Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs SA: पहिल्या T20 मध्ये गोंधळ, भारताचे राष्ट्रगीत मध्येच थांबवण्यात आलं, कारण...

India vs South Africa, 1st T20 : टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौ-यात दोन्ही संघांमध्ये चार T-20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना डर्बनमध्ये खेळला गेला. भारताविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेहमीप्रमाणे सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू राष्ट्रगीतासाठी आले होते.

South Africa vs India

टीम इंडियाच्या खेळाडूंनी दोनदा राष्ट्रगीत गायलं

भारतीय राष्ट्रगीतादरम्यान काही तांत्रिक बिघाडामुळे राष्ट्रगीत मध्येच थांबवण्यात आलं.पण भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी राष्ट्रगीत सुरुच ठेवले. त्यावेळी भारतीय खेळाडू काही प्रमाणात गोंधळलेले दिसले आणि त्यांनी दोनदा राष्ट्रगीत गायले.मात्र राष्ट्रगीत संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भारतीय खेळाडू दोनदा राष्ट्रगीत गाताना दिसत होते. पहिल्यांदा राष्ट्रगीत म्हणताना स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या साऊंड सिस्टममध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने पुन्हा राष्ट्रगीत सुरू करण्यात आले.

पहिल्या सामन्यात टीम इंडियाची अशी होती कामगिरी

भारताने शुक्रवारी मालिकेतील पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 61 धावांनी पराभव केला आहे. चार सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या 203 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वरुण चक्रवर्ती 25 धावा देत तीन विकेट मिळवल्या तर बिश्नोई 28 धावांत तीन विकेट मिळवल्या. या दोघांच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ 17.5 षटकांत 141 धावांत सर्वबाद झाला.

वेगवान गोलंदाज आवेश खाननेही 28 धावांत दोन बळी घेतले. आंतरराष्ट्रीय टी-20 मधील भारताचा हा सलग 11 वा विजय आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी केवळ हेनरिक क्लासेन (25), जेराल्ड कोएत्झी (23) आणि सलामीवीर रायन रिक्लेटन (21) यांना 20 धावांचा टप्पा ओलांडता आला. संजू सॅमसनला त्याच्या शानदार शतकासाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+