिट कार्डच्या खर्चाचे बिल येते, जे एका विशिष्ट तारखेपर्यंत भरावे लागते. जर पैसे दिले नाहीत तर उर्वरित रकमेवर व्याज द्यावे भरावे लागते.
क्रेडिट कार्ड कर्जाच्या विळख्यात ओढते का?
जर तुम्ही कार्डचा योग्य वापर केला नाही. क्रेडिट कार्ड वापरण्यात निष्काळजी राहिलात तर तुम्ही कर्जाच्या सापळ्यात अडकू शकता. कमाईपेक्षा जास्त खर्च करण्याची सवय आणि खरेदीचे व्यसन तुम्हाला कर्जाच्या सापळ्यात अडकवण्यास भाग पाडते. हे तर अगदी सत्य आहे. क्षमतेपेक्षा जास्त खर्च केल्यामुळे क्रेडिट कार्डची बिले भरणे कठीण होते. जास्त व्याजदरांमुळे, लोक अनेक महिने थकीत रक्कम भरत राहतात. यामुळे कर्जाची रक्कम तशीच राहते.
क्रेडिट कार्ड वापरताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत?
- बिल पेमेंट करण्यास उशीर करू नका कारण यामुळे व्याज वाढते आणि तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होतो.
- फक्त किमान देय रक्कम भरू नका कारण यामुळे कर्ज जास्त काळ टिकते आणि व्याज वाढत राहते.
- क्रेडिट मर्यादेच्या जवळ किंवा त्यापेक्षा जास्त खर्च करू नका, यामुळे तुमचा CIBIL स्कोअर खराब होऊ शकतो.
- क्रेडिट कार्डमधून पैसे काढू नका, यामुळे लगेच व्याज आणि इतर शुल्क जमा होण्यास सुरुवात होईल.
- प्रत्येक खरेदीवर EMI निवडू नका, यामुळे हळूहळू कर्जाचा बोजा वाढू शकतो.
- रिवॉर्ड पॉइंट्स आणि ऑफर्सच्या लोभात गरजेपेक्षा जास्त खर्च करू नका, यामुळे बजेट बिघडू शकते.
- अनावश्यकपणे अनेक क्रेडिट कार्ड ठेवू नका. यामुळे तुम्ही पेमेंट आणि देय तारीख विसरू शकता. कार्डसाठी वार्षिक शुल्क देखील आहे.
- स्टेटमेंट वाचल्याशिवाय कधीही पेमेंट करू नका, यामुळे तुम्हाला चुकीचे शुल्क आणि फसवणूक टाळण्यास मदत होईल.
क्रेडिट कार्ड वापरण्याचा योग्य मार्ग कोणता आहे?
तुमच्या खर्चाचा आढावा घ्या : क्रेडिट कार्ड मर्यादा आणि खर्चावर लक्ष ठेवा. अनावश्यक खरेदी टाळा. तुमच्या खर्चाचा वारंवार आढावा घेत रहा. म्हणजे नेमंक काय खर्च होतोय, याचा ताळमेळ लागण्यास मदत होईल.
वेळेवर बिल भरा : देय तारखेपूर्वी क्रेडिट कार्ड बिलाचे पेमेंट पूर्ण करा. यामुळे तुमचे व्याज वाचेल आणि तुमचा क्रेडिट स्कोअर देखील सुधारेल, तर भविष्यातील अडचणींपासून तुम्ही मुक्त व्हाल.
किमान देयके टाळा : फक्त किमान देय रक्कम भरू नका. यामुळे तुम्ही व्याजाच्या जाळ्यात अडकू शकता. नेहमीच संपूर्ण थकबाकी भरण्याचा प्रयत्न करा. जर हे शक्य नसेल तर कर्जाचे ईएमआयमध्ये रूपांतर करा.
तुमच्या क्रेडिट मर्यादेचा वापर मर्यादित करा : तुमच्या क्रेडिट मर्यादेच्या ३०% ते ४०% पेक्षा जास्त वापरू नका. यामुळे तुमचा CIBIL स्कोअर सुधारेल.
रोख रक्कम काढणे टाळा : बँका प्रत्येक व्यवहारावर 2.5% ते 3.5% आगाऊ शुल्क आकारतात. हे 300 ते 500 रुपये किंवा त्याहूनही जास्त असू शकते. तसेच, व्याजदर वार्षिक 36% ते 48 % पर्यंत आहे.
रिवॉर्ड्स आणि ऑफर्सचा लाभ घ्या : क्रेडिट कार्ड्ससोबत येणाऱ्या रिवॉर्ड पॉइंट्स, कॅशबॅक आणि ऑफर्सचा आनंद घ्या. यामुळे तुमच्या खिशावर कोणताही भार पडणार नाही.
क्रेडिट कार्डचे तोटे काय आहेत?
जास्त व्याजदर: वेळेवर पूर्ण परतफेड न केल्याने जास्त व्याजदर येतात. ज्यामुळे कर्ज वेगाने वाढू शकते.
जास्त खर्च करण्याचा धोका: क्रेडिट कार्डवर दिल्या जाणाऱ्या सवलतींमुळे लोक जास्त खर्च करतात आणि कर्जबाजारी होतात.
अनेक शुल्क : क्रेडिट कार्डवर वार्षिक शुल्क, विलंब शुल्क, रोख आगाऊ शुल्क इत्यादी अनेक शुल्क आकारले जातात.
क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम : वेळेवर पेमेंट न करणे किंवा क्रेडिट मर्यादेच्या ४०% पेक्षा जास्त वापर न केल्याने क्रेडिट स्कोअर नकारात्मक होऊ शकतो. यामुळे भविष्यात कर्ज मिळणे कठीण होऊ शकते.
कर्जाचा सापळा : जर काळजीपूर्वक वापर केला नाही तर एखादी व्यक्ती कर्जाच्या सापळ्यात अडकू शकते.
क्रेडिट कार्डचे फायदे काय आहेत?
कॅशलेस सुविधा: तुम्हाला रोख रकमेशिवाय खरेदी करण्याची आणि पेमेंट करण्याची परवानगी देते.
व्याजमुक्त कालावधी : थकबाकीची रक्कम वेळेवर परत केल्यास कोणतेही व्याज आकारले जात नाही. वेगवेगळ्या बँका यासाठी वेगवेगळ्या वेळेच्या मर्यादा देतात.
रिवॉर्ड्स आणि कॅशबॅक : क्रेडिट कार्ड कंपन्या त्यांच्या वापरकर्त्यांना कॅशबॅक, डिस्काउंट आणि विविध रिवॉर्ड्स देतात.
क्रेडिट स्कोअर वाढवण्यास उपयुक्त : क्रेडिट कार्डचा जबाबदारीने वापर केल्याने, वेळेवर पेमेंट केल्याने क्रेडिट स्कोअर सुधारतो. यामुळे भविष्यात कर्ज घेणे सोपे होते.
आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त : अनपेक्षित खर्च किंवा आपत्कालीन परिस्थितीसाठी क्रेडिट कार्ड मदत म्हणून उपयुक्त ठरू शकते.
सुरक्षितता : क्रेडिट कार्ड रोख रकमेपेक्षा अधिक सुरक्षित असतात. जर कार्ड हरवले किंवा चोरीला गेले तर तुम्ही बँकेला कळवून ते ब्लॉक करू शकता.
ऑनलाइन शॉपिंगवर सूट : क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन शॉपिंगवर सूट उपलब्ध आहे.












Click it and Unblock the Notifications