आजपासून 6 मोठे बदल: पॅन-आधार लिंकिंगची अंतिम मुदत, ITR डेडलाईन आणि RBI च्या व्याजदरांवर लक्ष!
December 2025 New Rule Change : आज, डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला (१ डिसेंबर), देशातील नागरिकांच्या आर्थिक आणि बँकिंग जीवनावर परिणाम करणारे ६ मोठे बदल लागू होत आहेत. यामध्ये पॅन-आधार लिंकिंगची अंतिम मुदत, विलंब शुल्कासह ITR भरण्याची शेवटची संधी, एसबीआयची सेवा बंद होणे आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे.

या महिन्यात होणारे ६ मोठे आणि महत्त्वाचे बदल खालीलप्रमाणे आहेत:
१. पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम मुदत
काय आहे बदल? आयकर विभागाने पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ निश्चित केली आहे. ज्या लोकांना १ ऑक्टोबर २०२४ पूर्वी आधार नोंदणी आयडीद्वारे पॅन जारी करण्यात आले होते, त्यांच्यासाठी हा नियम लागू आहे.
परिणाम काय होईल? जर तुम्ही वेळेवर लिंकिंग केले नाही, तर तुमचे पॅन कार्ड डी-अॅक्टिव्ह (Inactive) होईल. याचा थेट परिणाम तुमच्या खालील कामांवर होईल.
- आयटीआर (ITR) फाइलिंग.
- बँक केवायसी (KYC).
- कर्ज घेणे.
- सरकारी सबसिडी मिळणे.
तुम्ही काय करावे? आजच इन्कम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलवर जाऊन लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण करा. त्यासाठी पॅन नंबर, आधार नंबर आणि ओटीपी (OTP) आवश्यक आहे. लिंकिंग करताना निर्धारित दंड देखील भरावा लागेल.
२. आरबीआयची पतधोरण समितीची बैठक: व्याजदर ०.२५% ने कमी होण्याची शक्यता
काय आहे बदल? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मॉनेटरी पॉलिसी कमिटी (MPC) ची बैठक ३ ते ५ डिसेंबर दरम्यान होणार आहे. या बैठकीत आरबीआय रेपो दरांमध्ये ०.२५% ने कपात करून तो ५.२५% पर्यंत खाली आणू शकते, अशी बाजारात अपेक्षा आहे.
तुम्हाला काय फायदा? जर व्याजदर कमी झाले, तर कर्ज स्वस्त होतील आणि परिणामी तुमचा ईएमआय (EMI) देखील कमी होऊ शकतो.
पूर्वीची स्थिती: यापूर्वी आरबीआयने मागील एमपीसी बैठकीत (२९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर) आणि ऑगस्टमध्ये झालेल्या बैठकीतही रेपो दरात कोणताही बदल केला नव्हता आणि तो ५.५% वर कायम ठेवला होता.
यावर्षी झालेले बदल: आरबीआयने यावर्षी तीन वेळा रेपो रेट कमी केला आहे, ज्यामुळे एकूण १% ची कपात झाली आहे (फेब्रुवारी: ०.२५%, एप्रिल: ०.२५%, जून: ०.५०%).
३. विलंब शुल्कासह ITR दाखल करण्याची अंतिम तारीख
काय आहे बदल? असेसमेंट इयर २०२५-२६ (फायनान्शियल इयर २०२४-२५) साठी निर्धारित वेळेनंतर इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम संधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत आहे.
परिणाम आणि दंड:
५ लाखांपर्यंत उत्पन्न: ₹१,००० विलंब शुल्क.
इतरांसाठी: ₹५,००० विलंब शुल्क.
वेळेवर ITR न भरल्यास आयकर विभागाची नोटीस येऊ शकते.
कर्ज, व्हिसा आणि टेंडर भरताना अडचणी येतील, कारण बँक आणि दूतावास उशिरा दाखल केलेले ITR गांभीर्याने घेत नाहीत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जर ३१ डिसेंबरपर्यंत ITR दाखल केला नाही, तर तुम्हाला तोटा पुढे नेण्याचा (Loss Carry Forward) हक्क देखील गमवावा लागेल.
तुम्ही काय करावे? सर्व कागदपत्रे (फॉर्म-१६, बँक स्टेटमेंट, कॅपिटल गेन इत्यादी) गोळा करून त्वरित इन्कम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलवर जा. 'बिलेटेड' (Belated) पर्याय निवडून ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजण्यापूर्वी ITR सबमिट करा. शेवटच्या दिवसांत सर्व्हर हँग होण्याची शक्यता असल्याने तातडीने कार्यवाही करा.
४. टॅक्स ऑडिट ITR दाखल करण्याची अंतिम मुदत
काय आहे बदल?
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने टॅक्स ऑडिट असलेल्या प्रकरणांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत वाढवून १० डिसेंबर २०२५ केली आहे.
कोणासाठी महत्त्वाचे?
लहान व्यावसायिक, प्रोफेशनल आणि ज्यांची उलाढाल ₹१ कोटींपेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे आहे.
परिणाम :
जर ITR १० डिसेंबरनंतर दाखल केला, तर कलम २३४A अंतर्गत व्याज (Interest) लागू होईल.
तुम्ही काय करावे?
आपल्या अकाउंटंटशी त्वरित संपर्क साधा आणि सर्व कागदपत्रे गोळा करून ऑनलाइन पोर्टलवर फॉर्म 3CD सह ITR-3 किंवा ITR-5 दाखल करा.
५. SBI ची mCASH सेवा बंद: आता ही सुविधा मिळणार नाही
काय आहे बदल?
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची लोकप्रिय mCASH सेवा आजपासून (१ डिसेंबर) पूर्णपणे बंद झाली आहे. ही सुविधा OnlineSBI आणि YONO Lite ॲपद्वारे पैसे पाठवण्यासाठी आणि क्लेम करण्यासाठी उपलब्ध होती.
पर्याय काय आहेत?
या सेवेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना आता UPI, NEFT किंवा IMPS सारखे पर्याय वापरावे लागतील.
तुम्ही काय करावे?
तुमचे बँक ॲप त्वरित तपासा आणि नवीन हस्तांतरण पर्याय शिकून घ्या, जेणेकरून लहान-मोठे व्यवहार करताना कोणतीही अडचण येणार नाही.
6. व्यावसायिक सिलिंडरचे दर 10.50 रुपयांपर्यंत कमी झाले
आजपासून 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर ₹10.50 पर्यंत स्वस्त झाला आहे. दिल्लीत त्याची किंमत 10 रुपयांनी कमी होऊन ₹1580.50 झाली आहे. आधी तो ₹1590.50 मध्ये मिळत होता. तर मुंबईत तो आता 10.50 रुपयांनी स्वस्त होऊन 1531.50 रुपयांना मिळेल.












Click it and Unblock the Notifications