आर्टिफिशियल इंटेलिजन्स ठरवेल का निवडणुकांचे भवितव्य? जाणून घ्या निवडणूक प्रणालीवर होणारा परिणाम

भारतीय लोकशाहीसाठी निवडणूक म्हणजे जनमताचा उत्सव असतो. जनता हे सरकार आणि विरोधक यांच्या कामगिरीवर आपली मोहर उमटवते. भारतीय लोकशाहीची खासियत म्हणजे येथे सत्तांतर नेहमी जनतेच्या मतांनीच झाले आहे. प्रत्येक निवडणूक कोट्यवधी मतदारांच्या सहभागाने घडते.

AI in elections


आजच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा प्रभाव संपूर्ण जगभरात वाढत आहे, आणि त्यापासून निवडणूक प्रक्रियाही अलिप्त राहणार नाही. भविष्यात निवडणूक रणनीती, मतदारांशी संवाद आणि निकालांचे विश्लेषण यामध्ये AI महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

निवडणूक व्यवस्थेच्या प्रत्येक टप्प्यावर AI चा वाढता प्रभाव

AI चा मुख्य उपयोग मोठ्या प्रमाणात डेटा विश्लेषणात (Data Analysis) होणार आहे. अमेरिकेच्या 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीत काही प्रचार कंपन्यांनी AI चा वापर केला होता. भारतातही मतदारांचा मूड समजून घेणे, स्थानिक प्रश्न ओळखणे, पूर्वीच्या मतदान पद्धतीचे विश्लेषण आदींसाठी AI वापरला जाऊ शकतो.

पक्ष आपल्या टार्गेटेड प्रचार मोहिमा, वैयक्तिक प्रचार, आणि निवडणूकपूर्व मुद्दे उचलण्यासाठी AI चा वापर करू शकतात.

छोटे सामाजिक गट आणि विशिष्ट मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी AI चा वापर

AI आधारित चॅटबॉट्स (जसे WhatsApp किंवा Facebook Messenger वर) लाखो मतदारांशी थेट संवाद साधू शकतात. यामुळे प्रत्येक मतदाराशी वैयक्तिक संवाद साधता येतो.

कोणी शेतकरी असेल, तरुण बेरोजगार असेल, महिला असेल त्यांच्या विशिष्ट मुद्द्यांनुसार प्रचार सादर करता येतो. यामुळे प्रचार अधिक परिणामकारक होतो.

याशिवाय, चॅटबॉट्सद्वारे मिळालेले प्रतिसाद राजकीय पक्ष वापरून वेगवेगळ्या समाजघटकांच्या अपेक्षा आणि मानसिकता समजू शकतात.

AI सोबत जोडलेले धोके, Deepfake आणि फेक न्यूज

AI चा जसा उपयोग होतो तसा त्यात धोका देखील आहे. उदाहरणार्थ, Deepfake व्हिडीओ बनवून कोणत्याही नेत्याचे खोटे वक्तव्य बनवले जाऊ शकते. त्याचप्रमाणे, फेक न्यूज तयार करून ती मोठ्या प्रमाणात पसरवण्यासाठी देखील AI वापरला जाऊ शकतो.

ही तांत्रिक प्रगती गैरवापराला आमंत्रण देऊ शकते आणि त्यामुळे सरकारपासून सामान्य नागरिकांपर्यंत सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.

AI चा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग भविष्यात अनिवार्य होणार आहे. जरी त्याचा वापर प्रचार, विश्लेषण आणि संवाद सुधारण्यासाठी केला जात असेल, तरी त्याचसोबत त्याच्या गैरवापराचे धोके देखील लक्षात घेतले पाहिजेत.
सतर्कता, नियमबद्धता आणि नैतिक वापर यांच्या आधारावरच AI लोकशाहीला बळकटी देणारे साधन ठरू शकते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+